ya-pach-goshti-tumche-sasu-sasare-sarvotam-sasu-sasare-aslyache-sangtat

तुमचे सासू-सासरे या अश्या व्यक्ती आहेत ज्यांनी तुमच्या प्रिया व्यक्तीला जन्म दिला आहे आणि वाढवलं आहे. आज तुमचे पती जे काही आहेत ते त्यांच्यामुळे आहेत.पुढील  गोष्टी तुमचे सासू-सासरे हे सर्वोत्तम सासू सासरे असल्याचे सांगतात  

१. आई-वडील

सासर हे तुमचं नवीन दुसरं कुटूंब असतं. एखादी मुलगी स्वतःच घर, आई वडलांना सोडून आपल्या कुटूंबात आल्यावर तीला मुलीसारखं वागवण्याचा  प्रयत्न ते करतात. कायम तुम्हांला प्रोहत्सान देतात. ते तुम्हांला आई-वडलांची कमतरता जाणवू नये हा प्रयन्त करतात. ते कदाचित   जुन्या विचारांचे असतील पण ते तुमच्या विचारांशी जुळवून घेण्याचा प्रयन्त करता .तुमची काळजी करतात तुम्हाला उशीर झाला तर फोन करून तरस देत असतील पण ते काळजी पोटी करतात.

२.नातवंडांच्या संभाळासाठी कायम तयार

सासू सासऱ्यांच्या बाबतीत एक चांगली गोष्ट म्हणजे तुमचे आणि त्यांचे कितीही हि वैचारिक मतभेद असतील तरी  ते नातवंडाचा  सांभाळ करायला नेहमीच तयार असतात. जर तुम्ही तुमच्या मुलांना पाळणाघरात ठेवायचा विचार त्याच्यासमोर मांडला  तर त्याला नातवंडांच्या प्रेमापोटी विरोध करतात आणि त्यांना जमेल तसा  नातवंडाचा  सांभाळ करायचा प्रयत्न करतात. 

३. अनुभवाचे सल्ले

काही गोष्टी आणि समस्यांच्या बाबतीत तुम्ही अगदी हताश होऊन जाता त्यावेळी, सासू-सासरे तुम्हांला  धीर देऊन त्यांच्या अनुभवाचे सल्ले देतात. आणि त्याचा तुम्हला नक्की उपयोग होतो. आणि कधी कधी त्यामुळे तुमची समस्या चुटकीसरशी सुटते

४. तुमच्या मुलांच्या बाबतीत संस्मरणीय क्षण / आठवणींचे साक्षीदार 

तुमच्या मुलांच्या बाबतीत तुमच्या आई-वडलांच्या जोडीने वेगवेगळ्या चांगल्या  गोष्टी आणि संस्मरणिय क्षणांमध्ये ते तुमच्या साथीला असतात. तसेच कठीण प्रसंगत ते तुम्हांला  धीर देखील देतात. तसेच तुमच्या लहान मुलाच्या बाबतीतील गमती-जमातीचे ते साक्षीदार असतात.

५. तुमची काळजी

जर तुम्ही आजारी असाल आणि तुमचे पती काही कामानिमित्त बाहेरगावी असतील तर तुमचे सासू सासरे तुमची त्यांच्या परीने काळजी घेण्याचा प्रयन्त करतात. तुमच्या गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर देखील तुमची काळजी घेतात

Leave a Reply

%d bloggers like this: