samjun-ghya-tumchya-balache-vajan


पालकांकडून सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे “आमच्या बाळाचे वजन योग्य आहे ना ?” या प्रश्नाचे उत्तर केवळ हो किंवा नाही मध्ये देता येत नसते. यासाठी विचार घेतल्या जाणाऱ्या सगळ्या बाबींना आपण येथे जाणून घेऊ.

जास्त करून जी बालके पूर्ण काळानंतर जन्मलेली असतात म्हणजेच गर्भावस्थेचे ३८-४० आठवडे, त्यांचे वजन ५-१० पौंड (२.२६ ते ५.४३ किलो) एवढे भरते. जर तुमचे बाळ या  गटात येत असेल तर त्याच्या वजनाची काळजी करायची काहीच काळजी करायची गरज नाही. काही बाळांचे वजन किंवा आकार सामान्य पेक्षा जास्त किंवा कमी असून देखील त्यांचे स्वास्थ्य उत्तम असते. बाळाचे जन्मावेळीचे वजन, आकार किंवा उंची याचा मोठे झाल्यावरच्या उंचीशी काही संबंध नसतो.


ज्या बाळाचे वजन २.५ किलो (५.५ पौंड) पेक्षा कमी भरते त्याला कमी वजनाचे बाळ समजले जाते. जवळपास ५०% जुळी बालके आणि ९०% तिळी बालके मुदतपूर्व जन्माला येतात म्हणजेच ३७ आठवड्यांपूर्वीच त्यांचा जन्म होतो. asअश्यांचे  वजन २.५ किलो च्या खाली असते.ज्या बाळांचे वजन जन्मावेळी ४ किलो (८.८ पौंड) असते अशी बालके सामान्य पेक्षा जास्त वजनाची समजली जातात. या स्थितीला मॅक्रोओमिनिया असे म्हटले जाते. मातेला गर्भारपणात मधुमेह झाला असेल तर बाळाचे वजन अशाप्रकारे जास्त भरतेबाळाचे वजन हे जास्त करून मातेच्या गर्भावस्थेतील स्वास्थ्यावर  आणि आहारावर अवलंबून असते.

बाळाच्या पालकांची उंची त्यांची शारीरिक ठेवण, आरोग्य आणि सोबतच बाळ हे पालकांचे कितवे अपत्य आहे हे देखील बाळाचे वजन ठरवते. जसे, पहिले अपत्य दुसऱ्या किंवा तिसऱ्या अपत्यापेक्षा कमी वजनाचे असते. मुलगी असेल तर तिचे जन्मावेळी वजन (मुलापेक्षा) कमी भरते अथवा जुळे किंवा तिळे झाल्यास त्यांचे प्रत्येकी वजन कमी असते.
नवजात बालकांचे जन्मानंतर ५-७ दिवसात वजन कमी होणे अपेक्षित असते. फोर्मुला असलेले द्रव दिले जाणाऱ्या बाळांचे वजन ५% पर्यंत कमी होणे सामान्य आहे. तर योग्य स्तनपान चालू असणाऱ्या बाळांचे वजन ७%-१०% कमी होऊ शकते.

तुमच्या बाळाचे वजन घटत असणे हे तुम्हाला साहजिकच काळजीचे वाटत असेल पण चिंता करू नका, बाळाचा रोजचा योग्य आहार सुरु झाला की त्याचे वजन आपोआप वाढेल.जास्तीत जास्त १० -१५ दिवसांमध्ये बाळाचे घटलेले वजन परत वाढणे योग्य आहे. जर बाळाचे वजन मोठ्या प्रमाणात कमी झाले असेल, बाळ आजारी असेल, किंवा मुदतपुर्व जन्माला आलेले असेल तर अशा बाळांना घटलेले वजन वाढून जन्मावेळीच्या वजनाएवढे वजन भरण्यास ३ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.


६ महिन्याच्या बाळाचे वजन जन्मवेळेच्या वजनापेक्षा दुप्पट भरते. यानंतर बाळाची वाढ कालांतराने धीम्या गतीने होत जाते. तुमच्या बाळाचे वजन कधीतरी वाढीच्या परिणामांमुळे सामान्यपेक्षा अधिक होऊ शकते किंवा आजारपण आणि अन्य कारणांमुळे सामान्यपेक्षा घटू शकते. शेवटी बाळाच्या वजनाचे चढ-उतार त्याच्या चयापचय यंत्रणेवर आणि आहारावर अवलंबून असते. त्याच्या शरीराची ठेवण, पचनक्रिया, आजूबाजूचे हवामान आणि अन्न यांचे परिणाम बाळाच्या वजनावर होत असतात.   

तुम्ही तुमच्या बाळाच्या वजनाच्या चढ-उतारांची आणि त्याच्या कारणांची योग्य तपासणी वेळोवेळी करून घेण्यास विसरू नका. सोबतच त्याचे योग्य उपचार होतील यासंबंधी काळजी घ्या.

Leave a Reply

%d bloggers like this: