baba-ya-goshti-jast-changlya-prkare-kartat

 

आई ही मुलांची काळजी घेतच असते. त्याच्या जेवणापासून ते त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाण्यापर्यंत सगळ्या गोष्टी ती करत असते. पण पालक म्हणून बाबा देखील त्यांची भूमिका चांगल्या प्रकारे निभावत असतात. कधी कधी मुलांच्या बाबतीतल्या काही गोष्टी बाबा आई पेक्षा चांगल्या प्रकारे हाताळतात .  त्या  गोष्टी कोणत्या ते आपण पाहणार आहोत

१. मुलांसाठी घोडा बनणे /खांद्यावर घेऊन फिरणे

 

बाबांचा खांदा हा मुलांसाठी इकडून तिकडे जाण्याचे एक उत्तम असे साधन असते. कुठे एवढी गोष्ट दिसत नसेल तर मुलासाठी बाबांचा खांदा तयारच असतो.  तसेच मुलांसाठी घोडा बनायला ते कधी हि तयार असतात. या गोष्टी बाबा कितीही दमले असले तरी करतात. आणि त्यांना ते चांगल्या प्रकारे करतात.

२. मुलांशी खेळणे
 
 
 
 
 

बाबांसारखे  न थकता न दमता, मजा मस्ती करत इतर  मुलांबरोबर कोणी चांगलं खेळू शकत नाही. घरी मैदानात कुठेही बाबा मुलांशी  खेळायला तयार असतात. मुळाशी खेळणे हे जणू बाबांचे  ठरलेले कामाचं असते आणि मुलांना देखील बाबांबरोबर खेळणं जास्त आवडतं

३. मुलांना धाक दाखवण्याचे काम

मुलांना दाखवण्याचे काम हे देखील बाबाच चांगल्या प्रकारे करतात. आईने एखादी गोष्ट १०० वेळा सांगून मुलं  ऐकत नसतील तर, बाबंनी एकदाच सांगितली तर मुलं  ती गुपचूप ऐकतात. हे काम बाबाच चांगल्या प्रकारे करू शकतात. कधी-कधीआई भावनेच्या भरात काही गोष्टी पाठीशी देखील घालते पण बाबा त्यावेळी कठोर होतात. s

४. जेवायला घालणे  आणि झोपवणे
 
 
 
 
 

जर घरातील सुगरणीचा पुरस्कार आईला जात असेल तर. लहान मुलांना जेवायला घालण्याचा आणि झोपण्याचा पूरसाकार हा नक्कीच बाबांना जातो. जर मुलांच्या आवडीची भाजी नसेल आणि आवडीचा पदार्थ नसेल तर त्यांना जेवायला घालायचे काम बाबांकडे जाते कारण बाबा प्रेमाने,खेळवत भरवतात आणि रागवतात पण. मुलं  त्यांच्या धाकाने त्यांच्या हातून सगळे पदार्थ आणि भाज्या खातात. आणि जर मुलं  झोपत नसतील तर बाबा बाहेर घेऊन जातात इकडे तिकडे फिरवतात किंवा रागावत देखील आणि मुलांना झोपवतात.

५. आई घरी नसताना मुलांबरोबर धम्माल  

जसा मुलांना बाबांचा धाक असतो तसेच आई घरी नसताना, बाबा मुलांबरोबर त्यांच्या वयाचे होऊन धम्माल करतात. आई मुलाच्या तब्बेतीसाठी आईस्क्रीम, पिझ्झा खाऊ नका सांगत असत पण आई बाहेर गेली असताना बाबा मुलांबरोबर पिझ्झा खाणे आईस्क्रीम खाणे अश्या गोष्टी करतात

  पालकत्व म्हणजे  वरती दिलेल्या गोष्टीपेक्षा अजून बरंच  काही असतं  सध्याचा काळ असा आहे दोन्ही भूमिका दोन्ही पालकांना निभवाव्या लागतात. पण एक गोष्ट नक्की ती म्हणजे Mothers Rule and Fathers, they simply ROCK.”

हॅलो मॉम्स… आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया… हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Leave a Reply

%d bloggers like this: