mul-ajari-astanacha-ahar

आजारपणातील आहाराची पथ्ये ठराविक नसतात. प्रत्येक नुसार निरनिराळी असतात आणि त्या आजारानुसार आहारात थोडेफार बदल करावे लागतात. त्यापैकी काही साधारण आहारातील बदल

सर्दी-खोकला, ताप

भरपूर पाणी/पेय (घरगुती) खोकल्याची उबळ आणि ठसकालागणार नाही अश्या पद्धतीने

दुधाचे प्रमाण थोडे कमी करावे

गरम वरण-भात साजूक तूप असे द्यावे/मऊसर पेज ,मुगाची पातळ खिचडी पचायला हलके असे पदार्थ (७ ते ८ महिन्या पुढील मुलांना) 

फ्रिजमधले पाणी, बर्फ कोल्डड्रिंक्स, आईस्क्रीम देऊ नये

उलट्या जुलाब पोटदुखी

जुलाब आणि उलट्या मुले अंगातले पाणी कमी होण्याची म्हणजेच डिहायड्रेशनची शक्यता जास्त असते. हा धोका टाळण्यासाठी एक ग्लास पाण्यात १ चमचा साखर एल चिमूट मीठ पाण्यात घालून असे पाणी थोडे थोडे पाजावे  किंवा ORSचे पाणी पाजावे

भाताची पेज,भाताचे पाणी वरणाचे  पाणी दयावे

स्तनपान द्यावे मात्र वरचे दूध देऊ नये

तेलकट पदार्थ देऊ नये

काही जण कॉफी  आणि जायफळ देतात पण ते देखील अति प्रमाणात देऊ नाय

त्यामुळे पोट फुगून जास्त त्रास होण्याची शक्यता असते

कावीळ

या आजाराच्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने आढळणारे लक्षण म्हणजे मुलाची भूक मंदावणे आणि उलट्या. या आजारात आहार आणि पथ्या हे औषधांच्या जोडीचे औषध आहे.

या आजारात  डॉक्टरांच्या सल्ल्याने साखरेचे प्रमाण जास्त असलेले द्रव पाजत राहावे.

सर्व जीवनसत्वबरोबर अ जीवनसत्वे असलेल्या भाज्या डॉक्टरांच्या सल्ल्याने द्याव्या. गाजराचा रस, टोमॅटोचा रस , पालेभाज्या यांचे  आहारातील प्रमाण वाढवावे. तेलकट पदार्थ पूर्ण बंद करावे. (२ वर्षे आणि पुढील मुलें  )

तेलकट तुपकट मांसाहार जळजळीत तिखट पदार्थ देणे टाळावे.

वरील आहारातील बदल हे सर्वसाधारण बदल असून अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम ठरेल. 

Leave a Reply

%d bloggers like this: