tanhe-bal-te-pach-varshachya-balasathi-lasikarnache-velapatrak

 

नवजात बाळाचा जन्म झाल्यावर बाळाला लसी द्याव्या लागतात. कारण त्या लसी बाळाला दिल्या गेल्या नाहीत. तर बाळाला भविष्यात काही अपंगत्व येऊ शकते किंवा बाळ जीवघेण्या आजाराला बळी पडू शकतो. आणि आता रोग प्रतिकार शक्ती खूपच सशक्त नसल्याने कोणत्याही आजाराला बळी पडू शकता. तेव्हा नवजात बाळाला लसी देणे खूप आवश्यक असते. आणि त्याबद्धल दिरंगाई किंवा दुर्लक्षपणा करता येत नाही.

त्यासाठी आम्ही तुम्हाला लसीकरणबद्धल सांगतोय. बऱ्याच पालकांनी वेगवेगळ्या लसीबद्धल विचारले होते तेव्हा या ठिकाणी संपूर्ण लसीकरणाचे वेळापत्रकच देत आहोत.

१) बाळाचा जन्म झाल्यावर एक महिनाच्या आत (० ते १ महिना) B. C. G ( बी. सी. जी) ची लस आणि पोलिओची लस द्यावी.

२)  १ महिन्यानंतर ते दुसऱ्या महिन्यापर्यंत ट्रिपल आणि पोलिओची लस द्यावी. (१ महिन्याच्या पुढे )

३)  तिसऱ्या महिन्यानंतर ट्रिपल आणि पोलिओची लस द्यावी. ( ३ महिन्यानंतर )

४) चौथा महिना पूर्ण झाल्यावर आणखी ट्रिपल आणि पोलिओची लस द्यावी. ( ४ महिन्यानंतर)

५) बाळाला आता जर पाच महिने पूर्ण झाले असतील तर पोलिओची लस द्यावी.

६)  बाळाला आता सहा महिने झाले असतील तेव्हा आणखी दोन महिन्यानंतर म्हणजे पूर्ण ८ महिन्यानंतर गोवराची लस द्यावी. ( 8 महिन्याच्या पुढे )

७) १५ महिन्यापासून ते १८ महिन्यापर्यंत कधीही तुम्ही M.M.R(एम एम आर)  ची लस बाळाला द्यावी.

8) बाळाला आता साडेचार किंवा पाच वर्ष झाले असतील तेव्हा D.T( डी. टी) पोलिओची लस द्यावी.

कावीळ साठी सुद्धा लस आहे. आणि ती खूप महत्वाची लस आहे. तेव्हा तिच्याबद्धल व वरती दिलेल्या लसीबद्धल डॉक्टरांना विचारून घ्यावे. यातल्या बऱ्याच लसी या सरकारी रुग्णालयात मिळत असतात. तुम्ही सरकारी रुग्णालयात संपर्क करू शकतात. आणि तो तुम्ही करावाच तो तुमचा हक्क आहे. लसीबद्धल जागरूक रहा. नवीन लस आल्या असतील तुम्हाला आम्हीच वेळोवेळी सांगूच. तुम्ही बाळाला आता लस दिल्या असतील किंवा बाळ महिन्याचे होऊन दिल्या नसतील तेव्हा जागरूकपणे सर्व लसीचे वेळापत्रक लिहून त्यानुसार लस द्या. आणि हे वेळापत्रक इतर मातांनाही शेअर करा. जेणेकरून त्या माताही त्यांच्या बाळाला ह्या लस देतील. आणखी वेगवेगळ्या लसीबाबत ज्या बाळासाठी उपयोगी ठरतील त्या लसींची माहिती देऊ. 

Leave a Reply

%d bloggers like this: