sadivarati-balasathi-daha-aaharache-padarth

 

सर्दी साधीच असते पण तिच्यामुळे खाता येत नाही, झोपही लागत नाही, अस्वस्थपणा वाटत असतो. आणि ही गोष्ट मोठ्यांनाही त्रासदायक ठरते तेव्हा लहान मुलांचे खूपच हाल होऊन जातात. आणि लहान मुलांना जेव्हा सर्दी होते तेव्हा सर्वात मोठी समस्या ही खाण्याबाबत असते. तेव्हा सर्दी मध्ये बाळाला काही खाऊ घालता येतील. असे काही पदार्थांच्या टिप्स सांगतोय.

१) दूध (६ महिन्याच्या बाळांसाठी )

ह्या वेळी बाळाची प्रकृती खूप नाजूक असते म्हणून बाळाला सर्दी होणारच नाही याची दक्षता घ्यायची. त्यासाठी आईने थंड खाऊ-पिऊ नये. म्हणजे बाळाला सर्दी होणार नाही. आणि जर झालीच आईचे दूधच द्यायचे. आईच्या दुधात अँटीबॉडीज असतात त्यामुळे सर्दीवर हाच रामबाण उपाय आहे.

२) भाताच्या पाण्याचे सूप (६ते१२ महिने)

भाताचे पाणी बाळांची रोगप्रतिकार क्षमता वाढवते. २ चमचे तांदूळ, अर्धा कप पाणी घेऊन भाताला पूर्ण मऊ बनवा. नंतर त्याला एका भांड्यात कुस्करून सूप बनवा आणि बाळाला चमच्याने पाजा.   

३) हळदीचे दूध (१ वर्षापेक्षा मोठे)

१ वर्षापेक्षा मोठ्या बाळासाठी हळदीचे दूध देता येईल. हळदीचे दूध नैर्सगिक अँटीबायोटिकचे काम करते. त्याचबरोबर सर्दीला दूर करतेच आणि घसाही साफ करते. आणि जर तुमचे बाळ अगोदरपासूनच अँटीबायोटिक घेत असेल तर एकदा डॉक्टरांना विचारून घ्या.  

४) निरनिराळे सूप (१.५ वर्षाच्या पूढे)

काही वेळा बाळ बाळाला इन्फेक्शन झालेच तर बाळाची खाण्याची इच्छा राहत नाही. पण त्यांना खाऊ तर घालायचे असते. आणि हेल्थी आणि हायजिन खाऊ घालावे लागते. तेव्हा बाळाला सूप देण्याचा सर्वात व छान उपाय आहे. तुम्ही बाळाला तिला किंवा त्याला भाज्यांचे सूप बनवून देऊ शकतात. आणखी तुम्ही सफरचंदाचा, गाजराचा, टमाट्याचा, सूप देऊ शकता. यामुळे बाळ खाईल.

५) सफरचंदाला कुस्करून द्यावे ( ६ ते ९ महिने )

सफरचंदात खूप पौष्टिक घटक असतात. आणि ते पचायलाही हलके असते. सफरचंदाला सोलून घ्यावे. आणि आतला भाग काढून  घ्यावा. जमल्यास त्या सफरचंदाच्या फोडीला वाफ देऊन मऊ करून घ्यावे. आणि नंतर मिक्सरमध्ये टाकून ते मिक्सचर काढून घ्यावे. त्याची तुम्हाला पुरी करता येईल किंवा कुस्करूनसुद्धा देऊ शकता. सर्दीवर खूप चांगला उपाय आहे.

६) डाळिंबाचा ज्यूस (६ महिन्यापेक्षा पुढे)

डाळींबात खूप अँटिऑक्सिडंट असतात. डाळींबाचा ज्यूस सर्दीला दूर करण्याचा व बाळालाही नवीन खाऊ घालण्यासाठी उत्तम आहे. त्या ज्यूस मध्ये जर आले आणि काळी मिरी टाकली तर लवकर फरक पडेल.

७) कुस्करलेला बटाटा (८ महिन्यापेक्षा पुढे)

बटाटाट्याला उकळून घेऊन नंतर सोलून घ्यावे. पूर्ण मऊ करून त्या बटाट्याला कुस्करून घेऊन बाळाला द्यावे. यात कार्बोहायड्रेट असते आणि बाळालाही याची टेस्ट लागते.

८) गाजराचा ज्यूस  ( ६ महिन्यापेक्षा पुढे )

गाजर रोगप्रतिकार क्षमतेसाठी लाभदायक आहेच. आणि खायलाही हलके व पाचक आहे. तेव्हा गाजराचा ज्यूस बाळाच्या सर्दीसाठी उपयोगी ठरेल.

९) मध आणि कोमट पाणी (८ महिन्यापेक्षा पुढे)

मध घशाला खूप लाभदायक असते. लेमन टी मध्ये (lemon Tea- बिनदुधाच्या चहात लिंबू पिळणे) मध मिसळायचे आणि त्यात कोमट पाणी घालायचे. बाळाच्या घशाला आराम मिळेल.

१०) भाज्यांची खिचडी (१ वर्षापेक्षा मोठा)

खिचडी पचायला हलकीच आहे. आणि लवकर करता येते. खिचडीमध्ये गाजर, टमाटे, काही सकस भाज्या टाकायच्या. म्हणजे बाळाला इतर घटकही मिळून बाळाचे परिपूर्ण पोषण होते.  

हा लेख इतर आईंनाही शेअर करा जेणेकरून त्याही त्यांच्या बाळाच्या सर्दीवरती उपचार करू शकतील.

Leave a Reply

%d bloggers like this: