तळ हाताची त्वचा ही खुप नाजूक असते. थंडी,सतत पाण्यात काम करणे अति सोडा युक्त साबण अश्या विविध कारणामुळे हाताची त्वचा कोरडी होते व हात खरखरीत होतात. पुढील काही घरगुती उपायांनी हात मऊ होण्यास मदत होईल.
खोबरेल तेल आणि साखर
खोबरेल तेल आणि साखर यांची पेस्ट तयार करून ती हाताला लावा. पिठी साखर असल्यास उत्तम. खोबरेल तेलामुळे त्वचेत ओलावा टिकून राहतो आणि साखरेमुळे खरखरीत त्वचा मऊ होण्यास मदत होते. ही पेस्ट ५ ते ७ मिनटे हाताला लावा नंतर हात स्वच्छ धुवा. फरक जाणवेल.
पेट्रोलियम जेली आणि मोजे
हाताच्या त्वचेचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी रात्री झोपताना हात स्वच्छ धुवून कोरडे करून त्याला पेट्रोलियम जेली लावा व नंतर मोजे घाला.
मध लिंबू , बेकिंग सोडा पॅक
यह मध लिंबू बेकिंग सोडा एकत्र करून त्याचा पॅक तयार करा आणि हा पॅक ५-७ मिनटे हाताला लावा. हा पॅक हाताला नैसर्गिक मॉश्चराइज करतो. लिंबू आणि बेकिंग सोडयामुळे हटवार असलेले डाग किंवा उन्हामुळं आलेला काळपटपणा पण कमी हण्यस मदत होईल
केळ्याचे साल
केळ खाऊन झालं कि आपण साल टाकून देतो. पण त्याच केळ्याच्या सालाच उपयोग हात मऊ आणि चमकदार बनवण्यास उपयोग होतो. केळ्याचा सालाच आतला भाग हाताला चोळावा. त्यामुळे हात मऊ आणि चमकदार होतील.
मसाज आणि मॅनिक्युअर
तळ हाताला रोज खोबरेल तेलाने २ मिनटे मसाज करावा. त्यामुळे हात मऊ होण्यास मदत होईल. शक्य असल्यास महिन्यातून एकदा मॅनिक्युअर करून घ्यावे.