lahan-mulatil-animiya

ऍनिमिया म्हणजे रक्तातील लाल पेशींमधील हिमोग्लोबिन या प्राणवायू (ऑक्सिजन) वाहून नेणाऱ्या घटकाची कमतरता होय. हिमोग्लोबिन हे लोह आणि प्रथिनांपासून तयार होते. या प्रक्रियेत  फॉलिक ऍसिडची सुद्धा गरज असते. आईच्या पोटात असताना हे सर्व घटक बाळाला आईच्या रक्तातून मिळतात. त्यामुळे जन्मानंतर सुद्धापहिले सहा महिने मुलांमध्ये  ऍनिमियाचे प्रमाण फार कमी असते. परंतु आईच्याच रक्तात या घटकांची कमतरता असल्यास. बाळात देखील ही कमतरता जाणवते. पण बाळ  ६ महिन्याचे झाल्यावर कदाचित  त्याचमध्ये ऍनिमियाची लक्षणे जाणवू लागतात.

ऍनिमियाची लक्षणे

जन्मात मुमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण साधारणतः १५ ते २० ग्राम% असते. मग ते हळू-हळू कमी होऊन ६ महिने ते ६ वर्षाच्या काळात हेच प्रमाण साधारणतः १०.५ ते १४ग्राम % असते. नंतर ते परत वाढू लागते. प्रौढांमध्ये ते साधारणतः १३च्या आसपास असते. मुलांधील ऍनिमिया कसा ओळखवा  याची साधारण करणे पुढील प्रमाणे

१) बाळ, मुल  पांढरे-फटक दिसू लागते.  

२)वारंवार आजारी पडणे.

३)भूक कमी होणे.

४)वजन न वाढणे.

५) अकारण चीड चीड.

६)मलूल  दिसणे.  

७)पायावर चेहऱ्यावर सूज.  

८)हृदयगती वाढणे.

९)लवकर दमणे.

 कारणे

मुलांमध्ये  होणाऱ्या ऍनिमियाची विविध करणे असू शकतात. त्यापैकी साधारण कारणे पुढील प्रमाणे

१)गरोदरपणात आईला ऍनिमिया असल्यास

२) अपुऱ्या दिवसाचे बाळ

३) मोठ्या मुलाच्या बाबतीत मुलांच्या आहारातील लोह आणि प्रथिनांची कमतरता

४) जंत, मलेरीया  किंवा किडनीचे आजर, काही आनुवंशिक आजार.

५) लाल पेशींच्या निर्मितीतील अडथळे

ऍनिमिया टाळण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, गूळ, पोहे, नाचणी, अळीव, राजगिरा आणि खजूर यांचा मुलांच्या आहारात समावेश करावा. आणि याबाबतीतील कोणतेही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांना देऊ नये.

 

Leave a Reply

%d bloggers like this: