yoni-patalache-fatane-yabbadadal-mahiti-aarogya-tips-in-marathi

 

स्त्रियांच्या योनिमार्गाच्या आतील बाजूस एक पातळ पडद्यासारखी त्वचा असते, त्या त्वचेला योनिपटल असे म्हणतात. हा पातळ पडदा फाटल्यानंतर योनिमार्गाच्या आजूबाजूला जे छोटे -छोटे उंचवटे निर्माण होतात ते म्हणजेच योनिच्छेद. जास्तीचे शारीरिक श्रम, दुखापत,योनिमार्गाची वैदयकिय तपासणी, हस्तमैथून किंवा लैंगिक संबंध यांपैकी कोणत्याही कारणामुळे योनिपटल फाटू शकते.   

योनिपटल फाटल्यानंतर काही वेळेला योनिमार्गाच्या आजूबाजूच्या त्वचेवर किंवा योनिमार्गाच्या खालील बाजूस गुलाबी रंगाची गोलाकार लटकणारी त्वचा दिसून येते. पण योग्य वैदकीय तपासणीनंतर डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात   की  हा योनिच्छेद आहे.याचे शास्त्रीय नाव caruncule myrtiformes असे आहे.

काही काळानंतर योनिच्छेद आपोआप बरा होतो.योनिच्छेदामुळे शारिरीक संबधांदरम्यान त्रास किंवा वेदना होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.

पण जर तुम्हाला काही त्रास किंवा वेदना होत असतील तर तेलासारख्या पदार्थाचा  डॉक्टरांच्या सल्ल्याने वापर करा  ज्या स्त्रियांना याचा खूपच त्रास होतो, स्त्रीरोगतज्ज्ञांकडून याविषयी उपचार करून घेणे गरजेचे आहे.

जर तुम्हाला योनिच्छेदाचा खूपच त्रास होत असेल आणि शारीरिक संबंधां दरम्यान वेदना होत असतील तरच शस्त्रक्रियेचा विचार करा.कोणत्याही प्रकारच्या संक्रमणापासून बचावासाठी अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञाचाच सल्ला घ्या.

Leave a Reply

%d bloggers like this: