garbvati-strine-dararoj-ka-chalayala-hawe-

 
गर्भधारण केल्यानंतर घरीच थांबावे लागते, काहीच जड वस्तू उचलू नये, व्यायाम करू नये. असे खूपच निर्बध असतात पण ते त्या गर्भवती स्त्रीच्या भल्यासाठीच असतात. गर्भवती स्त्रीला योग्य खान-पान, झोप, आणि शरीराच्या हालचाली करणे. या तीन गोष्टी करायच्या असतात. जर तुम्ही या सोबतच चालणे केले तर ते प्रसूतीसाठी व बाळाच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे.  

१) मलावरोधाची समस्या राहत नाही

गरोदरपणात खूप औषधी आणि गोळ्या घेतल्याने मलावरोधाची समस्या तयार होऊन जाते. अशावेळी थकवासुद्धा खूप असतो. आणि आळशीपणा वाढून जातो. तेव्हा रोज सकाळ किंवा संध्याकाळी १५ ते २० मिनिटे चालण्याचा सराव करा.

२) उत्साह दिवसभर टिकतो

गरोदरपणात खूप चीड-चीड, संताप, आणि नैराश्य येत असते. मूड राहत नाही छोट्या- छोट्या गोष्टींनी मूड बिघडतो. त्यामुळे जर तुम्ही चालण्याचा सराव केला तर नैराश्य कमी होऊन नवीन काहीतरी विचार येतील. व फ्रेशनेस वाटेल. आणि याचा फायदा बाळालाही होत असतो.  

३) झोप पूर्ण होते

बऱ्याच स्त्रियांना रात्री झोप लागत नाही. कारण दिवसभर घरीच राहिल्याने व दुपारी झोप घेतल्याने झोप लागत नाही.तेव्हा जर तुम्ही चालण्याचा सराव केलाच तर थकल्याने स्नायूंचा व्यायाम झाल्याने रात्री शांत व गाढ झोप लागेल.

४) रक्तदाब कमी करण्यासाठी

सामान्यतः गरोदर असताना रक्तदाब वाढत असतो. आणि रक्तदाब वाढणे हे आईच्या व बाळाच्या तब्येतीसाठी धोकादायक असते. त्यामुळे दररोज चला व रक्तदाबला दूर करा.

५) रक्त शुद्ध करते

दररोज चालण्यामुळे आणि विशेषतः सकाळी तर शुद्ध हवा मिळत असते आणि ती फुफ्फुसात जाते. रक्तभिसरण्याची क्रियेत वेग मिळतो. आणि रक्त शुद्ध होऊन शरीर स्वस्थ व निरोगी राहते. याचा नैसर्गिक प्रसूतीसाठीही फायदा होत असतो.

सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे गरोदरपणात तुमचे वजन वाढत नाही. मेटाबोलिजम वाढत नाही.चालण्यामुळे हृदयविकारही दूर राहतो.  तुमच्या शरीराचा आकार अवाजवी वाढत नाही. शरीर सुडोल राहते. म्हणून उद्यापासूनच चालण्याचा सराव करा. आणि बघा किती फायदे तुम्हाला फुकटात मिळतात. इतर गरोदर मातांना शेअर करून याचा फायदा होऊ द्या.    

Leave a Reply

%d bloggers like this: