masikpali-ani-garbharpan

 

गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर तुमच्या शरीरात बरेच बदल घडत असतात त्यापैकी एक मासिकपाळी आणि मासिकपाळीच्या चक्र याबाबत काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. 

गर्भारपणात मासिकपाळी ?

सामान्यतः मासिकपाळी  येणे हे  तुम्ही गरोदर नसल्याचं लक्षण आहे. ज्यावेळी  तुम्ही गरोदर होता त्यावेळपासून प्रसूती होईपर्यंत मासिकपाळी येत नाही. कधी-कधी गरोदरपणात अगदी कमी प्रमाणात रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. परंतु जर हा रक्तस्त्राव जास्त प्रमाणात झाल्यास अश्यावेळी तातडीने डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता असते

गरोदरपणानंतर येणारी मासिकपाळी

गरोदरपणानंतर येणाऱ्या मासिकपाळीची वेळ ही प्रत्येक स्तरानुसार वेगवेगळी असते. परंतु काही निरीक्षणात असे दिसून आले आहे,की ज्या माता आपल्या बाळाला योग्य प्रमाणात किंवा बिलकुल स्तनपान देत नाही त्यांना प्रसूतीच्या पाच-सहा आठवड्यातच मासिकपाळी येते आणि ज्या माता स्तनपान देणे थांबत नाहीत तो[पर्यंत त्यांना मासिकपाळी येत नाही. हे प्रत्येकाच्या बाबतीत सारखेच घडले असे नाही . मासिकपाळीची वेळ ही  त्या स्त्रीच्याशाररिक अवस्थेवर आणि इतर घटकांवर अवलंबून असते.

मासिकपाळीचे चक्र

प्रसूतीनंतर ज्यावेळी तुम्हांला पुन्हा मासिकपाळी सुरु होते. त्यावेळी मासिकपाळीचे चक्र हे पूर्वी सारखे असेलच असे नाही. त्यात थोडा बदल होऊन अनियमित होण्याची शक्यता असते. यावेळी होणाऱ्या रक्तस्रावामध्ये देखील फरक होण्याची शक्यता नाकारत येत नाही. काही वेळी अति रक्त स्त्राव होतो तर काही वेळी फारच कमी रक्तस्त्राव होतो.  

ओव्हुलेशन आणि मासिकपाळी  

प्रसूतीनंतर अंडाशयातून स्त्रीबीज सोडण्याची क्रिया आणि मासिकपाळी  या दोन्ही क्रिया एकाच वेळी किंवा लागोपाठ होण्याची तसेच पूर्वीसारखी होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे या काळात संभोग करताना या गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळे पुन्हा गरोदर राखण्याची शक्यता जास्त असते.

स्वच्छता आणि आरोग्य

प्रसूतीनंतरच्या येणाऱ्या मासिकपाळीमध्ये जास्तीत जास्त स्वच्छता करणे गरजेचे असते. तसेच  शक्यतो टॅम्पन वापरणे टाळा. शक्यतो सॅनिटरी नॅपकिन वापर कारण या काळात योनी फार नाजूक झाल्यामुळे टॅम्पनमुळे त्रास होण्याची शक्यता असते तसेच इन्फेक्शन देखील होण्याची शक्यता असते.

 

Leave a Reply

%d bloggers like this: