pahilya-sizeriyan-natarchi-normal-delivery

 

तुम्ही पुन्हा  एकदा आई बनताय … !अभिनंदन! या वेळेला प्रसूती कश्याप्रकारे असेल याबाबत तुम्हांला चिंता लागली असले. परंतु हे तुमची शाररिक अवस्थेवर अवलंबून असते तसेच प्रसूतीच्यावेळी असणाऱ्या तुमच्या अवस्थेवर देखील. तुमची आधीची प्रसूती जर सिझेरियन झालेली असले आणि तुम्हांला जर यावेळी नॉर्मल प्रसूती व्हावी असं वाटत असेल तर त्याबद्दल काही माहिती आम्ही सांगणार आहोत.

VBAC किंवा TOLAC म्हणजे काय

VBAC(Vaginal Birth After Caserean) म्हणजेच सिझेरिअन नंतर योनिमार्गाद्वारे होणारी नॉर्मल प्रसूती किंवा TOLAC(Trial Of Labour After caesarean) अर्थात सिझेरिअन नंतर नॉर्मल प्रसूतिसाठी आवश्यक असणाऱ्या प्रसववेदना.
पहिल्या प्रसूतीवेळी सिझेरिअन करण्याची काही करणे असू शकतात पण दुसऱ्या वेळेला जेव्हा तुम्ही योनिमार्गाद्वारे किंवा नॉर्मल प्रसूतीचा विचार करता तेव्हा काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

त्या समस्या साधारणतः पुढीलप्रमाणे असू शकतात

१. जर पहिल्या सिझेरियन मध्ये तुमच्या गर्भाशयाला मोठी  इजा झाली असेल तर सामान्य प्रसूती होऊ शकत नाही.

२. तुमचे वय ३५ पेक्षा जास्त असेल तर योनिमार्गाद्वारे प्रसुती  तुमच्या साठी  धोकादायक ठरू शकते.

३. तुमच्या ओटीपोटाच्या खालच्या भागात आडवा छेद देऊन पहिले सिझेरियन झाले असेल तर योनिमार्गाद्वारे होणाऱ्या प्रसूतीदरम्यान तुमचे गर्भाशय फाटण्याची शक्यता असते. याचे प्रमाण ०. २ ते १. ५% म्हणजेच सुमारे ५०० मधील १ प्रसूती अशा  प्रकारची असू शकते.

४. गर्भाशयाचे तोंड मोठे होणे किंवा सैलावणे. अशा परिस्थितीत तुमची नॉर्मल प्रसूती होणे कठीण असते

५. याअगोदर तुमचे एका पेक्षा जास्त सिझेरियन झालेले असतील तर धोकादायक प्रसूतीची शक्यता  खूपच जास्त असते.

पहिले सिझेरियन झाले असले आणि दुसऱ्यांदा  नॉर्मल प्रसूती व्हावी असे वाटत असताना वरील समस्या ऐकून घाबरून जाण्याचे कारण नाही. या गोष्टी प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत वेगळ्या असू शकतात. काही अशी देखील उदाहरणे आहेत त्यांच्या बाबतीत दुसऱ्या किंवा अगदी तिसऱ्या बाळंतपणातही ज्या महिलांनी VBAC किंवा TOLAC  या पद्धतींने ( योनिमार्गाद्वारे) झालेल्या प्रसूतीचा सुखद अनुभव आलेला आहे.

जर तुमची दुसरी प्रसूती सुखद व्हावी असे वाटत असले तर  योग्यवेळी तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्या आणि सर्व गोष्टीची पूर्वतयारी आणि  माहिती करून घ्या.

 

Leave a Reply

%d bloggers like this: