palkatavche-prakar-ani-tyache-mulanvar-honare-parinam

 

 मुलांना तुम्ही कश्या पद्धतीने हाताळता हे खूपच महत्वाचे आहे. मानसशास्त्रीय विचार करता, तुमच्या मुलांचा उपजत स्वभाव आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने त्यांना वाढवता हा लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. पुढे काही पालकत्वाचे काही प्रकार दिले आहेत. आणि त्याचे मुलांवर काय परिणाम होतात हे आपण पाहणार आहोत

१. हुकूमशाही गाजवणारे पालकत्व

पालकत्वाच्या या पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे,अतिशय कडक शिस्तीचा बाणा अवलंबणे. मुलांवर स्वःतची हुकूमशाही गाजवणारे  पालक खूपच कडक शिस्तीचे आणि बंधने लादणारे असतात.  तसेच मुलांना आखून दिलेले ठराविक नियम, काटेकोर शिस्तीचे पालन करायला लावता.यात मुलांच्या अपेक्षा, त्यांचे  प्रश्न सोडवण्यासाठी शिस्त मोडली जात नाही. आखून दिलेल्या नियम किंवा शिस्तीचे पालन मुलांनी केले नाही तर त्यांना शिक्षेला सामोरे जावे लागते . जर तुम्ही हुकूमशाही गाजवणारे पालक असाल तर लक्षात घ्या या पद्धतीच्या वागण्याचा तुमच्या मुलांवर खूपच नकारात्मक परिणाम होतो.  मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागू शकते. मोठेपणी तुमचे मुल कमी आत्मविश्वास असणारे खूप घाबरट आणि लाजाळू खूप  होऊ शकते , आणि भविष्यात हा एक गंभीर प्रश्न बनू शकतो.

२. निष्काळजी / भावनिक गुंतवणूक नसणारे पालकत्व

मुलांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालकत्वाच्या या पद्धतीमध्ये मुलांवर नियम अथवा बंधने  लादली जात नाहीत पण मुलांच्या सामाजिक वाढीसाठी आवश्यक असणारी भावनिक गुंतवणूक आणि प्रेम यांचाही अभाव असतो. मुलांना स्वतःच्या पालकांचे हवेसे वाटणारे पुरेसे लक्ष मिळत नसल्याने पालकत्वाची हि पद्धत बरीचशी  हानिकारक ठरते . मूल अशा निष्काळजी पालकांसोबत विश्वासाचे नाते निर्माण करू शकत नाही आणि आयुष्यात इतरही लोकांसोबत एक सशक्त , निकोप नातेसंबंध प्रस्थापित करण्यात त्यांना अडचणी येतात यामुळे तुमच्या मुलामध्ये कमी आत्मप्रतिष्ठा आणि नकारात्मक मनोवृत्ती वाढीस लागते याचा ठळक परिणाम म्हणजेच मुलांची अभ्यासात प्रगती कमी असणे.

३. स्वैराचारी / अति लाडावणारे पालकत्व

मुलांना अति प्रमाणात लाडावणारे पालकत्व हे निष्काळजी पालकांच्या काहीसा विरुद्ध प्रकार  म्हणावा लागेल. अशा प्रकारचे पालक स्वतःच्या मुलांवर काही प्रमाणात किंवा अजिबात शिस्त आणि बंधने लादत नाहीत आणि मुलांमध्ये  भावनिक गुंतवणूक बऱ्याच प्रमाणात असते. मुलांची प्रत्येक मागणी , हट्ट पूर्ण करण्याच्या पालकांच्या प्रवृत्तीमुळे मुले घरात पूर्णपणे स्वतःची मर्जी चालवतात.

स्वतःच्या मर्जीनुसार वागण्याने अशी मुले आत्मकेंद्री बनतात ज्यामुळे त्यांच्यात समाजात वागण्यासंबंधीच्या वर्तणूक समस्या आढळतात. आयुष्य सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नियमांच्या व्यवस्थेचा अंगीकार न करता आल्यामुळे त्यांच्यात असुरक्षितता निर्माण होते. यामुळे मुलांना अति लाडावणारी आणि स्वैराचारी पालकत्वाची हि पद्धत मुलांसाठी घातक ठरू शकते .

४. अधिकारवादी  पालकत्व

मुलांचे निकोप व्यक्तिमत्व आणि योग्य जडणघडणीसाठी पालकत्वाची हि पद्धत सर्वात परिणामकारक मानली जाते . हुकूमशाही किंवा एकाधिकारशाही गाजवणाऱ्या पालकत्वाच्या पद्धतीसारखीच यातही मुलांवर काही शिस्त आणि बंधने लादली जातात पण महत्वाची फरक म्हणजे शिस्तीचे पालन करण्यात मुलांना आवश्यक असणारी मुभा आणि लवचिकता दिली जाते .

आवश्यक असेल तिथे शिक्षा आणि शाबासकी दोन्हींचा वापर होतो, पालक आणि मुलांमध्ये  घडणार मोकळा संवाद , मुलांना मिळणारे प्रेम आणि भावनिक ओलावा यामुळे पालक आणि मुलांमध्ये सुधृढ नातेसंबंध निर्माण होण्यास मदत होते .अधिकारवादी पालकत्व पद्धतीनुसार वाढवल्या जाणाऱ्या मुलांमध्ये उच्च आत्मप्रतिष्ठा ,सामाजिक कौशल्ल्ये आणि एकूणच सकारात्मक मनोवृत्ती आढळून येते.  तसेच आयुष्यात एक उचित संरचना असल्याने मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना शक्यतो नसते ज्यामुळे अभ्यास आणि इतर क्षेत्रात हि मुले आघाडीवर असतात

तुमच्या मुलासोबत तुमचे नाते परस्पर आदरावर आधारित असायला हवे . तुमच्या मुलाला तुम्ही ठरवून दिलेल्या नियमावलीसोबतच त्याचे स्वतःचे स्वातंत्र्य जपायचे आहे हे माहित असू द्या . तुम्ही लादलेली बंधने, नियम यांचे महत्व आणि त्यानुसार वागणे का गरजेचे आहे हे तुमच्या मुलांना लक्षात आणून द्या .

तुम्ही कोणत्या प्रकारचे पालक आहात आणि तुमच्या मुलांवर त्याचा काय परिणाम होतो हे तुम्हांला समजण्यास मदत होईल. तसेच जर तुम्हाला किंवा तुमच्या परिचयातील एखाद्यामध्ये नकारात्मक अपरिणामकार पालकत्वाच्या पद्धतीची काही लक्षणे दिसून  अली तर  असतील त्यासाठी हे शेअर करा

 

Leave a Reply

%d bloggers like this: