busy-mom-sathi-kahi-beauty-hack

मुलांकडे लक्ष देणे कुटुंबातील इतर सदस्यांकडे लक्ष देणे, घरातील इतर कामं, ऑफिसच्या डेडलाईन सांभाळणं. यामध्ये तुम्हांला स्वतःला द्यायला फार कमी वेळ उरतो. आणि टापटीप पण कसं दिसायचे असा प्रश्न     अनेक स्त्रियांना पडतो. अश्या वेळी काही युक्त्या वापरून तुम्ही कमी वेळात टापटीप आणि सुंदर दिसू शकता. या युक्त्या कोणत्या त्या आपण पुढे पाहणार आहॊत.

१. आयब्रो

जर तुमचे आयब्रो खूप  वाढले असतील आणि विचित्र दिसत असतील आणि तुम्हांला ते ठीक करायला वेळ नसेल तर त्याला  लीप बाम किंवा पेट्रोलियम जेली लावून स्पुली ब्रशने किंवा बोटाने  तात्पुरते ठीक करू शकता .

२. कुरळे केस

केस कुरळे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा रात्री झोपताना केसाच्या छोट्या छोट्या वेण्या घालाव्या सकाळी उठल्यावर वेण्या सोडल्यावर तुम्हांला कुरळे केस मिळतील, असे कुरळे केस जास्त दिवस टिकत नाही पापं आयत्यावेळचा उपाय म्हणून वापरता येऊ शकतात आणि यामुळे केस कुरळे करायच्या मशीनमुळे  केसांची हानी देखील वाचू शकते.  

३.आय लाईनर

आय लाईनर प्रत्येक वेळी नीट लागतंच असं नाही आणि घाई गडबडीत तर नक्कीच काहीतरी चुकतं. अश्यावेळी की सगळं पुसून पूर्ण मेकअप खराब करण्यापेक्षा एक कापसाचा छोटासा तुकडा असलेला काडीने (cotton swab) ला मेकअप रिमुव्हर किंवा तेल लावून हलकेच तो भाग पुसून घ्यावा. पण हे काम फार सावधगिरीने आणि हलक्या हाताने करावे आणि मेकअप रिमुव्हर पेक्षा तेलाचा वापर योग्य ठरेल ज्यामुळे डोळ्याला देखील काही इजा होणार नाही.

४. पटकन होणारी हेअर स्टाईल 

 

मोठ्या रबर ने केस वर बांधण्याची आजकाल फॅशन आहे. यामुळे केस नीट बांधले जातातच तसेच  काम करताना त्याचा त्रास होत नाही, गरम होत नाही आणि केस बांधायला फार वेळ लागत नाही आणि यासाठी आरसा समोर असण्याची गरज लागत नाही. हे दिसायला देखील स्टायलिश दिसते. अचानक कोणता कार्यक्रम ठरला किंवा सगळ्या कामाच्या नादात

५. काही मिनटात केस करा काळे.

जर तुम्हाला केस कलर करायला वेळ मिळाला नाही तर टेन्शन घ्यायची गरज नाही आजकाल बाजारात इन्स्टंट हेअर कार जे लिपस्टिक किंवा काजळा सारखा असता त्याने केस काळे करत येतात. किंवा काजल स्टिकने सुद्धा पांढरे झालेले केस तात्पुरते लपवता येतात. फक्त हे लावल्यावर कपड्याची काळजी घ्या.

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: