garbharpanatil-ani prasuti-natarche-waxing

 

गरोदर असताना वॅक्सिंग करणे

बहुतांश स्त्रिया या वॅक्सिंग करणे पसंत करतात परंतु नेहमी करण्यात येणारे वॅक्सिंग आणि गरोदरपणात किंवा प्रसूतीनंतर करण्यात येणारे वॅक्सिंग यामध्ये बराच फरक असतो आणि विशेषतः बिकनी वॅक्सिंग मध्ये. या काळात त्वचा ओढली जाऊन  काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते तसेच क्रिम्सचा वापर केला असता. केमिकलयुक्त क्रिम्सचा देखील दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. आणि बिकनी वॅक्स करताना त्या भागातली त्वचा ओढली जाणे हे त्रासदायक असते. तसेच विविध क्रिम्सचा वापर केल्यास  त्या भागात इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.  तसेच रेझरच्या वापराने कापण्याची शक्यता असते . या काळात नॉर्मल हात पाय  या भागाचे वॅक्सिंग करू शकता परंतु त्यावेळी देखील तुम्हाला सहन होईल त्या पद्धतीने वॅक्सिंग करावे उगाच त्रास होत असल्यास  वॅक्सिंग करण्याची गरज नाही.

  प्रसूती नंतर

प्रसूती नंतर लगेच कोणत्याही प्रकारचं वॅक्सिंग करणं हे थोडं त्रासदायक ठरू शकते आणि त्यातून बिकनी वॅक्सिंग करणे हे अत्यंत  त्रासदायक आणि धोकादायक ठरू शकते. प्रसूती म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच  मानला जातो. त्यामुळे संपूर्ण शरीर हे नाजूक आणि हळवं झालेले असतं  त्यामुळे या काळात कोणत्याही पद्धतीने केलेलं वॅक्सिंग हे कितपत सहन होऊ शकतं  हे सांगणे कठीण आहे. तसेच बिकनी वॅक्सिंग मध्ये योनी आणि आसपासचा सर्वच भाग अत्यंत नाजूक झालेला असतो तसेच टाके, आणि काही जखमा देखील असतात त्या भरून आलेल्या नसतात त्यागरोदर असताना आणि प्रसूती नंतर आपल्या शरीराला जितक्या जास्त प्रमाणात जपता येईल तितके जपण्याचा प्रयन्त करावा. वॅक्सिंगमुळे आणि विशेषतः बिकनी वॅक्सिंग म्हणजे गुप्तांगाच्या भागातील वॅक्सिंग करावे की  करू नये याबाबत बरेच मत प्रवाह आहेत. त्याबाबत काही गोष्टी आपण जाणून घेऊ. यामुळे साधारण प्रसूती नंतर साधारणतः  ६-७ महिने या भागेचं वॅक्सिंग करणे टाळावे.

गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर काही दिवस वॅक्सिंग केले नाहीतर फारसा काही  आणि विशेषतः बिकनी वॅक्सिंग केले नाहीतर काही फरक पडत नाही उलट केल्यास विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे काही  दिवस या गोष्टी टाळण्याचा प्रयन्त करावा. 

Leave a Reply

%d bloggers like this: