mule-antharun-ole-karat-asatil-tar-he-bhannat-upay-kara


रात्री झोपेत मुले लघवी करत असतात, त्याचे त्यांना सकाळी उठल्यावर लाजिरवाणी वाटत असते. आणि पालकही त्यांच्यावर ओरडत असतात. पण ही गोष्ट खूप सामान्य असते. ५ वर्षाची २० टक्के मुले आणि ६ वर्षाची १० टक्के मुले ही अंथरून ओले करत असतात. मुलांची वाढ होत असताना असे होत असते खूप गंभीरपणे घ्यायची गोष्ट नाही.   

 १)  मुलांना दोष देऊ नका

अंथरून ओले करणे सामान्य गोष्ट आहे. तुम्ही याबाबत खूप चर्चा व गंभीरपणे बोलत राहिलात तर मुलांना लाजिरवाणी वाटेल आणि ते त्या गोष्टी मनात ठेवून त्यांना चुकल्या- चुकल्या सारखे वाटेल. त्याबाबत मुलांना दोष देऊ नका, उलट त्यांना सांगत रहा की, ही सामान्य गोष्ट आहे. काही दिवसांनी ती आपोआप जाते. त्यांना समजून द्या आणि समजून घ्या.

२) अंथरुणावर लघवी करण्यावरून त्यांची मजा घेऊ नका

जर एखादेवेळी तुमचा मुलगा / मुलगी जर अंथरुणात लघवी करत असेल तर त्याबद्धल त्याची छळवणूक किंवा मजा घेऊ नका. कुटुंबातील इतर सदस्यांनेही त्याबद्धल हसू नका. किंवा छळ करू नका. त्यामुळे त्या मुलाचा/ मुलीचा आत्मविश्वास कमी होईल. आणि त्याचा दृष्टिकोन हा कमकुवत राहील ठाम होणार नाही.

३) रात्री त्याला लघवी करून झोपायला लावा

रात्री झोपण्या अगोदर मुलांना सोबत घेऊन त्याला लघवी करायला लावा. आणि त्याला सांगा की, रात्री तुला जर लघवी लागलीच तर मला उठव असे त्याला सांगा. जेणेकरून त्याला तशी सवय लागेल. आणि हळूहळू त्याची/ तिची समस्या दूर होईल.

४) मॉइश्चर अलार्म खरेदी करा

मॉइश्चर अलार्म अंथरुणावर लघवी करण्यावर खूप चांगला उपाय आहे. हा अलार्म काय करतो? जेव्हाही मुले अंथरूण ओले करतील तेव्हा तो वाजेल आणि मुलाला/ मुलीला समजून येईल की, अंथरुणावर लघवी केली आहे. यामुळे अंथरून ओलेच होते पण यामुळे त्याला / तिला सवय लागेल की, केव्हा लघवी येते म्हणजे ती तेव्हा उठतील.

५) कॅलेंडरचा वापर करा

एक कॅलेंडर तयार करा. केव्हा-केव्हा मुलगा/ मुलगी अंथरून ओले करते. आणि ते कॅलेंडर त्यांना दाखवा. कोणत्या दिवशी अंथरूण ओले केले आणि कोणत्या दिवशी नाही. यातून जर मुले एखाद्या दिवशी खूप खेळले असतील किंवा मस्ती केली असेल तर त्या दिवशी अंथरून ओले होते. यातून त्यालाही बरे वाटेल.

६) अंथरुणावर वॉटरप्रूफ शीट टाकावे

रात्री झोपण्याच्या अगोदर पाणी शोषून घेणारे शीट टाकून द्यावे, म्हणजे आईचा त्रास वाचून जाईल. आणि रात्री त्याला झोपेतून उठवत राहायचे म्हणजे लघवी आली असेल तर करून घेईल. ज्या दिवशी त्याने लघवी केली नसेल त्या दिवशी त्याला बक्षीस द्यावे.

आणि जर हे सर्व उपाय करूनही मुलगा/ मुलगी अंथरून ओले करत असेल तर एकदा डॉक्टरांची भेट घेऊन घ्यावी.

पण त्या अगोदर हे काही टिप्स आहेत ते वाचूनच डॉक्टरांकडे जायचे की नाही ठरवू शकता.

१. जर तुमचा मुलगा/मुलगी ६ ते ७ वर्षाचा असेल आणि कोणताच दिवस अंथरून ओले केल्याशिवाय राहत नसेल तर.  

२. ६ वर्षापेक्षा मोठा असेल आणि अंथरून ओले केल्यावर खूपच रडत असेल तर

३.  तुम्हाला वाटत असेल की, आता ही समस्या थांबायलाच हवी तर.

   ही समस्या इतर कुणाला असेल तर त्या व्यक्तीला हा लेख शेअर करा जेणेकरून त्यांची समस्या सुटेल.

 

Leave a Reply

%d bloggers like this: