garodarpanatil-saundarya-vishayak-badal

 गरोदरपणचा प्रवास हा एका स्त्रीसाठी फार सुंदर आणि संस्मरणीय प्रवास असतो. या प्रवासात बऱ्याच अडचणी देखील असतात. परंतु ज्यावेळी तुमचं  गोंडस बाळा तुमच्या हातात येतं  त्यावेळी या अडचणी आणि त्रास सगळं विसरून जाता. जसं या काळातील काही बदल नकोसे आणि त्रासदायक वाटतात. तसेच गरोदरपणात काही चांगले बदल देखील घडून येतात विशेषतः स्त्रीच्या सौंदर्यात वाढ होते. हे बदल कोणते ते आपण पाहणार आहोत

१). चेहऱ्यावरचा ग्लो (चमक)

दुसऱ्या त्रैमासिकात तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये आणि त्वचेमध्ये फरक जाणवायला लागतो. तुमची त्वचा चमकदार होते. आणि चेहरा एकदम उजळ होतो. तुमच्यातील संप्रेरकाच्या बदलामुळे हे घडून येते.

२) स्तन पुष्ट होतात

या काळात तुमचे स्तन जास्त गोलाकार होऊन पुष्ट होतात. दुग्धग्रंथीच्या प्रकीरियेमुळे हे असे घडून येते. आणि तुम्ही आणि हि गोष्ट तुमच्या सौंदर्यात भर घालते.  

३) लांब आणि काळेभोर केस

ज्यावेळी तुम्हाला दिवस राहतात त्यावेळी तुमच्या शरीरातील संप्रेरकीय बदलांमुळे तुमच्या केसाची वाढ चांगल्या प्रकारे होते तसेच तुमचे केस काळेभोर होतात आणि केसांचा पोतदेखील सुधारतो

४) नखांची वाढ

जर इतर वेळी तुमची नखे फार कमी वाढत असतील आणि त्यामुळे तुम्हांला तुमच्या आवडीचं नेलपेंट लावत येत नसेल पण. या काळात तुमच्या नखांची वाढ देखील लवकर होते. तर मग या काळात नेलआर्ट आणि विविध नेलपेंटची हौस भागवून घ्या

५) गुबगुबीत गाल आणि गुलाबी ओठ

जर या आधी तुम्ही खूप बारीक असाल तर या काळात तुमचे गाल  छानच गुबगुबीत होणार आहेत आणि ओठ देखील चॅन गुलाबी होणार आहेत. तर या गोष्टीचा नक्की आनंद घ्या.

६) मऊ त्वचा

दुसऱ्या त्रैमासिकात तुमची त्वचादेखील पहिल्यादा एवढी मऊ आणि नितळ झाल्याचे जाणवेल.

तर मग जसे गरोदरपणात इतर समस्या असतात तसेच या चांगल्या गोष्टी देखील असतात तर या गोष्टींचा आनंद घ्या,

Leave a Reply

%d bloggers like this: