jodidar-dukhavala-aahe-ka-tar-mg-hg-kara

 

 

       तुम्ही तुमच्या जोडीदाराला शेवटच्या वेळी केव्हा ह्ग (मिठी मारणे) केलेय ? या प्रश्नावरती तुम्ही विचारात पडला असणार. खरंच आपण जोडीदारासोबत राहतो पण कधी तुम्हाला वाटत नाही की, त्याला/तिला ह्ग करायला हवे. आणि ही गोष्ट चुकीची नाहीच आपल्या चित्रपटातही ह्ग करणे दाखवले असते. कारण ह्ग करण्याचे खूप फायदे आहेत. आणि ह्ग करायला खूप काही करावे लागत नाही. आणि ह्ग फक्त नवरा- बायकोच करत नसते.  एकमेकांना मिठी घेतल्याने खूप आत्मविश्वास वाटत असतो.

  जादूच्या झप्पीचे खालीलप्रमाणे फायदे आहेत.

१) गळ्यात भेटल्यामुळे आपल्या जोडीदाराला शांत, स्वस्थ आणि खूप आरामशीर वाटते. याचे शास्त्रीय कारण आहे जेव्हा तुम्ही मिठी मारता तेव्हा ऑक्सिटोसिन (oxytocin) ची प्रमाण वाढून जाते. त्यामुळे एकटेपणा वाटत नाही. तुमच्या जोडीदाराचा राग व संताप असेल तर लगेच मिठी मारा.  

२) तुम्ही जेव्हा दोघेजण एकमेकांना ह्ग करता तेव्हा रक्तदाब आणि ब्लड प्रेशर आणि तणाव दूर होऊन जातो. आणि तुमचे नाते खूप घट्ट होत जाते.

३) दररोज ह्ग करण्याने दोघांना स्वस्थ व आरोग्यदायक वाटेल. कारण तुम्ही चिंतामुक्त व शांत होणार. तुम्हाला यातून आनंद मिळणार आणि ज्या घरात आनंद असतो त्या घरात कोणताच रोग व आजार राहत नाही.

४) रोज मिठी घेतल्याने झोप सुद्धा गाढ व छान लागते. कारण जर तुम्हाला यामुळे कोणता मानसिक त्रास दूर होत असेल तर झोपही शांतच लागणार.

५) बऱ्याचदा काही कारणामुळे मूड खराब होऊन जातो तेव्हा तुम्ही ह्ग केलेच तर मूडही चांगला होऊन जातो. कारण जर तुम्ही थोड्या अधिक वेळपर्यंत ह्ग केले तर दोघांचे सेरोटोनिन चे प्रमाण वाढते. वाटल्यास प्रयोग करून पहा.

६) ह्ग कारण्यावेळी जे काही तुमच्यातले गैरसमज असतील ते तुम्ही एकमेकांना सांगा. आणि या वेळी कोणीही खरेच व मनापासून बोलत असतो. त्यामुळे तुमचे तुटलेले नाते जुळून येईल. आणि तुम्ही आनंदी आणि सुखी राहणार.

एकमेकांना मिठी मारण्याने हे फायदे होत असतात. आणि ही क्रिया करून बघा. आणि तुम्हाला यांच्यातले रहस्य समजेल. एका हिंदी चित्रपटात ( मुन्नाभाई M.B.B.S) यात  जादूची झप्पी वापरली होती. ही आनंद व सुखाची गोष्ट आहे. वाटल्यास तुम्हीं जोडीदाराला जादूची झप्पी देऊन बघा. 

हॅलो मॉम्स… आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया… हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Leave a Reply

%d bloggers like this: