palkani-mulasathi-pudhil-goshti-karne-avshyak-ahe

एका मुलाला जगात त्याचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्याचे आई वडील महत्वाची भूमिका बजावतात. मुलांच्या उज्ज्वल भविष्यसाठी ते दिवसरात्र झटत  असतात परंतु  मुलांना बऱ्याच वेळा  त्यांच्या भविष्यापेक्षा तुमच्या वर्तमानकाळातील काही क्षणाची आवश्यकता असते. मुलांचे भविष्य सुखकर करण्याच्या नादात पालक मुलांना वेळ देण्यात कमी पडततात. आणि यामुळे  पालकांचा आणि मुलांचा संवाद कमी झालेला आहे. आपल्या मुलांना आई-वडील असा दोघांचा सहवास मिळावा यासाठी पालकांनी पुढील गोष्टी कटाक्षाने करणे गरजेचे आहे

१. मुलांसाठी वेळ काढणे

मुलांना दोघांचा एकत्रित वेळ मिळावा यासाठी दिवसभरातील थोडा वेळ का होईना पूर्ण कुटूंबाने एकत्रित घालवावा. यावेळेत मुलांबरोबर गप्पा माराव्यात त्यांच्या आवडीच्या विषयावर  यामुळे मुलांना देखील आपल्याला महत्व दिल्यासारखे वाटेल.

२. मुलांबरोबर काही संस्मरणीय क्षण घालवावे

आपल्या मुलांबरोबर  काही अश्या आठवणी निर्मण कराव्यात ज्या तुम्हाला आणि मुलांना देखील संस्मरणीय ठरतील. या साठी जास्त काही करण्याची गरज नसते, मुलांबरोबर खेळणे, फिरायला जाणे एखादा सिनेमा बघणे. एखादा खेळ मुलांना शिकवणे. यामुळे तुमच्यातले आणि मुलांमधील मैत्री वाढेल.

३. मुलांना मार्गर्दर्शन करणे

मुलांना  काही समस्या असतील किंवा त्यांचा काही गोष्टी चुकत असतील तर त्यानं त्या नीट समजावून सांगून मार्गदर्शन करावे. त्यांच्या काही समस्या सोडवण्यास मदत करावी. त्यांना त्याचा खेळात अभ्यासात किंवा आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यांवर मार्गदर्शन करावे. मुलांना आपल्या आई वडिलांडी आपल्या आवडी निवडी लक्षात ठेवून  त्यांना प्रोहत्सान दिलेलं

४. आवडी-निवडी लक्षात ठेवणे 

मुलांना आपल्या आई वडिलांनी  आपली आवड आपले छंद  जाणून घेऊन त्यांना प्रोहत्सान दिलेलं आवडते. त्यामुळे मुलांच्या आवडीनं आणि छंदांना  कमी न लेखता. त्या समजून घेऊन त्याला प्रोहत्सान द्यावे.

५. मुलांचे महत्वाचे दिवस लक्षात ठेवणे 

मुलांचे वाढदिवस, त्यांचे शाळेतले कार्यक्रम , त्याचे निकाल, त्याच्या खेळाचे सामने हे सगळे दिवस लक्षात ठेवून यातील जास्तीत जास्त दिवसांमध्ये त्याच्या बरोबर कसे राहता येईल याचा प्रयत्न करावा.  

तुम्ही मुलांवर जीवापाड प्रेम करतच असता पण त्यांना तुमच्या कृतीतून काही गोष्टी अपेक्षित असतात आणि तुम्ही त्याच्या या क्षणांमध्ये बरोबर असणे त्यानं मानसिक बळ देणारे असते

Leave a Reply

%d bloggers like this: