navjat-balkamadhe-honari-kavil

कावीळ हि नवजात बाळांमध्ये सामान्यपणे आढळते. प्रौढांच्या  तूलनेत नुकत्याच जन्मलेल्या बाळामध्ये लाल रक्त पेशींचे प्रमाण खूपच जास्त असते. ज्यामुळे,बिलिरुबीनचे प्रमाण वाढते आणि हे जास्तीचे बिलिरुबिन रक्तात तसेच राहते. कारण,मुले नवजात बाळाचे पूर्ण विकसित न झालेले यकृत याचे विघटन करू शकत नाही. रक्तात साचून राहिलेल्या या घट्ट बिलिरुबिन मुळे निर्माण होणाऱ्या अवस्थेला सामान्यपणे कावीळ असे म्हटले जाते.  

सामान्य काविळी सोबतच नवजात बाळांमध्ये आढळणारे काविळीचे काही प्रकार  :

१. मुदतपूर्व जन्मामुळे होणारी कावीळ

बाळाच्या मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाचे यकृत आणि इतर अवयव पूर्ण  झालेले नसतात,यामुळे बिलिरुबीन उत्सर्जित करणे कठीण असते.

२. विसंगत रक्तगटामुळे होणारी कावीळ

जेव्हा आई आणि बाळाचा रक्तगट वेगवेगळा असतो तेव्हा बाळाच्या लाल रक्त पेशी तयार होणाऱ्या प्रतिद्रव्याकडून (अँटीबॉडीज ) नष्ट केल्या जातात.

३.  आईच्या दुधामुळे होणारी कावीळ

स्तनपान करणाऱ्या बाळांमध्ये हि दुर्मिळ प्रकारची कावीळ आढळते.  

काविळीची इतर काही कारणे आहेत 

१. यकृतातील बिघाड

२. विषाणू किंवा सूक्ष्मजंतूमुळे होणारे संक्रमण

३.अंतर्गत रक्तस्त्राव  

४.बाळाच्या लाल रक्तपेशींचे जास्त प्रमाणात होणारे विघटन (काही दोष किंवा विकृतींमुळे)

५. पू होणे(बाळाच्या रक्तात होणारे संक्रमण )

लक्षणे

काविळीच्या इतर प्रकारांसारखेच नवजात बाळांना होणारी कावीळ त्वचा आणि डोळ्यांच्या पिवळसर रंगामुळे ओळखता येते . बाळाच्या जन्मानंतर दुसऱ्या ते चौथ्या दिवसांमध्ये होणाऱ्या काविळीमध्ये सर्वात अगोदर बाळाचा चेहरा पिवळा पडतो, त्यानंतर छाती, पोट , आणि पाय. बऱ्याचदा जन्मतः बाळांना होणारी कावीळ सौम्य असते आणि आपोआप बरी होते ( २ ते ३ आठवड्यांच्या आत ) तरीहि डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज पडते जर

१. त्वचेचा रंग गडद पिवळा असेल

२. बाळाच्या जन्मानंतर २४ तासांच्या आत किंवा लगेचच काविळीची लागण झाल्यास

३. बाळाला तीव्र स्वरूपाचा ताप असल्यास (१०० डिग्री  पेक्षा जास्त )

४. कावीळ तीन आठवड्यांपेक्षा जास्त राहात असेल तर

५. बाळ खूप जास्त झोपत असेल आणि कळवळून रडत असेल

६. बाळ व्यवस्थित पीत नसेल

गंभीर स्थितीत (बिलिरुबिनचा स्तर २५ एमजी पेक्षा जास्त ) उपचारांविना बाळाची परिस्थिती नाजूक बनू शकते . याचा परिणाम म्हणजे बाळाला सेरेब्रल पलसी , मेंदूला इजा , कर्णबधिरता किंवा मृत्यूही ओढवू शकतो .

निदान

जन्मजात कावीळचे निदान खालील पद्धतीने होऊ शकते

१. त्वचेची चाचणी बिलिरुबिनो मीटरद्वारे करणे

२. बाळाच्या रक्ताच्या नमुन्याची चाचणी

३. शारीरिक तपासणी

उपचार
नवजात बाळांमधील काविळीचा उपचार खालील पद्धतींनी होऊ शकतो

१. प्रकाश उपचार पद्धती

या उपचारात निळी-हिरवी प्रकाश किरणे बाहे टाकणाऱ्या प्रकाशाला बाळावर सोडले जाते. हा प्रकाश बिलिरुबिन अणूचे रचना आणि आकार सुधारतो आणि बाळाच्या विष्ठा आणि मूत्रद्वारे ते बाहेर पडते

२. रक्त संक्रमणाचे विनिमय

तीव्र स्वरूपाच्या काविळीमध्ये हि उपचार पद्धती वापरली जाते . बाळाचे रक्त थोड्या प्रमाणात घेतले जाते आणि बिलिरुबिन व  असणाऱ्या प्रतिद्रव्याला पातळ केले जाते. हे रक्त परत बाळाच्या शरीरात सोडले जाते.

३. शिरेच्या आत सोडले जाणारे इम्युनोग्लोबुलीन

बाळ आणि आईच्या न जुळणाऱ्या रक्तगटामुळे होणाऱ्या काविळीच्या प्रकारात हि उपचार पद्धती उपयोगी ठरते . शिरेवाटे बाळाच्या शरीरात  सोडलेल्या इम्युनोग्लोबुलीनमुळे आईद्वारे मिळालेल्या प्रतिद्रव्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते

Leave a Reply

%d bloggers like this: