गर्भावस्थेत-योगा-करता-येतो-का–xyz

हो नक्कीच करता येतो. तरीही गरोदरपणात योग करता येतो का ? हा वादाचा विषय आहे असे काहीजण म्हणतील कारण गरोदरपणात योग कसा करता येईल. पण असे काही नाही योगा हा जितका कठीण आसनांनी बनलेला आहे तितकाच सोपा व प्रत्येकाला करता येतील अशा आसनांचा त्यात समावेश होतो. तुम्ही जर यासंबंधी आणखी वाचन केले तर लक्षात येईल की, योग गरोदरपणात करत येतो. तुम्हाला गरोदरपणात कोणती आसने करता येतील त्याची माहिती आम्ही देत आहोत.

१. सुखासन

२. खांदे उचलणे

३. मानेचे व्यायाम

४. पर्वतासन

५. कोनासन -१

६. कोणासन -२

७. त्रिकोणासन

८. वीरभद्रासन

 

९. शवासन

ह्या प्रकारची योगासने तुम्ही करू शकतात पण प्रत्येक गर्भवती स्त्रीचे स्वास्थ वेगवेगळे असते तेव्हा तुम्हाला जी आसने करायला सोपी व कोणताही त्रास होत नसेल तर करावीत. नाहीतर साध्या शारीरिक हालचाली कराव्यात. ही योगासने तुम्हाला सहज, सुलभ, बाळंतपण, आणि बाळंतपणानंतर लवकर पूर्ववत होणे याच्यासाठी मदतशील ठरतील. पोटावर दबाव पडणारी आसने आणि इतर अवघड आसने गर्भावस्थेच्या प्रगत टप्यात करू नयेत.

पहिल्या तिमाहीत उभाने करायची योगासने करावीत कारण त्याने पायांना बळकटी मिळते. रक्तभिसरण सुधारते, ऊर्जेची निर्मिती होते आणि पायात येणाऱ्या मुंग्या बंद होतात.

दुसऱ्या तिमाहींत तुम्ही आसने करण्याचा वेळ कमी करावा. त्याने थकवा आणि शीण येणार नाही. त्याऐवजी श्वसन आणि ध्यान ह्याच गोष्टी कराव्यात.

तसेच गर्भावस्थेच्या दहाव्या आठ्वड्यापासून ते चौदाव्या आठ्वड्यापासून सराव करू नये. ओटीपोटाला प्रमाणाबाहेर ताणून खूप ताण येऊ देऊ नका. शरीराला पीळ देणारी आसने करताना जास्त भर खांदे आणि पाठीच्या वरच्या भागावर द्यावा. उलटे होणे पूर्णपणे टाळावे. जी आसने तुम्हाला कठीण वाटत असतील ती बिलकुल करू नये.

नियमित योग करण्याचे फायदे

योग तुम्हाला डिलिव्हरीसाठी मानसिक व शारीरिक दृष्ट्र्या कणखर व सशक्त बनवत असतो. कारण योग करण्यामुळे तुम्ही अविचल, आणि निरोगी बनतात. खूप मोठ्या प्रमाणात रोग प्रतिकार शक्ती वाढते. आणि तुमच्या शरीराला कार्यशील होण्याबरोबरच सकाळी होणाऱ्या उलट्या, सिकनेस, बद्धकोष्ठता त्यांच्यावरही मात करते. बाळंतपण नॉर्मल व्हायला अडचण येत नाही. गर्भाशय आणि गर्भनलिका यांच्यातील तणाव कमी करून ओटीपोट उघडे करून बाळंतपण सुखकर पार पाडण्यास मदत करते.  

Leave a Reply

%d bloggers like this: