prasuti-klachya-babtitt-kahi-sadharan-sanket

साधारणतः ४०व्या आठवड्यानंतर किंवा नवव्या महिन्यानंतर सामान्य परिस्थितीतील गरोदर स्त्रीला प्रसूतीकळा येऊ लागतात. प्रत्येक स्त्रीला येणाऱ्या कळांची वेळ आणि दिवस प्रत्येक स्त्रीच्याबाबतीत वेगवेगळ्या असु शकतात. याचा अंदाज तुम्हाला डॉक्टर सोनोग्राफीच्या आधारे देऊ शकतात. साधरणतः डॉक्टरांनी दिलेल्या प्रसूतीची तारीख जवळ येताच शरीरातील जाणवणाऱ्या बदलबाबत जागरूक राहा. प्रसूती कळा सुरु झाल्या आहेत हे समजण्यासाठी पुढील काही साधारण संकेत लक्षात घ्या आणि आणि ते जाणवल्यास लगेच डॉक्टरांकडे जा.

१.ओटीपोटातून सतत येणाऱ्या कळा

जर तुम्हाला ओटीपोटातून तीन ते चार तास  न थांबत सतत कळा येत असतील तर तुमची प्रसूतीची वेळ जवळ आले असण्याची शक्यता असते. कधी-कधी अश्या कळा आल्या तरी प्रसूती होण्यास वेळ असतो. पण तरीही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि अश्या कळा डॉक्टरांनी दिलेल्या तारखेच्या आसपास आल्या तर लगेच डॉक्टरांना संप्रर्क करा

२.योनीचा भागात (गर्भाशयाचे)आंकुचन-प्रसरण झाल्यासारखे वाटणे.

जर ओटीपोटातील कळा सुरु होणं त्या थोड्या प्रमाणात कमी झाल्या असतील आणि गर्भाशयाचे आकुंचन प्रसन्न होत असेल तर तुम्हाला त्वरित हॉस्पिटलमध्ये जाणे जरुरी असते. यावेळी तुम्ही जाणवणाऱ्या या प्रसारण आकुंचनबाबत निरीक्षण करा. जर तुम्हाला या कळा दहा ते पंधरा मिनिटांनी येत असतील तर तुमची डिलिव्हरी जवळ आल्याचा संकेत आहे. पण हे आकुंचन-प्रसारण अनियमित असल्यास फॉल्स लेबर असू शकतात पण तरी त्यावेळी तुम्ही डॉक्टरांकडे जाणे गरजेचे असते.

३.योनीतुन रक्तस्त्राव होणे.

 डॉक्टरांनी दिलेल्या प्रसूतीच्या तारखेच्या आसपास योनीतुन रक्तस्त्राव होण्यास सुरवात झाली तर प्रसूतीसाठी दवाखान्यात त्वरित जाणे गरजेचे असते.

४. गर्भजल बाहेर येणे.

 तुमची गर्भजलाचे पाणी बाहेर येऊ लागल्यास देखील तातडीने हॉस्पिटल मध्ये जाण्याची गरज असते. यावेळी वाट बघणे हे धोकादायक ठरू शकते

५. बाळाची हालचाल न जाणवणे

तुमची तारीख जवळ आली असेल आणि बाळाची रोज जाणवणारी हालचाल जर जाणवत नसेल आणि अशी हालचाल बराच वेळ जाणवली नाही तर तातडीने डॉक्टरांकडे जाणे आवश्यक असते.

लक्षात असू द्या वरती दिलेले संकेत हे सर्वसाधारण आढळून येणारे संकेत आहेत. प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत हेच संकेत असू शकतात असे नाही. यापेक्षा काही वेगळ्याच प्रकारचे अनुभव येऊ शकतात. त्यामुळे गरोदरपणात आणि विशेषतः  प्रसूतीची तारीख जवळ आल्यावर स्त्रीने शरीरात होणाऱ्या बदलाचे निरीक्षण करावे आणि बदल जाणवल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच या काळात डॉक्टरांच्या सतत संपर्कात असावे.

Leave a Reply

%d bloggers like this: