gharat-pregannasi-test-kit-ne-garodar-chachni-kashi-karal-

 

       तुम्ही गरोदर आहात का ? हे जाणून घ्यायचे असेल आणि तुमची डॉक्टरांकडे जायची इच्छा नाही. तेव्हा घरीच प्रेग्नंसी टेस्ट करू शकता. आणि तुम्हाला स्वतःलाही करता येईल. टेस्ट करण्या अगोदर त्या दिवशी सकाळी उठल्यावर पहिल्या वेळची लघवी ने टेस्ट करायची असते.  आणि ती खूप महत्वाची आहे कारण त्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात Hcg (Human chorionic Gonadotropin) असतात. तो घटक जर तुमच्या शरीरात आढळला तर तुम्ही गरोदर आहात असे दिसून येते. तेव्हा खाली दिलेल्या पद्धतीने तुम्ही प्रेगन्सी टेस्ट करू शकतात.

१) प्रेग्नंन्सी किट घेण्यावेळी घ्यायची दक्षता

प्रेगन्सी किट खरेदी करताना तपासून पहा नवीन आहे ना. त्याची तारीख, एक्सपायरी डेट पाहून घ्या. कारण जर एखाद्या वेळी जुनी घेतली गेली तर चुकीचे रिजल्ट मिळू शकतात. त्यामुळे दक्षता घेतलेली बरी. आणि एकाच वेळी दोन स्टिक मिळणारी खरेदी केली तर बरे होईल म्हणजे जर पहिली टेस्ट निगेटिव्ह आली तर खात्री करून घेण्यासाठी एखादा जास्तीचा किट घरात असू द्यावा.

२) गरोदरपणाची टेस्ट कोणत्या आधारावर होते

गरोदरपणाची टेस्ट स्त्रीच्या शरीरात असणाऱ्या Hcg (Human chorionic Gonadotropin) या घटकाच्या आधारावर होत असते. जर स्त्रीच्या लघवीत हे संप्रेरक आढळले तर समजून घ्यायचे की, स्त्री गरोदर आहे. ह्याला स्त्रीचे संप्रेरक असेही म्हणतात. बाजारात उपलब्ध असलेल्या किट मधून मासिक पाळी च्या तपासणीतून गरोदरपणा समजून जातो. काही वेळा मासिक पाळीच्या तपासणीत आपल्याला गरोदरपणा समजत नाही आणि मासिक पाळीही येत नाही. त्याचे कारण काही तणाव, चिंता मानसिक धक्का अशी असतात. तेव्हा शरीरात Hcg (Human chorionic Gonadotropin) ची तपासणी करावी.

३) औषीधींचा प्रेगन्सी टेस्ट किट वरती परिणाम

कोणत्याच औषीधींचा टेस्ट किट वरती परिणाम होत नसतो. कारण किट आपण शरीराच्या बाहेरून करत असतो. औषधींचा त्यात खूप परिणाम किंवा फरक पडत नसतो. आणि जर त्या औषधांमध्ये H.c.g वाढवण्याची शक्ती असेल तरी.

४) प्रेगन्सी टेस्ट किट केव्हा वापरायची ?

 ठरलेल्या तारखेला मासिकपाळी आली नाहीतर लगेच दुसऱ्या दिवशी प्रग्नेंसी टेस्ट करून घ्यावी असे डॉक्टर सांगतात.परंतु कधी-कधी मासिकपाळीची  तारीख पुढे-मागे होण्याची शक्यता असते त्यामुळे साधरणतः आठवड्यानंतर टेस्ट केली तरी हरकत नाही. आणि समागमाच्या( संभोग) ६ व्या दिवसानंतर H.c.g हार्मोन स्त्रीच्या शरीरात येत असतात. म्हणनूच काही वेळा प्रेगन्सी किट लवकर वापरली तर तिचे रिजल्ट येत नाहीत.

५) कोणत्या वेळी टेस्ट करावी ?

सकाळची वेळ टेस्ट करण्यासाठी सर्वात चांगली आहे. H.c.g हे संप्रेरक गर्भधारण झाल्यावर वाढू लागते. हे संप्रेरक ८ते ११ आठवड्यात मोठया प्रमाणात वाढतात आणि १२ ते १६ व्या आठवड्यात कमी होऊन जातात. म्हणून टेस्ट सकाळी आणि ८ ते ११ आठवड्यात करावी. सकाळी त्या हार्मोन चे प्रमाण जास्त असल्याने सकाळी टेस्ट केल्यावर रिजल्ट अचूक समजेल.

६) प्रेगन्सी टेस्ट कशी करावी ?

किट वापरण्याआधी किट मध्ये दिलेल्या गोष्टी व्यवस्थित वाचून घ्याव्यात आणि त्याप्रमाणे पालन करावे. शांतपणे तुमच्या सोयीनुसार किंवा बाथरूम मध्ये जाऊन लघवीला टेस्ट किट मध्ये टाकून तपासून घ्यावे. आणि जर तुम्हाला यात काही अडचण आणि समजत नसेल तर अनुभवी व्यक्तीची मदत घ्यावी. किट वापरण्या अगोदर तुमचे हात कोमट पाणी घेऊन आणि साबण लावून धुवून घ्या. किटमध्ये लघवी टाकल्यानंतर ५ ते १० मिनिट वाट पाहावी. काही वेळा १० मिनिटेही लागू शकतात. तितका वेळ थांबून घ्यावे.

७) प्रेगन्सी टेस्ट वरून कसे समजावे? ( पॅझिटिव्ह आहे का निगेटिव्ह )

किट मध्ये दिलेल्या चिन्हांवरून तुम्हाला रिजल्ट समजेल. काही किट्स मध्ये + आणि – असे चिन्ह दिलेले असतात. त्याच्या अर्थ असतो + म्हणजे गरोदर आणि – म्हणजे गरोदर नाही असा आहे. काही किट्स मध्ये रंग बदलतो किंवा विशेष प्रकारच्या रेषा दाखवलेल्या असतात. हे सर्व किट कोणत्या कंपनीची आहे त्यावर असते. तेव्हा त्या-त्या किटमध्ये पाहून घ्यावे.

८) डॉक्टरांना केव्हा भेटायचे ?

जर तुमचा रिजल्ट पॉझिटिव्ह आला तर डॉक्टरांना कडे जाऊन तपासणी करावी. तुमचे रक्त तपासले जाईल आणि काही गोळ्या देतील. आणि जर समागमानंतर मासिक पाळी आली नाही आणि २ टेस्ट केल्या त्या निगेटिव्ह आल्या तरीही डॉक्टरांकडे जा. काही वेळा रिजल्ट पॉझिटिव्ह येत नसतात तेव्हा ते खरे कारण सांगतील. तुमच्या शरीरातील काही कारणांमुळे आणि मानसिक ताणामुळेही रिजल्ट येत नसतात. याप्रकारे तुम्ही घरच्या घरी प्रेगन्सी टेस्ट करू शकतात.

Leave a Reply

%d bloggers like this: