autism-mhanje-kay-sadharan-lakshane

ऑटिझम म्हणजे आत्ममग्नता किंवा स्वमग्नता  हा एक गुंतागुंतीचा आजार आहार बऱ्याच मुलांना हा आजार ‘जन्मजात’ असतो. काही जणांना नंतर दोन अडीच वर्षात होतो. पालकांना हे समजायला/स्वीकारायला थोडा उशीर लागतो. त्यावेळी त्यांना धक्का बसतो.काही केसेस थोडया सौम्य असतात. त्यात थोडी सुधारणा होते. ऑटिस्टिक मुले साधारण मुलांसारखी दिसतात. मतिमंद दिसत नाही. मात्र एकदम विचित्र क्रिया करायला लागतात  असे काही सातत्याने घडल्यास यासाठी प्रथम मनोविकारतज्ज्ञ किंवा बालरोग तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक ठरते .

‘ऑटिझम’ची काही साधारण लक्षणे
   १) स्नायूंचा सर्वसाधारण ताणताणाव (muscle tone). नैसर्गिक नसतो

ऑटिझम असलेल्या मुलांचे स्नायू कधी खूपच शिथिल तर कधी कधी खूपच ताणलेले अथवा खेचलेले स्नायू असतात.परिणामस्वरूप त्यांना लिहिणे, कपड्यांची बटणे लावणे, बुटांची लेस बांधणे अशा विशिष्ट गोष्टी करणे अवघड जाते. अर्थात सतत सराव करून घेतल्यास त्यांना ह्या अडचणींवर मात करणे जमू शकते. तसेच त्यांना अंतराचा, खोलीचा अथवा लांबीचा नेमका अंदाज घेणे अवघड जाते.

२) पाण्याचे आकर्षण

ऑटिझम असलेल्या बऱ्याच मुलांना पाण्याचे अत्यंत आकर्षण असते. पण समोर दिसतंय ते डबके आहे की खोल तळे आहे ह्याचा अंदाज न आल्यामुळे मूल बुडण्याचा धोका संभवतो.

३) मुलांमध्ये हाताच्या व डोळ्यांच्या स्नायूंचे योग्य संतुलन (eye-hand coordination) नसते.

चेंडू नेमका पकडता येणे अथवा टोलवता येणे अशा काही दैनंदिन क्रिया करणे अवघड जाते. स्पर्श, चव आणि वास ह्यांच्या संवेदनेला त्यांचा मिळणारा प्रतिसाद हा सर्वसामान्य नसतो. एकतर अगदी तीव्र असतो, अथवा त्यांच्या संवेदना बर्याच अंशी बोथट झालेल्या असतात.

४) कपड्याबाबत तक्रारी

कपड्यांच्या बाबतीतही त्यांच्या फार आवडी निवडी असतात. कुणी स्वेटर, बिनबाह्यांचा टी-शर्ट घालणार नाही तर कुणी लांब बाहीचा शर्ट घालायला नकार देईल . कुणी जीन्सची पैंट घालायला नकार देईल तर कुणी हाफपैंट घालायला. पायात बूट /चप्पल सुद्धा विशिष्टच घालणार.  जर ते बूट / चप्पल वापरून जुने झाले, फाटले तरीही तेच हवे असतात. तंतोतंत तसेच नवीन आणले तरी ते घालायला त्यांचा कडाडून विरोध असतो.

५) वास,चव,स्पर्श

या मुलांचे वैशिष्ठ  असे की काही जण एखाद्या विशिष्ट वासाने उत्तेजित होऊ शकतात अथवा काही जणांना एखादा वास कितीही तीव्र स्वरूपाचा असला अथवा दुर्गंधीयुक्त असला तरीही त्यांना त्याची जाणीव होत नाही.

६) एकाग्रतेची कमतरता

ह्या मुलांना एका जागी बसून फार काळ कुठल्याही कामावर लक्ष केंद्रित करणे अवघड असते.एक तर त्यांचे मन सतत आजूबाजूला घडणाऱ्या घटनांनी विचलित होत असते. ह्याचे कारण मुख्यत्वे त्यांना सांगितलेल्या गेलेल्या अभ्यासात अथवा कामात त्यांना रस नसतो. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला कुणी रागावेल, आपल्याला वाईट वाटेल ही संकल्पनाच मुळी त्यांच्या मनात नसते.ह्याउलट एखाद्या गोष्टीमध्ये जर त्यांना आवड असेल तर ते त्या गोष्टींमध्ये तासन् तास रमू शकतात; अगदी आजूबाजूच्या जगाला पूर्णपणे विसरून! भले त्या गोष्टी कितीही क्षुल्लक असोत. एखादा फुगा  हवेत उडवणे असो किंवा ठोकळ्यावर ठोकळा  ठेवणे असो.

७) भीती आणि सुरक्षितता

बहुतांश ‘ऑटिझम’ असलेल्या मुलांच्या मनात सर्वसाधारण भीतीची संकल्पना अस्तित्वात नसते त्यामुळे अर्थातच सुरक्षिततेच्या संकल्पनेचा देखील त्यांच्या वर्तनात अभाव असतो. त्याचबरोबर कधीकधी क्षुल्लक गोष्टींबद्दल देखील त्याच्या मनात भीती बसते.

८) त्यांचा आपल्या भावनांवर पुरेसा ताबा नसतो.

साहजिकच त्यांच्या भावनांचे प्रकटीकरण अत्यंत तीव्र स्वरूपात होते. एकदा मनात आले की कुठलीही गोष्ट कुठल्याही परिस्थितीत त्या क्षणी करणे अनिवार्य बनून जाते. तसे न झाल्यास त्यांचा प्रचंड चीड-चीड करतात . अशा वेळेस कधी कधी स्वतःला / इतरांना हानी पोहोचेल असे वर्तन होऊ शकते. त्या क्षणी त्यांच्या मनाची संभ्रमित अवस्था आणि त्यामुळे झालेली मानसिकता कधी कधी समजण्यापलीकडची होते. 

९) भूक आणि झोप याची जाणीव सर्वसामान्य नसते.

त्यांच्या जेवणाच्या आणि झोपेच्या वेळा  निश्चित नसतात. कधी कधी बसल्या बैठकीला ५-६ पोळ्या  संपवतील आणि अजून हवे म्हणून हट्ट करतील नाहीतर कधी दिवस दिवस जेवायला मागणार नाहीत. तीच गोष्ट झोपेची. बऱ्याच मुलांना फार कमी झोप असते. रात्री २-२ वाजेपर्यंत जागून परत भल्या पहाटेपासून उठून बसणार. बरे उठून आपापले शांतपणे काही करत बसतील तर तेही नाही. त्यांना त्यांचे आई/बाबा त्यांच्या बरोबर खेळायला हवे असतात.

ही  लक्षणे वाचून घाबरून जाण्याचे कारण नाही. अशी लक्षणे आढळ्यास सर्वप्रथम मनोविकारतज्ज्ञ किंवा बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते . काही मुले मुळात मस्तीखोर असतात तर काहींना ऑटिझम हा आजार असतो. त्याकरता  डॉक्टरांचा  सल्ला घेऊन त्यांच्या निदानावर मुलाला ऑटिझम आहे की नाही ठरेल. आणि असेल तर त्यावर कश्याप्रकारे उपचार पद्धती असावी याचा सल्ला घ्यावा. काही ऑटिझमचे असलेले रुग्ण हे योग्य आणि वेळत उपचार केल्यामुळे सुधारणा होण्याची शक्यता असते. या मुलांच्या उपचारांबाबत पालकांमध्ये चिकाटी असणे गरजेचे असते.

Leave a Reply

%d bloggers like this: