blue-vhel-gem-pasun-aaplya-mulana-savdh-kra

 

 प्रातिनिधिक छायाचित्र – Google. Com 

सध्या ‘ब्लू व्हेल’ जीवघेण्या गेमबद्धल खूप भीती आणि दहशत आहे. कारण यामुळे काही लहान मुलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भारतातून अजूनही पूर्णपणे ब्लू व्हेल गेममुळे आत्महत्या केली असे निष्पन्न झाले नाहीये. पण पश्चिमबंगालमध्ये आनंदपूर इथल्या शाळेत शिकणाऱ्या मुलाने अंघोळ करताना आत्महत्या केली आणि त्याच्या मित्राकडून समजले की, तो ब्लू व्हेल गेम खेळत होता. सोलापूरचा एक मुलगा ब्लू व्हेल गेम चे आव्हान पूर्ण करण्यासाठी पुण्यात पोहोचला. तेव्हा या आपली मुलेही असा काही प्रयोग करत नसतील ना त्यासंबंधी दक्ष व सावध रहा. पण भारतातील पालकांनी खूप घाबरण्याचे कारण नाही. पण सावध राहण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाय देत आहोत.

१) तुमचा मुलगा/ मुलगी तुमच्याशी जास्त बोलत नाहीये. तो घाबरल्यासारखा वागतोय का ? कारण ह्या गेममधे एकदा तुम्ही पडलात तर तो समोरचा टास्क मास्टर तुम्हाला चालवत असतो. म्हणून मुलगी/मुलगा एकदम पहाटे उठतोय, धाब्यावर जातोय, एकदम काहीतरी कृती करत असेल तर त्याला वेळीच थांबवा.

 प्रातिनिधिक छायाचित्र – Google. Com 

२) या गेममधे जी काही आव्हाने खेळणाऱ्या व्यक्तीला दिली जातात ती अवाजवी असतात. तेव्हा मुलांच्या काही मागण्या असतील आणि त्या विचित्र वाटत असतील तर त्यांच्या मागण्या पूर्ण करू नका.

३) या गेम मध्ये मुलांना आव्हान दिली जातात. आणि त्या आव्हानांना ते पूर्ण करण्यासाठी जीवापाड मेहनत घेतात. हा फरक कदाचित पालक आपल्या मुलांना कमी लेखतात, त्यांना नेहमी बोलत असतात की, तुला काही येत नाही, तुला येणारच नाही अशा बोलण्यामुळे ती आत्ममग्न होतात. आणि असे कोणी सांगितल्यावर स्वतःच्या क्षमता चेक करण्याच्या प्रयत्न करतात. मुलांशी असे वागू नका. त्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेवा कारण ती तुमचीच मुले आहेत.

 प्रातिनिधिक छायाचित्र – Google. Com 

४) त्याना एकटे किंवा एकांतात राहू देऊ नका. मित्रांमध्ये मिसळायला लावा, मामाच्या गावाला, म्हणजे ते माणसात मिसळतील अशा ठिकाणी पाठवत रहा. त्यांना मैदानी खेळ खेळायला प्रोत्साहन द्या.

५) लहान मुलांची विचार करण्याची क्षमता व योग्य निर्णय कोणता याबाबत खूप विकास झालेला नसतो म्हणून ते कोणत्याही गोष्टीवर चटकन विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांना स्वतंत्र विचार करण्याचे शिकवा. जेणेकरून ब्लू व्हेल सारख्या गेममुळे आपला जीव घेणार नाहीत.

6) या गेमची शेवटचे पाऊल म्हणजे आत्महत्या करायची त्यासाठी खेळाचा ऍडमिन आत्महत्या करण्यासाठी धमकी देतो, दबाव आणतो. असे काही आढळल्यास पोलिसांना सांगा किंवा सायबर क्राईम ला सांगा.   

जगभरात या गेममुळे १२५ पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केली आहे. या खेळाचा उगम रशियात एका फिलिप बुदेइन नावाच्या व्यक्तीने केला. त्या व्यक्तीला पोलिसांनी अटकही केलीली आहे.यांच्यात वेगवेगळे टास्क दिले जातात. जसे की, भयपट एकट्याने पाहणे, रात्री एकटयाने बाहेर फिरून दाखवणे, आपल्या हातांनी ब्लेडने वार करणे, ब्लेडने ओठ कापणे, असे भयानक कृत्य करायला लावतात. त्या गेममधे एक ऍडमिन असतो आणि तोच यांना हाताळत असतो. तेव्हा खूप घाबरण्याचे कारण नाही.फक्त या गेमच्या निमित्ताने आपली मुले काय करत असतात ते जाणून घ्या.   

Leave a Reply

%d bloggers like this: