nate-tikun-rahnysathi- ya-goshti-kara

 

पती-पत्नी मध्ये भांडणे वाद-विवाद हे होताच असतात. पण कधी-कधी हे वाद बरेच दिवस चालतात आणि त्याचे स्वरूप गंभीर होण्याची शक्यता असते. व त्याचा परीणाम हा फक्त पती-पत्नीच्या नात्यावर होता  पूर्ण कुटूंबावर होत असतो. म्हणून या वाद विवादाचे आणि भांडणाचे स्वरूप गंभीर होऊ नये म्हणून काही टिप्स देत आहोत ज्यामुळे तुमचे नाते टिकून राहण्यास मदत होईल

१) चूक मान्य करा

जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर चूक मान्य करा आणि भांडण मिटवून टाका.  हीच छोटी-छोटी भांडण पुढे मोठं स्वरूप घेण्याची शक्यता असते. आणि यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो तसेच कधी कधी नातं वाचवण्यासाठी चूक नसताना चूक मान्य करणे परिस्थिती नुसार गरजेचे असते. नंतर त्यांना त्यांची चूक असल्यास शांतपणे समजून सांगावी

२) शांतपणे चर्चा करा.

चूक कोणाची असो, त्या विषयावर शांतपणे बोलून चर्चा करून समस्या सोडावा. उगाच एकमेकांवर जोर-जोरात बोलून आरोप-प्रत्यारोप,  वाईट भाषेचा वापरकरू नका. कोणतीही समस्या असेल तर ती चर्चेने सोडावा,. कारण तुमच्या अश्या वागण्याचा परिणाम तुमच्या मुलांवर होत असतो.  

३) एकमेकांना समजून घ्या.

जर जोडीदार चुकीचं वागला असेल तर तो/ती असा का वागले. त्यामागचं कारण जाणून घेऊन ते समजून घेण्याचा प्रयन्त करा. कदाचित तुमच्या जोडीदाराला तसं  वागायचे नसताना अनवधाने  गोष्ट घडली असेल त्यामुळे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयन्त करा

४) सामंजस्याने समस्या सोडावा.

वाद-विवाद भांडणे आणि इतर समस्या सामंजस्याने सोडावा एकदम टोकाची भूमिका घेऊ नका. त्यामध्ये तुमचे आणि विशेषतः तुमच्या मुलाचे नुकसान होते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी नीट विचार करा आणि मगच निर्णय घ्या.

५) तुमचे नाते आणि मुले यांना प्राधान्य द्या

प्रत्येक दांपत्य मध्ये वाद विवाद होत असतात. परंतु आपल्या अहंकार पायी तुमचे नाते  आणि तुमच्या मुलांचे भविष्य  पणाला लावू नका. अहंकार पेक्षा नाते  आणि तुमची मुले यांना प्राधान्य द्या.  

Leave a Reply

%d bloggers like this: