balachya-aaharat-masalyachya-vividh-chavincha-samavesh

डॉक्टरच्या म्हणण्यानुसार मसाल्याची पदार्थ बाळाच्या आहारात ८ महिन्यानंतर वापरता येतात. त्याबद्धल खूप आश्चर्यचकित होऊ नका. कारण घरातली जुनी लोक तर ६ महिन्यापासूनच बाळाला स्पायसी (मसाल्याचे पदार्थ) खाऊ घालायला लावतात. म्हणून लगेच घाई करू नका. पण खाण्याबाबत हा बदल का करत असतील ? कारण, बाळाला आपण जे जेवण बनवतो ते खाण्याची त्याला सवय लागेल म्हणून त्याला मसाल्याचे पदार्थ किंवा स्पाइसी खाण्याची सवय करायची असते. त्यांना जेव्हा स्पाइसी खाण्याची ओळख करून देणार तेव्हा थोडेसे व एकाच वेळी खाण्यात द्या. म्हणजे काही ऍलर्जिक साईड इफेक्ट होणार नाहीत. मसाल्याचा पदार्थ एकाच वेळी द्यायचा आणि त्यानंतर ५-६ दिवसांनी दुसरा पदार्थ खाऊ घालायचा. वाटल्यास मिरची वापरू नका. मग त्यानंतर हळूहळू व थोडे- थोडे लसूण, आले, हिंग, जिरे, बडीशोप, धने, मोहरी, मेथी, हळद, इ. पदरात थोडे – थोडे ६ दिवसात खाऊ घालायचे.

भारतीय मसाले बरेच आरोग्याच्या समस्यांवर रामबाण इलाज म्हणून ओळखले जातात. तसेही भारतातल्या प्रत्येक घरात मसालेयुक्त पदार्थ बनवतात. जसे की, ओवा आणि बडीशोप पचन क्रिया सुधारते. हळद ही वेदनाशामक आहे. आणि यांच्यात अँटी-ऑक्सिडंट गुणही आहेत.

खालील प्रकारे तुम्ही बाळाला मसाल्यांची ओळख करून देऊ शकतात

१) लवंगाचा तुकडा व आल्याचा तुकडा तुम्ही स्वयंपाक करताना टाकू शकता.

२) बाळासाठी स्वयंपाकात किंवा नाश्ता बनवत असताना चिमूटभर हळद टाकून द्यायची.

३) वरण, भात आणि भाज्यांमध्ये तुम्ही बडीशोप, मोहरी, जिरे एक चम्मच टाकू शकता.   

४) दालचिनी, जायफळ, आणि इलायची खीर किंवा इतर गोड पदार्थांमध्ये तुम्ही टाकू शकता.

५) पुदिना, धनिया, हे सुद्धा तुम्ही भाज्यांत व वेगवेगळ्या पदार्थात वापरू शकता.

 १८ महिन्यानंतर तुमचे बाळ मसाल्यांच्या पदार्थाना ओळखायला लागेल आणि त्याला ती पदार्थ आवडायलाही लागतात. त्यानंतर वाटल्यास तुम्ही काळी मिरची खूप कमी प्रमाणात देऊ शकतात.  

 बाळाला हे पदार्थ दिल्यानंतर जर बाळाला काही ऍलर्जि होत असेल तर एकदा डॉक्टरांशी बोलून घ्यावे. किंवा मसाल्याची मात्रा कमी करावी

 बेंगळुरूच्या मॉमसाठी, खुशखबर .

टाईनी स्टेप नैसर्गिक घटक असणारे  फ्लोर क्लीनर लॉन्च करत आहे जे आपल्यासाठी, आपल्या बाळाला आणि आपल्या घरासाठी सुरक्षित आहे. तर मग आता  जंतू आणि रसायनयुक्त फ्लोर क्लीनर नाही म्हणा! प्रीलाँच ऑफरचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

Leave a Reply

%d bloggers like this: