kelyacha-salache-upayog

केळी खाऊन झाल्यावर सालं टाकून देतो पण या केळ्याच्या सालचे अनेक उपयोग होतात. ते कोणते ते आपण पाहुया

१. दातांची स्वछता

    हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे केळ्याच्या सालाने तुम्ही नैसर्गिकरित्या दात पांढरे स्वच्छ करू शकता. केळ्याचा  सालाचा एक तुकडा घ्या आणि त्याची पांढरी बाजू दातावर चोळा. असे दररोज केल्यावर त्याचा फरक काही आठवड्यात जाणवू लागेल. दात स्वच्छ आणि शुभ्र होतील.

२. डोळ्यांसाठी गुणकारी

केळ्याचा सालामध्ये जैन्थोफिल ल्यूटिन आढळून येते. हे एक  कैरोटेनाॅइड व एंटिऑक्सीडेंट आहे  और यह जे डोळ्यांवरचा  तणाव कमी करतो आणि याच्या सेवनाने डोळ्यांच्या बाबतीतील बऱ्याच समस्या कमी होतात. परंतु केळ्याचे  साल खाताना हे लक्षात असू द्या कि ते केळे नैसर्गिकरित्या पिकवले गेले असले पाहिजे. त्यावर कोणत्याही रसायनाचा वापर झाला नसेल तरच ते खावे.

३. चेहऱ्याच्या त्वचेसाठी उपयुक्त

चेहऱ्याच्या त्वचेमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी केळ्याचा सालाच  उपयोग होतो. तसेच चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग घालवण्यास देखील हे उपयुक्त आहे. तसेच  मुरमामुळे होणाऱ्या बॅक्टेरियल इन्फेक्शन पासून रक्षण करते. याकरता केळ्याच्या सालाच पांढरा भाग चेहऱ्यावर हळुवार चोळावा. 

४. चामड्याच्या वस्तू  स्वच्छ करण्यासाठी

कोणत्याही प्रकारच्या चामड्याचा वस्तू जसे सोफा कव्हर,उशीचे कव्हर,चामड्याचे बूट, बेल्ट,बॅग यावर जर केळ्याच्या सालाच पांढरा भागाने या वस्तू साफ केल्यास या वस्तू चमकदार होतात.

५. किड्याचा दंशावर उपाय

डास,मुंगी झुरळा या सारखे किडे (साधे)चावल्यावर त्या ठिकाणची होणारी आग आणि खाज केळ्याचे  सालांचा पांढरा  भाग त्या ठिकाणी चोळल्यामुळे येणारी खाज आणि होणारी आग कमी होत. परंतु विषारी किडा  चावल्यास हा उपाय लागू होत नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: