sansar-yasasvi-honysathi-ya-goshti-lakshat-theva

जर तुम्हाला तुमचे लग्न संसार नाते चांगला व्हावा, यशस्वी व्हावा असे वाटत असेल त्यावेळी दोघांकडून यासाठी प्रयन्त होण्याची अवश्यकता असते. नाहीतर दोघांची कुटुंब आणि स्वतःचे कुटुंब आणि मुले यांच्यावर या गोष्टींचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. यासाठी काही गोष्टी दोघांनी एकमेकांसाठी करण्याची गरज असते त्या कोणत्या ते आपण पाहणार आहोत.

१. एकमेकांचा आदर करा.

प्रेम असले तरी त्याबरोबर एकमेकांविषयी आदर असणे देखील गरजेचे आहे. शब्दांचा वापर जपून करा. बाहेरच्या व्यक्तीसमोर एकमेकांचा अपमान करू नका.

२. कामांमध्ये एकमेकांना मदत करा

घरातल्या सगळ्या कामांची जबाबदारी घरातल्या एकट्या स्टीवर न टाकत त्यामध्ये तील मदत करण्याच्या प्रयत्न करा. तसेच सुटीच्या दिवशी सगळी बाहेरची कामे पुरुषांच्या मागे  न लावत घरातल्या स्त्रीने देखील काही कामे स्वतःहुन करावी. तेच मुलांच्याबाबतीत मुलांचा सांभाळ करताना देखील दोघांनी करावा.

३. एकमेकांच्या बोलण्याची वाट पाहू नका

जर तुमचे भांडण किंवा वाद-विवाद झाले तर. मी आधी का माफी मागू मी का आधी बोलू  असा विचार न करता  एकाने स्वतःहून पुढाकार घ्या आणि चर्चा करून  वाद संपवा.

४. एकमेकांच्या परिवार आणि मित्रपरिवाराचा आदर करा

दोघांसाठी आई-वडील नातेवाईक आणि मित्रपरिवार हे महत्वाचे असतात. त्यामुळे एकमेकांच्या आई-वडील नातेवाईक आणि मित्रपरिवाराचा आदर करा   

५. मानसिक आणि शारीरिक जवळीक

एका जोडप्यामध्ये मानसिक आणि शाररिक जवळीक नसणे ही त्यांच्यातील नात्यासाठी आवश्यक असते.बहुतांश पुरुष जोडीदाराची शारीरिक जवळीक नसण्याबाबत तक्रार असते. अश्यावेळी याबाबत एकमेकांशी संवाद साधणे  अत्यंत आवश्यक असते अन्यथा या गोष्टीमुळे नात्यात प्रचंड तणाव येण्याची शक्यता असते.

 

नात्यातील विश्वास

नात्यामध्ये विश्वास असणे हे एक चांगल्या नात्याचे लक्षण आहे. परंतु जर नात्यात विश्वास नसेल तत् मात्र नात्याचे ओझे बाळगण्यात काही अर्थ नसतो. आणि जर एकदा विश्वासला तडा गेला तर तो पुन्हा मिळवण्यास खूप अवघड असते. म्हणून नात्यात सर्व गोष्टी पारदर्शक ठेवा.

हॅलो मॉम्स… आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया… हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Leave a Reply

%d bloggers like this: