copper-ti-mhanje-kay

तुम्ही कॉपर-–टी या गर्भनिरोधक पद्धतीबद्दल नक्कीच ऐकले असेल. हे एक गर्भधारणा रोखण्यासाठी वापरले जाणारे उपकरण ( IUD ) आहे. हे प्लास्टिक आणि तांब्यापासून बनवले जाणारे छोटे आणि लवचिक असे साधन आहे. डॉक्टरांच्या मदतीने अतिशय सोप्प्या रीतीने हे गर्भाशयात बसवून घेते येते.

हे उपकरण दीर्घ आणि निश्चित काळासाठी काम करते आणि आपल्या इच्छेनुसार याला काढूनही टाकता येऊ शकते. कॉपर-टी चे फायदे आहेत परंतु सगळ्यांसाठीच हे लाभदायक असेल असे खात्रीने सांगता येत नाही.   
(IUD) चे दोन प्रकार आहेत आणि कॉपर-टी हे त्यापैकीच एक आहे.

१. संप्रेरकीय गर्भनिरोधक ( हार्मोनल IUD)


हार्मोनल गर्भनिरोधक लेवोंनरगेस्टरल नावाचे कृत्रिम संप्रेरक शरीरात सोडतात. ह्या संप्रेरकात प्रोजेस्टेरोन असतात. प्रोजेस्टेरोन एक संप्रेरक आहे जे मासिक पाळी दरम्यान अंड्याची निर्मिती होण्यास रोखते जेणेकरून अंडे गर्भात रुजणार नाही आणि गर्भधारणा होण्यापासून रोखली जाते. संप्रेरक गर्भनिरोधक (IUD) हे कॉपर-टी (IUD) पेक्षा जास्त परिणामकारक असतात.     

२. कॉपर –टी (IUD)


हे सर्वात जास्त वापरले जाणारे गर्भनिरोधक आहे. हे तांब्याच्या तारांनी गुंडळलेले T आकारातील प्लास्टिकचे उपकरण गर्भाशयात बसवले जाते. हे उपकरण १० वर्षापर्यंत शरीराच्या आत ठेवले जाऊ शकते. यास महत्वाचे गर्भनिरोधक मानले जाते.

हे कसे काम करते ?
सर्व गर्भनिरोधक शुक्राणूंना हानी करून किंवा मारून निषेचन प्रक्रिया रोखतात. कॉपर-टी गर्भाशयाच्या लायनिंग वर प्रभाव करते जेणेकरून अंडे निषेचित जरी झाले तरी गर्भाशयाच्या भिंतीवर बीज रुजू शकत नाही आणि त्याचा विकास थांबतो. म्हणजेच गर्भधारणा होऊ शकत नाही.

संप्रेरक गर्भनिरोधक आणि कॉपर –टी दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात.

कॉपर-टी  हे तांब्याच्या तारांनी गुंडाळलेले ‘T’ आकारातले प्लास्टिकचे उपकरण आहे. तांबे हे शुक्राणूंसाठी हानिकारक असते कारण ते त्यांना नष्ट करून टाकते. तसेच गर्भाशय आणि फिलोपाईन ट्यूब मध्ये याद्वारे असे द्रव निर्माण केले जाते जे शुक्राणूंना मारण्यास सक्रीय असते. हे द्रवात पांढऱ्या रक्तपेशी, तांबे आणि काही एनझायम्स उपस्थित असतात. या उपकरणाला एक धागा देखील जोडलेला असतो जो याची योग्य स्थिती जाणून घेण्यास मदत करतो.   

कॉपर –टी चे फायदे.
हे गर्भधारणा रोखण्यासाठी एक प्रभावी मध्यम आहे. याचा वापर करून तुम्ही कृत्रिम सम्प्रेरकांशिवाय नको असलेल्या गर्भधारणेला रोखू शकता. यामुळे शारीरिक संबंध ठेवण्या आधी पुर्वसुरक्षा घेण्याची गरज पडत नाही. तुम्हाला गर्भधारणेची इच्छा असल्यास हे उपकरण कधीही काढून टाकता येऊ शकते. हे उपकरण काढल्यास त्याचा प्रभावही बंद होतो. इतर गर्भनिरोधकांच्या तुलनेत हे स्वस्त देखील आहे.

कॉपर- टी चे तोटे 

हे उपकरण यौन संक्रमित रोगांपासून (STD) सुरक्षा देऊ शकत नाही. अनेक महिलांनी याच्या वापरानंतर पाळी दरम्यान दुखणे, अनियमित मासिक पाळी , अति-रक्तस्त्राव अशा समस्या अनुभवल्या आहेत. काही काळानंतर या समस्या कमी झाल्याचेही त्यांचे संदर्भ आहेत. काही वेळा हे उपकरण त्याच्या प्राथमिक जागेपासून हलते, परंतु त्याच्याशी जोडलेल्या धाग्याने त्याला पूर्ववत आणले जाऊ शकते. स्त्रीरोजतज्ञ याची तपासणी करून या उपकरणाला परत योग्य ठिकाणी बसवू शकतात.  

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 
  

Leave a Reply

%d bloggers like this: