garodarpanat-nakatun-ani hirdyatun-honara-rktstrav-karne-v-upay

 
सर्वच नाही परंतु अनेक स्त्रियांना गर्भावस्थेत असताना हिरड्यांमधून आणि नाकातून रक्त येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. (जास्त करून दुसऱ्या त्रैमासिकात) परंतु याविषयी चिंता करण्याचे कारण नाही. गर्भावस्थेत संप्रेरकांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे नाकातून आणि हिरड्यांमधून रक्त येणे सामान्य आहे. तुमच्या बाबतीत ही समस्या गंभीर असल्यास (असे क्वचितच घडते) तुमच्या डॉक्टरांना दाखवून योग्य उपचार करून घ्या.


नाकातून होणारा रक्तस्त्राव.
गरोदर असताना स्त्रियांच्या शरीरात अनेक संप्रेराकीय बदल घडतात. येथे प्रोजेस्टेरोन आणि इस्ट्रोजेन या संप्रेरकांचा उल्लेख महत्वाचा ठरतो. ही दोन संप्रेरके रक्तवाहिन्यांमधील रक्त विरळ करतात. यामुळे रक्ताच्या घनतेत आणि रक्ताभिसरणेच्या प्रक्रियेत वेग येतो. याचाच परिणाम म्हणून नाकाच्या नाजूक रक्तवाहिन्यांवर दाब पडतो आणि त्या सुजतात आणि नाकाच्या आतील शेल्मा कोरडा पडून नाकातून रक्त येते.


नाकातून होणार रक्तस्त्राव थांबवण्याचे उपाय
कोणतेही उचार घेण्यापूर्वी तुम्ही ही परिस्थिती समजून घेऊन शक्यतो शांत रहा आणि संयम बाळगा. रक्त पाहून तुम्ही सैरभैर झालात तर परिस्थिती अजून बिघडेल.
१. मान वर करून आकाशाकडे वर पहा. (उभ्या किंवा बसलेल्या स्थितीत)
२. नाकाच्या शेंड्याचा मऊ भागाला दाबा किंवा चिंता घ्या. (नाकपुड्यांच्या वरचं भाग)
३. असे ५-१० वेळा रक्तस्त्राव थांबेपर्यंत करा.
४. असे करताना नाकात कुठेही दाब पडू देऊ नका, तुम्ही तोंडाने श्वास घेऊ शकता.
५. रक्त परत तुमच्या शरीरात जाऊ नये म्हणून तुम्ही बेसिन मध्ये नाक धरा म्हणजे रक्त किंवा ज्या काही रक्त गाठी असतील त्या पडून जातील.

रक्तस्त्राव थांबवणे आणि उपचार    
तुम्ही थोडी काळजी घेतल्यास हे बरे होऊ शकते.
१. भरपूर द्रव घ्या. तुम्ही तुमचे शरीर आणि सोबतच पेशी आणि शेल्मा यांमध्ये हायड्रेशन ठेवणे गरजेचे आहे.
२. नाकाला घासू किंवा चोडू नका.
३. नाक कोरडे न होता ओलावा राहील असे बघा, त्यासाठी पेट्रोलीयम जेली नाकावरून लावा.
४. तुमच्या हाताची नखे वाढलेली ठेवू नका.

रक्तस्त्राव सुरु झाल्यावर लगेच हे करू नका.
१. मेहनतीचे किंवा थकवणारे काम करू नका.
२. गरम द्रव्ये किंवा अल्कोहोल घेऊ नका. यामुळे रक्त वाहिन्या अजून पातळ होतील.
३. नाक जोरात शिंकरण्याचे टाळा.
४. शक्य तेवढा आराम करा आणि सरळ झोपू नका.

वैद्यकीय उपचार घ्या जर
१. २०-२५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ रक्तस्त्राव होत असेल किंवा नाकासोबत तोंडातून देखील रक्तस्त्राव होत असेल.   
२. तुम्हाला चक्कर येत असेल किंवा खूप अशक्तपणा आला असेल.
काही वेळासाठी होणार्या त्रासाशिवाय या रक्तस्त्रावाचा बळावर किंवा गरोदरपणावर काहीही अपाय होत नाही.

गरोदरपणात हिरड्यांतून रक्त येणे.
अनेक स्त्रियांना गरोदरपणात हिरड्या सुजणे किंवा हिरड्यांतून रक्त येणे अशा समस्या उद्भवतात. सम्प्रेराकांमधील बदल विशिष्टत: प्रोजेस्टेरोन आणि वाढलेले रक्ताभिसरण यांमुळे हिरड्या फुगतात. फुगलेल्या हिरड्या प्लेगला ( दातांमधील एक प्रकारचा जीवाणू) सहज बळी पडतात त्यामुळे त्या सुजतात आणि त्यांमधून रक्त येते. यामुळे हिरड्या इतक्या नाजूक होऊन जातात की तुम्ही दात घासतांना देखील त्यांमधून रक्त येऊ शकते.
हिरड्यांमधून रक्त येणे याचे कारण गरोदरपणात हिरड्यांमध्ये  निर्माण होणाऱ्या अहानिकारक गाठी सुद्धा असू शकते. ( पायोजेनिक ग्रानीलोमा)
उपाय
गरोदरपणात हिरड्यांना येणारी सूज जरी हानिकारक नसली तरीही यावर वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे ठरते. जर उपचार घेतले नाहीत तर दात सैल होण्याची, हिरड्यांमध्ये संक्रमण होऊन त्या सुजण्याची  (पीरियरोन्डिटिस) शक्यता असते.
काही अभ्यासांमधून असे निदर्शनास आले आहे की हिरड्यांमध्ये झालेले संक्रमण (इन्फेक्शन) आणि सूज क्वचितच बाळाच्या कमी वजनास आणि प्री-एक्लॅम्पसियास ( उच्च रक्तदाबामुळे प्रसुतीत उद्भवणारी गुंतागुंतीची स्थिती) कारणीभूत ठरू शकते .
उपचार
दात आणि हिरड्या यांची स्वच्छता राखणे महत्वाचे ठरते.
१. एखादा नरम टूथब्रश वापरा. दिवसातून २ वेळा दात घासण्याचा नियम ठेवा.
२. फ्लोराइड असणारी टूथपेस्ट किंवा माऊथरिन्स वापरा.
३. तुमच्या दातांची नियमित तपासणी करून घ्या.
३. आहारात विटामिन ए आणि सी चा भरपूर समावेश करा. विटामिन सी हे हिरड्यांच्या सुजण्यावर प्रभावी ठरते.
४. सूज कमी करण्यासाठी मिठाच्या पाण्याने गुळण्या करा.
५. सूज जास्त असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही  प्रतिजैवके (Antibiotics) घेण्यास हरकत नाही.
ताबडतोब दंतवैद्यकाचा (डेंटिस्ट) सल्ला घ्यावा जर
१. हिरड्या दुखून रक्तस्त्राव होत असेल.
२. तोंडाचा वास येत असेल आणि हिरड्या नाजूक होऊन सुजलेल्या हिरड्यांमधून रक्त येत असेल.
३. दात दुखत असतील किंवा जास्त त्रास होत असेल.

तुम्ही योग्य वेळी वैद्यकीय उपचार घेतल्यास परिस्थितीत सुधार येऊ शकतो.
           
  


Leave a Reply

%d bloggers like this: