ptichya-ya-goshti-tumhala-lagannatar-kaltat

लग्नाआधी तुम्हांला तुमच्या होणाऱ्या पतीबाबत सगळ्या गोष्टी माहिती असतील पण या गोष्टी तुम्हांला  लग्नानंतरच कळणार आहेत. त्यामुळे त्या गोष्टींना सामोरे जायची तुम्ही तयार ठेवा.

१. घर आवरलेले असले की  त्यांना अस्वस्थ वाटते

घर स्वच्छ असले की  त्यांना अस्वस्थ वाटू लागते आणि ते घरभर पसारा करून ठेवतात. जरा घर आवरलं की  त्यांची  एखादी वस्तू हरवलीच म्हणून समाज आणि मग ती वस्तू शोधायला ते सगळ्या घरभर पसारा करतील.

     २. पंख सतत चालू  असला कि त्यांना बरं  वाटतं 

उन्हाळा असो किंवा थंडी  तापमान कितीही असो त्यांना सतत डोक्यावर पंखा चालू असल्याशिवाय झोप येत नाही. मग उन्हाळ्यात एसी चालू केला असलातरी डोक्यावर पंखा चालू असलाच पाहिजे.

३. दरवाजा बंद करणे म्हणजे मूर्खपणा

मग तो बाथरूमचा दरवाजा असो किंवा गॅलरीचा असो किंवा कपड्याच्या कपाटाच्या  कोणताही दरवाजा उघडलं कि तो परत नीट बंद करून ठेवणे म्हणजे मूर्खपणा आहे असं त्यांचं ठाम मत असतं.

४. ते खूप भावुक असतात.

जरी ते फार कणखर आणि प्रत्येक कठीण प्रसंगाला सर्मथपणे तोंड देणारे असले तरी जर कुटूंबातील व्यक्तीला किंवा तुम्हाला थोडा जरी कसला त्रास झालं तर ते भावुक होतात. तसेच एखादा भावुक सिनेमा बघताना देखील कधीतरी त्याच्या डोळ्यांत तुम्हाला नक्कीच पाणी दिसेल.

५. ते किती आळशी आहेत

एखादी क्रिकेट मॅच किंवा टीव्ही शो बघण्यासाठी आणि टीम ला प्रोहत्सान देण्यासाठी त्यांच्याकडे वेळा नि ताकद दोन्ही असते.. फक्त पाण्याचा ग्लास आणि जेवण झाल्यावर स्वतःचे ताट  धुवायला टाकणे म्हणजे त्यांना संकट वाटते

६. वस्तू जागच्या जागी ठेवणे म्हणजे चुकीची गोष्ट करणे 

टूथब्रशला पेस्ट लावत लावत हॉल मध्ये येतील आणि पेस्ट हॉल मध्ये ठेवून दात घासायला निघून जातील. हेच गाडीच्या किल्लीच्या आणि शेव्हिंग क्रीमच्या बाबतीत. अंग पुसून झालेला ओला टॉवेल नेहमी पलंगावरच टाकतील. वस्तू जागच्या जागी ठेवणे हे मूर्खपणाचा  लक्षण आहे. आणि चुकून वस्तू जागेवर ठेवली तर त्यांना चुकल्यासारखं वाटतं. 

म्हणूनच लग्न म्हणजे एका मोठ्या मुलाला दत्तक घेणं म्हणतात ते काही उगाच नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: