Fetal-monitoring-mhanje-kay-samjun-ghya

 

       गर्भतपासणी म्हणजे काय ?
गर्भतपासणी म्हणजे थोडक्यात सांगायचे तर गर्भधारणेवर देखरेख ठेवणे. यात काही नियमित तपासण्या आणि गर्भासंबंधी चाचण्या घेतल्या जातात. प्रसूती कळा येत असताना वैद्यकीय तपासक किंवा नर्स तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके तपासून बाळ शारीरिकदृष्ट्या कसे आहे याचे विश्लेषण करतात. या प्रकारच्या देखरेखीवरून बाळ या कळांच्या दाबाचे आकुंचन सहन करू शकेल की नाही हे देखील समजते.  
सामान्यत: गर्भाची ही चाचणी किंवा देखरेख एका इलेक्ट्रॉनिक गर्भतपासणी यंत्राद्वारे किंवा डॉप्लर वापरून केली जाते. या गर्भतपासणी यंत्राद्वारे तुमच्या बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग सलगपणे किंवा नियमित कालांतराने मोजला जातो. या मोजण्याला ‘इंटरमिटेंट अॉस्कलटेशन’ (Intermittent Auscultation) असे म्हणतात. हे मोजण्यासाठी गरोदर मातेस कळा येत असताना या गर्भतपासणी यंत्राच्या संवेदन मोजणाऱ्या पट्ट्या वापरून जोडले जाते.

सलग गर्भतपासणी म्हणजे काय ?
(Continuous Fetal Monitoring)

    रुंद, लवचिक अशा गर्भतपासणी यंत्राच्या पट्ट्यांना दोन गोलाकार चकत्या (डिस्क) जोडलेल्या असतात. या चकत्यांना ‘ट्रान्सड्यूसर्स’ असे म्हटले जाते. या पट्ट्या तुमच्या पोटावर बांधल्या जातात. यापैकी एक चकती बाळाच्या हृदयाचे ठोके मोजते तर दुसरी चकती तुमच्या कळांची आकुंचन संवेदना मोजते. हे ट्रान्सड्यूसर्स बाजूलाच असणाऱ्या यंत्राला जोडलेले असतात जिथे एका कागदावर या संवेदनांचा ग्राफ काढला जातो.

जेंव्हा मॉनिटर सुरु असते तेंव्हा तुमची बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांच आवाज ऐकू शकता. तुम्हाला या प्रक्रियेची अधिक माहिती जाणून घायची असल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांना याविषयी प्रश्न विचारू शकता. 

इलेक्ट्रॉनिक गर्भतपासणी करतांना अजिबात वेदना होत नाहीत. परंतु असे म्हणता येऊ शकेल की या यंत्राच्या पट्ट्या मातेच्या पोटाला जोडल्या असल्यामुळे काहीजणींना अवघड वाटू शकते.

चकत्या पोटाला लागून असल्यामुळे कळा चालू असतांना हालचाल करणे शक्य होत नाही म्हणून काही प्रमाणात त्रास होऊ शकतो. काहीवेळा ही तपासणी रिमोटद्वारे केली जाते, यास ‘टेलेमेट्री’ असे म्हणतात. याचा वापर करून गर्भतपासणी यांत्रिक पट्ट्या किंवा डिस्क शिवाय करता येते. काही दवाखान्यांत ही सुविधा उपलब्ध आहे. रिमोटचे सेन्सर्स बाळाच्या हृदयाच्या ठोक्याच्या आणि कळांच्या संवेदना टिपून मॉनिटरला पाठवतात. ही तपासणी चालू असतांना तुम्ही चालू-फिरू देखील शकता.  

नियमित कालांतराने होणारी गर्भतपासणी कशी केली जाते?  
(Intermittent auscultation )

तुमचे डॉक्टर किंवा नर्स एका डॉप्लरच्या किंवा फिटोस्कोपच्या (गर्भावस्थेतील बाळाच्या हृदयाचे ठोके किंवा हालचाल टिपण्याचे साधन) सहाय्याने तुमच्या पोटावरून बाळाच्या हृदयाचे ठोके मोजेल, जसे पूर्वी केले गेले असेल. काहीवेळा नुसता पोटावर हात ठेवून देखील बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकले जाऊ शकतात.

तुमची नर्स कळांच्या पहिल्या सक्रीय टप्प्याच्या स्थितीत ही तपासणी दर १५ ते ३५ मिनिटांनी करेल. यानंतर दुसऱ्या म्हणजेच बाळ ढकलण्याच्या टप्प्याच्या स्थितीत ही तपासणी दर ५ मिनिटांनी केली जाईल. बाळ हालचाल करत नसतांना डॉक्टर्स बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांचा एक ‘बेसलाईन रेट’ ठरवतील ( जो सामन्यात: ११० ते १६० च्या दरम्यान असतो ) या ठराविक चाचण्यांसोबत बाळाच्या ठोक्यांची तपासणी गरजेनुसार देखील होते जसे की योनी परीक्षा झाल्यानंतर व आधी किंवा गर्भाशयातील पाण्याची पिशवी फुटल्यास.

थोडक्यात सांगायचे तर, गर्भतपासणी ही आई व बाळ हे दोन्ही सुखरूप आहेत याचे निदान करण्यासाठी गरजेची असते. प्रसुतीदरम्यान येणाऱ्या गुंतागुंतीच्या स्थितीला या तपासणीद्वारे ओळखले जाऊ शकते. बाळाच्या हृदयाचे ठोके टिपल्याने त्यावरून डॉक्टरांना प्रसुतीदरम्यानचे निर्णय लवकर घेता येतात आणि प्रक्रिया सोपी होते.      
             

Leave a Reply

%d bloggers like this: