premature-delivery-honyachi-sarvsadhran-karane

 

आजकाल मुल हे नऊ महिने पूर्ण होण्याच्या आत जन्माला येण्याचे म्हणजे अपुऱ्या दिवसांचे किंवा प्रिमॅच्युर जन्मला येणाचे प्रमाण वाढले आहे. प्रिमॅच्युर प्रसूती होण्याची सर्वसाधारण कारणे पुढील प्रमाणे

१) योग्य वयात गर्भधारणा न होणे

कमी वयात गर्भधारणा झाल्यास मुलं अपूर्ण दिवसांचे म्हणजे प्रिमॅच्युर जन्माला येते. किंवा उशिरा गरोदर राहिल्यामुळे मुलं  प्रिमॅच्युअर जन्माला येऊ शकते.

२) दोन गरोदरपणातील कमी अंतर

साधारणतः दोन गरोदरपणामध्ये कमीतकमी १८ महिन्याचे अंतर असणे गरजेचे असते. कारण पहिल्या प्रसूती नंतर तुमच्या शरीराला गर्भाशयाला पूर्ववत होण्यासाठी आणि शरीराची झीज भरून येण्यासाठी वेळ लागतो. आणि या दरम्यान जर पुन्हा गरोदर राहिलात तर दुसरे मुलं  हे प्रिमॅच्युर होण्याची शक्यता टाळता येत नाही.

३) आधी गर्भपात झाला असल्यास

जर आधी गर्भपात झाला असल्यास मुल अपुऱ्या दिवसांचे म्हणजेच प्रिमॅच्युर जन्माला येण्याची शक्यता असते

४) गर्भधारणेची आधुनिक उपचार पद्धती

अनेक जोडप्यांमध्ये मूल होण्याबाबत समस्या निर्माण होण्याचे प्रमाण वाढत आहेे.त्यामुळे अशी जोडपी बाळासाठी आधुनिक उपचार म्हणजेच आयव्हीएफ उपचार पद्धतीचा वापर करून गर्भधारणा  घडवून आणतात. अश्या प्रकारच्या गर्भधारणेत मुलं हे प्रिमॅच्युर जन्माला येऊ शकतं अशा प्रकारच्या उपचारानंतर होणा-या गर्भधारणेमध्ये प्रिमॅच्युअर डिलीव्हरीच्या समस्या वाढू शकते.

५) गरोदरपणात इतर आजार

गरोदरपणात अति रक्तदाब, इतर आरोग्य विषयक समस्यांमुळे देखील जन्मला येणारे मुलं प्रिमॅच्युर जन्माला येऊ शकते.

६) आईच्या आहारातील पोषक घटकांची कमतरता

प्रत्येकाने पोषक आणि संतुलित आहार घेणे गरजेचे असते. त्यामुळे आहारातील पोषक घटकांच्या कमतरतेमुळे जर तुमचे शरीर गर्भधारणेसाठी पुरेसे सक्षम व सुदृढ नसेल तर प्रिमॅच्युर प्रसूती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

७) औषधे

ओव्हूलेशन वेळेत होण्यासाठी औषधे घेतल्याने एकापेक्षा अधिक स्रीबीजांचे फलन होते.यामुळे प्रिमॅच्युअर प्रसूती होण्याची शक्यता वाढते.

८) जीवनशैली

सध्याच्या पालकांची जीवनशैली हे देखील प्रिमॅच्युर बेबीचे एक कारण आहे. विशेषतः आईने  गरोदरपणात जंकफूड खाणे, इतर घातक व्यसने करणे तसेच कामाचा व इतर ताण-तणाव घेणे याचा परिणामस्वरूप जन्माला येणारे बाळ अपुऱ्या दिवसांचे जन्माला येण्याची शक्यता असते.

९) अनुवंशिकता

जर पालकांपैकी एक कोणाचा विशेषतः आईचा जन्मदेखील जर प्रिमॅच्युर झाला असे तर मुलं देखील प्रिमॅच्युर जन्मला येण्याची शक्यता असते.

१०) पोटावर आघात होणे

पोटावर जोरात आघात झाल्यास तसेच वार सुटल्यास अपुऱ्या दिवसांची प्रसूती होऊ शकते.

यामुळे आपले मुलाची पूर्ण वाढ होऊन ते निरोगी व सुदृढ जन्मला येण्यासाठी वरील गोष्टी लक्षात घ्या तसेच गरोदर राहण्याचा निर्णय घेण्याअगोदर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या तपासण्या करा. तसेच गरोदर राहिल्यावर देखील वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या 

 

Leave a Reply

%d bloggers like this: