garodar-rahanysathi-marathitun

 

  गरोदर राहण्यासाठी महिन्याच्या योग्य वेळी ‘फिलोपियन नलिकेत’ अंड्याला जाऊन वीर्यजंतू मिळायला हवा. त्याचे मिलन होऊन नंतर फलित झालेले अंडे खाली येऊन गर्भाशयाच्या भिंतीमध्ये रोवले गेले पाहिजे. आणि त्या ठिकाणी ते राहायला पाहिजे.

स्त्री जेव्हा बारा वर्षाची असते त्या वेळी मासिक पाळी सुरु होते. मासिक पाळी सुरुवातीला अनियमित असते. नंतर तो रक्तस्राव नियमित होतो. मासिक पाळी नियमित झाल्यावर ती २७ दिवसांनी येते. तसे प्रत्येक स्त्रियांमध्ये मासिक पाळीचा कालावधी वेगवेगळा असतो.

२५ ते ३५ दिवसांनी येत असलेली मासिक पाळी नॉर्मल असते. आणि एका स्त्रीमध्येच तिचे प्रमाण २ दिवसांपेक्षा जास्त किंवा कमी होत नाही. कारण एखाद्या स्त्रीचे मासिक चक्र २५ ते २९ दिवस इतके बदलू शकते पण २ दिवसांपेक्षा जास्त बदल असेल तर त्याला अनियमित पाळी म्हणता येईल.  आणि १८ ते ४५ वयापर्यँत मूल होऊ शकते.

दर महिन्याला पाळीच्या साधारणपणे चौदाव्या दिवशी परिपक्व झालेले स्त्रीबीज बीजकोषातून बाहेर पडते.

बीजवाहकी नलिका ते पकडते आणि स्त्रीबीजाचा प्रवास बीजवाहक नलिकेतून गर्भाशयपर्यंत सुरु होतो. याच कालावधीत स्त्री-पुरुष संबंध येऊन स्त्रीच्या योनीमार्गात वीर्य पडल्यास त्यातील काही शुक्राणू गर्भाशयमुखातून गर्भाशयात प्रवेश करतात. आणि गर्भाशयातून बीजवाहकनलिकेपर्यँत पोचतात. बीज वाहक नलिकेत वाट बघत असलेल्या स्त्रीबीजापाशी हे शुक्राणू येतात. यापैकी एका शुक्राणूंचा स्त्रीबीजाशी संयोग होतो. आणि या क्रियेलाच फलन झाले असे म्हणतात. अशाप्रकारे गर्भधारणा होत असते पण काही कारणांनी या प्रक्रियेला अडथळा येऊन गर्भधारणा होत नाही. तसेही गरोदर न व्हायला खूप कारणे असतात.

१) पूर्वीच्या संसर्गाने नलिका बंद झालेल्या असतात. गर्भाशयात फाइब्राइडची वाढ होते, ओव्हरीजमध्ये सिस्ट झालेले असतात. पण ही कारणे गर्भधारणेला अडथळा आणणारी फारच थोडी असतात.

२) गरोदर न राहण्यामागे मंद असे वीर्यजंतू असतात किंवा ते योनीत खोलवर गर्भाशय मुखाकडे पडत नसतात. त्यामुळे ते गर्भाशयात प्रवेश करू शकत नाही. अंड्याला योग्य दिवशी जाऊन फिलोपियन ट्यूबमध्ये मिळत नाही.

३) शुक्राणूंपासून फिलोपियन ट्यूबमध्ये फलित झाल्यावर स्त्रीबीजाचं रूपांतर गर्भात होत. गर्भ गर्भाशयात रुजण्यासाठी गर्भशयाच्या अस्तराची जाडी, योग्य वाढ, अस्त्रांमध्ये पुरेसा रक्तपुरवढा व्हायला पाहिजेत वाटल्यास या विषयी डॉक्टरांना विचारून घ्या म्हणजे गर्भ राहायला काही समस्या येणार नाही आणि जर एखादी समस्या असेल तर तिचे निदान होईल.

४) गर्भ राहण्यासाठी रोज संभोग व्हायला पाहिजे असे नाही. कारण जर रोज संभोग केल्यास तर वीर्यजंतू प्रभावी होत नाही कारण ते तेवढ्या प्रमाणात परिपकव झालेले नसतात. कारण वीर्यजंतू प्रभावी, सदृढ आणि जिवंत असायला पाहिजे. त्यासाठी ३-४ दिवसांनी संभोग घ्यावा.

५) गरोदरपणाला साह्य होण्यासाठी संभोग योग्य वेळी महिन्यात घ्यायला हवा. कारण मासिक पाळी सुरु झाल्यापासून ९ ते १५ ह्या दिवसात स्त्री गरोदर राहते.

  गरोदर राहण्यासाठी काय करता येईल. असा प्रश्न वाचकांकडून आला होतो म्हणून ही लेखमाला सुरु करत आहोत. लवकरच आम्ही डॉक्टरांशी संवाद करून देणार आहोत त्या वेळी तुम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळवू शकता. प्रसूतीच्या बाबतीत तुमचे जे ही प्रश्न असतील ते ही त्यांना विचारू शकतात.  नवीन ही लेखमाला सुरु करत आहोत.

Leave a Reply

%d bloggers like this: