garodarpanachya-pathdukhivar-upay-aani-zopnyachee-shtiti-

 

गरोदरपणात पहिल्या त्रैमासिकात सर्दी, डोकरदुखी, होणे ही सामान्य गोष्ट आहे. याच्यामुळे शरीरातील पोषक तत्वे कमी मिळाल्याने किंवा पाणी कमी पिल्यानेही होऊ शकते. या दिवसात पोटदुखी, पोट भरल्यासारखे लागणे, आणि त्यामुळे गॅस तयार होऊन जातात. आणि त्यामुळे पाठीदुखी होत असते.

१) तिसऱ्या त्रैमासिकात पाठीच्या वरती दुखत असते. आणि हे यामुळे होते कारण की, बाळ जसजसे वाढते तसतसे गर्भाचा भार पाठीवर पडत असतो. आणि बाळाच्या जन्म झाल्यावर हे सामान्य होऊन जाते.

२) स्त्रियांचे वजन वाढणे : स्त्रियांचे वजन वाढल्यामुळे पाठीच्या कणावर त्याचा प्रभाव पडून पाठीत वेदना व्हायला लागतात.

१. गरोदरपणाच्या काळात स्त्रियांच्या हार्मोन्स बदलामुळे शरीरात काहीं काही बदल होत असतात त्यातच त्याचा प्रभाव पाठीवर पडून पाठ दुखायला लागते.

२. स्नायूमध्ये बदल होतो : जसा गर्भाचा आकार वाढत असतो त्यानुसार शरीराचे खालचे स्नायू ढिले पडून दुखायला लागतात. यामुळेही स्त्रियांच्या पाठीत दुखत असते.

३. मानसिक ताण : बऱ्याच माता आपल्या दुखण्याला नवऱ्याला किंवा कुणाला सांगत नाही आणि सांगूही शकत नाही. आणि ती स्त्री आतल्या आत तिचा जीव घाबरत असल्याने मानसिक तणाव येतो आणि त्याचा त्रास  शरीराला होऊन काही वेदना झाली तर ती सहन होत नाही. या सर्व गोष्टी मनात दाबल्यामुळे त्यांचा प्रभाव पाठीवर पडायला लागतो.  

३) या समस्यांवर उपाय करण्यासाठी व या दुखण्यातून आराम मिळवण्यासाठी खाली दिलेल्या स्थितीत झोप घेऊ शकतात.

१. तुम्ही जेव्हा एका बाजूला झोपणार तेव्हा गुडघ्याच्या खाली उशी ठेवून, एक पाय वरती घेऊन त्याच्या खाली उशी आणि खाली पाय अशा स्थितीत झोपावे. खाली तसे चित्र दिले आहे तुम्ही त्यानुसार झोपू शकता.

२. ज्या वेळी तुम्ही पाठीवर झोपला असाल तेव्हा खाली उशी घ्यावी. आणि पाय दुमडून घ्यावेत. वाटल्यास खाली दिलेल्या चित्राचा आधार घेऊ शकता.

आणि पाठीला कधीतरी गरम पाण्याने शेकून घ्यावे. आणि डॉक्टरांनी  दिलेले औषध घेत राहा. आम्ही आशा करतो की, या वेदनेपासून या गोष्टींनी तुम्हाला आराम मिळेल. आणि जसा या लेखाचा तुम्हाला फायदा होईल. तसा इतरांनाही या वेदनेपासून सुटका मिळवण्यास मदत करा.  

 

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: