tumhala-mulgi-hoil-kee-mulga-pregnancy-in-marathi

 

अशा लेखाच्या हेडलाईनवरून कोणीही तर्क लावणार की, लेख वाचायला हवा. कारण बऱ्याच व्यक्तींना मुलगा पाहिजे असतो. आणि मुलगाच पाहिजे त्याशिवाय तू घरात येऊ नकोस. असे सुनेला सुनावले जाते. ती आई मग उपास- व्रत करते. खूप प्रयत्न करूनही मुलगा होत नाही. मग सासू सुनेला त्रास देते. अशी बरीच कथानकं असलेली चित्रपट आहेत. अजूनही नवीन येतही असतात. पण खरंच मुलगा किंवा मुलगी स्त्रीमुळेच होतो का?

१) गुणसूत्रांमुळे माणसाचे व्यक्तिमत्व बनते

या जगातील प्रत्येक प्राणी- मात्रांच्या पेशींच्या केंद्रात गुणसूत्रे असतात.  माणसाच्या पेशींच्या केंद्रात ४६ गुणसूत्रे असतात. त्यापैकी २३ या गुणसूत्रांच्या जोड्या असतात. त्यातील २२ जोड्यांमुळे माणसाचे रंगरूप, नाकाची ठेवणं, डोळे, उंची, जाडी, ठरतात. आणि या शारीरिक गोष्टीबरोबर बुद्धिमत्ताही ठरत असते.

२)  तेविसावी जोडी ही लिंगसूत्रांची असते. या जोडीमुळेच लिंग समजून येते. आणि जोडी दोघांची असते. म्हणजे पुरुष आणि स्त्री. स्त्रीला जर मुलगी झाली तर त्याचा दोष कुणाला द्यायचा?  

३) शुक्राणू

   गरोदर मातेच्या शरीरात तयार होणाऱ्या स्त्रीबीजाचा पित्याच्या शरीरात तयार झालेल्या शुक्राणूबरोबर संयोग तयार झाल्यावर गर्भ तयार होतो. स्त्रीच्या शरीरात स्त्री बीज तयार होताना गुणसूत्रांचे विभाजन होते. तसेच ते शुक्राणू तयार होत असल्यावर पुरुषाच्या शरीरातही होते. याचा अर्थ असा की, स्त्रीबीजात आणि शुक्राणूत प्रत्येकी २३ गुणसूत्रे असतात. आणि हे स्त्री – पुरुष दोघांमध्ये सारखे २३-२३ असल्याने आई – वडिलांचे दोन्हीचे गुण मुलांमध्ये येतात. आपण म्हणतो तू आईवरच गेलीस बाकी गोष्टीत वडिलांवर गेला आहे. यावरून बाळाची आनुवंशिकता ठरत असते.

३) लिंग सूत्रांचे प्रकार आणि त्यानुसार होणार मुलगा किंवा मुलगी

क्ष आणि य ( X  and Y )

स्त्रियांमध्ये x हे गुणसूत्र असते तर सर्व पुरुषांमध्ये y हे गुणसूत्र असते. आता यात मुलगीचा जन्म कसा होतो ते बघू. y आणि x ही लिंगसूत्र असणाऱ्या शुक्राणूंचा संयोग होऊन गर्भ तयार झाला तर गर्भामध्ये x x  लिंगसूत्रे येतात आणि मुलीचा गर्भ तयार होतो. आणि त्याचप्रमाणे ज्यावेळी गर्भात ‘y लिंगसूत्रे असलेल्या शुक्राणुंमुळे स्त्रीबीज फलित होते त्यावेळी गर्भात y x गुणसूत्रे येतात आणि मुलाचा गर्भ तयार होतो. म्हणजेच मुलगा होणार की मुलगी ही गोष्ट शुक्राणुंमुळे म्हणजेच वडिलांच्यामुळे ठरत असते.  म्हणजेच मुलगी होणे किंवा मुलगा होणे हे कुणाच्याच हातात नाही. आणि जर मुलगी झाल्यामुळे स्त्रीलाच दोष देत असतील तर त्या ठिकाणी खरा दोष वडिलांकडे जाईल. मुलगाच पाहिजे आणि मुलगी नकोच असा भेद करूच नका. खरं खूप संशोधनातून सिद्ध झालेय की, मुलगीच आई- वडिलांवर खूप प्रेम करत असते.

Leave a Reply

%d bloggers like this: