garodarpnat-tabyachya-bhandyat-pani-pinyache-phayade

 

प्राचीन काळापासून भारतात तांबे या धातूला खूप महत्व दिले आहे. आयुर्वेदाच्या नुसार तांब्यात ठेवलेल्या पाण्यामुळे वात, पित्त, आणि कफ ह्या गोष्टी संतुलित राहून स्थिर राहतात. तांब्याचे आरोग्याला खूप फायदे असायचे म्हणून जुनी लोक तांब्यात पाणी प्यायचे, तांब्याचीच भांडी वापरायचे. या लेखात तुम्हाला तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे फायदे सांगणार आहोत.

१) गरोदरपणात रोग प्रतिकार शक्ती वाढते

       तांब्याच्या भांड्यात असलेल्या पाण्यात कॉपर बॅक्टरीया जिवंत राहत नाही किंवा येत नाही.  याचमुळे गरोदर स्त्रीची रोग प्रतिकार शक्ती वाढते.

२) रक्ताच्या वाढीस मदत

तांब्यामुळे रक्त वाढण्यास तर मदत होतेच पण त्यासोबत गर्भात वाढणाऱ्या बाळाचे हृदय, हृदयाच्या पेशी, स्नायू आणि बाळाची हाडं मजबूत होतात. आणि बाळाच्या मानसिक विकासात चांगली मदत होते.

३) तांब्याला पोषणाचा स्रोत मानतात

 

प्राचीन काळी राजे आणि महाराजे ह्यांच्या राजवाड्यात तांब्याची भांडी असायची आणि त्यातच ते जेवण करायचे व पाणी प्यायचे. आजही भारतातल्या काही राजेशाही हॉटेलात तांब्याचेच असतात. राजधानी एक्सप्रेस मध्ये तांब्याची भांडी असतात त्याचे कारण हेच आहे की तांब्यामधून पोषक घटक मिळतात. बुद्धीसुद्धा कुशाग्र व तेज होते. गरोदर स्त्रीला जर पॅरालिसिसचा झटका आलाच तर त्यापासूनही बचाव होतो.

४) शरीरात pH  ची लेव्हल संतुलित होते

तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्याने ते अल्कलाईन होते. त्यामुळे शरीराची pH लेव्हल संतुलित होण्यास मदत मिळते.

५) तांबे वजन घटवण्यासाठी मदत करते

तांबे पचनक्रिया सुधारते त्यामुळे शरीरातील विषयुक्त व अनावश्यक घटक बाहेर पडून जातात. आणि पोटाची चरबीही कमी व्हायला लागते. आपल्या त्वचेत जी फ्री रॅडिकल्स असतात त्यामुळे म्हतारपण येते. या घटकाला तांबे कमी करते त्यामुळे त्वचा खूप दिवसापुरता तरुण व तेजस्वी होते.

६) शरीराची सूज कमी करते

तांबे अर्थराइट्स चे पेशंट आणि ज्यांना सांधेदुखीची समस्या आहे त्यांच्यासाठी लाभदायी असते. गरोदर स्त्रियांना सकाळी पाय सुजतात, शरीर जड होते या सगळ्यां दुखण्यावर तांबे राहत देते.  ज्यांना तांब्याचे फायदे माहिती नसतील त्यांना शेअर करावे. 

Leave a Reply

%d bloggers like this: