mulanche-sangopn-keval-aaiechi-javabdari-ahe-ka

आपल्या समाजाचे  चित्र वेगाने बदलते आहे. स्त्रीला तिच्या करिअर वर पूर्ण लक्ष केंद्रीत करून  प्रगती करता यावी  यासाठी  पुरुष स्वयंपाक आणि इतर घरकामात मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत.  हा एक खूपच मोठा बदल म्हणावा लागेल,कारण काही दशकांपूर्वी पर्यंत कुटुंब व्यवस्थेचे चित्र काहीसे वेगळे होते, तरीही मुलांचे संगोपन हा कौटुंबिक कर्तव्याचा एक महत्वाचा भाग आहे. आणि पुरुषांनी यात आपला वाटा उचलावा कि नाही हा महत्त्वाचा प्रश्न उरतोच.

सर्वच क्षेत्रांत आपल्या समाजाने लक्षणीय प्रगती केलेली असली तरीही जेव्हा मुलांचा सांभाळ करण्याचा प्रश्न उभा रहातो तेव्हा स्त्री-पुरुष भेदभाव अजूनही अस्तित्वात असल्याचे दिसून येते. एकीकडे,काही पुरुष मुलांना सांभाळण्यात हातभार लावतात खरे पण हि जवाबदारी खऱ्या अर्थाने एका स्त्रीवरच येते. आणि पुरुषांच्या  तूलनेत तिच्यासाठी हे सर्व खूपच दमवणारे असते. आणि हाच  तर खरा मुद्दा आहे. एका छोट्याश्या  पाहुण्च्या आगमनानंतर आईच्या आयुष्यात पूर्णपणे बदल घडून येतो,तर दुसरीकडे बाबाचे आयुष्य सुरळीत चालू राहते आणि त्याच्या आयुष्यात बदल होणे  हे अपेक्षित ही नसते.खासकरून त्यांचे काम.

बाळंतपणानंतर स्त्रियांना मिळणारी मातृत्व रजा हे त्याचे ठळक उदाहरण म्हणावे लागेल. भारतीय कामगार कायदयानुसार बाळंतपणानंतर स्त्रीला मातृत्व रजा मिळणे बंधनकारक आहे कारण एका नवजात शिशुसाठी आईने भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या जवळ असणे गरजेचे असते. आणि विरोधाभास म्हणजे पितृत्व रजा अशा कोणत्याही संकल्पनेवर आधारलेली  नाही. बाळाच्या देखभालीसाठी आईने घरीच थांबणे किंवा काही काळासाठी नोकरी सोडून देणे हेच पर्याय असतात. प्रसूतीलाभ कायदा २०१६ हा बाळाच्या आवश्यक असणाऱ्या देखभालीसाठी स्त्रीला पूर्ण  पगारी रजा मिळण्याची शाश्वती देतो, तर दुसरीकडे,खास करून खाजगी क्षेत्रात पुरुषांसाठी अशा रजेच्या तरतूदी खूपच कमी किंवा नसल्या सारख्याच आहेत. मुलांच्या संगोपनाच्या  जवाबदारीतील या स्त्री-पुरुष भेदभावामूळे स्त्रीला तिचे करिअर बाजूला ठेवून घरीच राहणे  भाग पडते. काही स्त्रियांसाठी हा बदल खूपच निराशपूर्ण असू शकतो तर काही जणींना एका गृहिणीची भूमिका निभावण्याचा बदल स्वागतार्ह वाटतो.

कौटुंबिक  आघाडी वर मुलांना सांभाळण्याची जवाबदारी फक्त स्त्रियांना घेताना पाहून आपली पुढची पिढी याचेच अनुकरण करेल. एवढेच नव्हे तर कामाच्या ठिकाणी लागू असणारे असे कायदे ज्यात पुरुषांसाठी रजेच्या कोणत्याही विशेष सुविधा नाहीत आणि यामुळे बालसंगोपनाची जबाबदारी  घेण्यात त्यांना एक पाऊल मागे घ्यावे लागते स्त्रियांना तर स्वतःचे करिअर पुन्हा नव्याने सुरु करणे कठीण होऊन बसते

ज्या स्त्रिया केवळ मूल सांभाळायचे म्हणून स्वतःच्या करिअरचा त्याग करत नाहीत.त्यांना बरेचदा स्वःताच्या असंवेदनशील समजले जाते. पण पुरुष पितृत्व आणि स्वतःचे करिअर या दोन्ही गोष्टींचा आनंद कुठल्याही तणावाशिवाय पूर्णपणे घेऊ शकतात. स्त्रियांना घर आणि करिअर यांचा समतोल कसा साधावा याची चिंता सतावत असते, सोबतच स्वतःच्या क्षमतांसोबत खूप मोठी तडजोड करण्याचा एक नकळत ताण त्यांच्यावर येतो

कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यासाठी कामांच्या वेळेत बदल करणे किंवा पितृत्व राजा घेणे किंवा घरातील गरजेनुसार कामाच्या वेळा साधने या बाबी पुरुषांना कराव्याच लागत नाहीत.  दुसरीकडे स्त्रिया नौकरीच्या ठिकाणी कामासोबतच बाळाचाही सांभाळ व्हावा यासाठी, पाळणाघराची मागणी करतात, पण पुरुषांनी अशी मागणी केल्याचे आपण क्वचितच ऐकले असेल.

Leave a Reply

%d bloggers like this: