lahan-mulana-aushadh-detana-ya-goshti-lakshat-theva

मुल लहान असताना आजारी पडल्यावर त्यांना बरं करण्यासाठी आपण सगळ्या प्रकारचे प्रयत्न करतो. परंतु हे प्रयतन करताना जागरूक असणे गरजेचे असते आणि विशेषतः बाळाला औषधें देताना. एखादी चूक गंभीर समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे लहान मुलांना कोणत्याही प्रकारचे औषध देताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. लहान मुलांना औषध देताना साधरणतः काही चुका होतात त्या टाळण्याची गरज असते. त्या चुका कोणत्या आणि त्या कश्या टाळाव्या त्या आपण पाहणार आहोत.  

१.औषधचे नाव

औषधचे नाव सारखे दिसते म्हणून ते औषध न देता औषधाचे नाव नीट बघून घ्यावे आणि मगच ते औषध मुलाला द्यावे. तसेच त्या औषधाची मात्रा ( पॉवर २५,५०) देखील तपासून घेणे आवश्यक असते. औषध घेताना मुदत संपली नाही ना?(Expiry dates) हे अवश्य तपासून पहा. औषधावरच्या सूचना वाचा. त्या नुसार आणि डॉक्ट्रांच्या सल्ल्याने औषध द्या.

२. अति औषधाचा वापर

लहान मुलांना साधं सर्दी-पडसे झाले असले तर डॉक्ट्रांनी सांगितलेल्या औषध त्यांनी सांगितलेल्या प्रमाणातच द्यावे. लवकर बरं म्हणून अति औषधाचा वापर करू नका. तसेच सर्वसाधारण सर्वासाठी असणारी  सर्दी खोकल्याची औषधे ही  लहान मुलांना देऊ नये त्यातील घटकांचे प्रमाण हे त्यांच्या साठी अति असू शकते त्यामुळे. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध द्या.

३. डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष (करू नका)

एखाद्या औषधाचा चांगला परिणाम तुमच्या बळावर होता आहे आणि त्यामुळे बाळाला अराम पडत आहे. बाळाच्या तब्बेतीत सुधारणा होत आहे असे दिसल्यावर. डॉक्ट्रांनी दिलेल्या औषधाच्या डोसा पेक्षा जास्त डोस  देण्याचा मोह तुम्हांला होण्याची शक्यता आहे. पण असा मोह टाळावा आणि डॉक्ट्रांच्या सल्ल्यानुसारच बाळाला औषध द्या. तसेच बाळाला बरे वाटत हे असे दिसल्यावर डॉक्ट्रांनी  दिलेला औषधाचा कोर्स मधेच सोडू नका तो पूर्ण करा. अन्यथा तो आजार पुन्हा होण्याची शक्यता असते.

४. उगाच कोणतेही औषध देणे (टाळा.)

एखादे औषध उगाच देणे टाळा. उदा. एखाद्या खोकल्याच्या औषध खोकला थांबवायला मदत करतेच पण त्यातील काही घटकांमुळे मुलं शांत झोपते. म्हणून उगाच मुल  शांत झोपते म्हणून ते औषध देऊ नये. अश्या औषधाचा  मुलाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता जास्त असते.

५. एक औषध सगळ्यांना लागू करणे (टाळावे)

समाज तुमच्या मुलाचा घसा खवखवत आहे किंवा त्याला ताप  आला आहे. अश्यावेळी तुमच्या दुसरी मुलाला किंवा ओळखीच्या कोणाच्या मुलाला वापरण्यात आलेले औषध तुमच्या मुलाला देखील लागू होईल म्हणून देऊ नये. कदाचित ते औषध लागू होईल देखील पण त्या आधी डॉक्टरांचा  सल्ला घ्या. कारण प्रत्येकाच्या प्रकृती नुसार औषध घेणे गरजेचे असते. तसेच त्या औषधाचा डॉस देखील प्रकृतीनुसार आणि आजाराच्या स्वरूपानुसार वेगळा असू शकतो. अश्या वेळी चुकीचे औषध देणे घातक  ठरू शकते.

दोन डोसच्या मधले अंतर कमी किंवा जास्त असणे

डॉक्ट्रांनी दिलेले औषधाचे डोस हे वेळच्यावेळी देणे आवश्यक असते त्यामुळे त्या औषधाचा परिणाम योग्य  प्रमाणात होतो. औषधाचा डोस जर एका पहिल्या डोसनंतर लवकर दिल्यास काही दुष्परिणाम होण्याची शक्यता असते तसेच अंतर जास्त असल्यास औषधाचा परिणाम योग्य प्रमाणात होत नाही.

औषधी साठवण आणि ठेवण्याची जागा

ही बाबा सर्वसाठीच लागू होते. औषधावर लिहले असते कि ते औषध कश्या प्रकार ठेवावे. उदा. जसे काही औषधें फ्रिजमध्ये नाही पण जिकडे जास्त उष्णता नसेल अश्या ठिकाणी ठेवा सांगतात. तर काही औषधे कटाक्षाने फ्रिजमध्ये ठेवण्याची सूचना असते. तर काही औषधे ही अंधारात ठेवा किंवा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊ देऊ नका असे निर्देश दिलेले असतात. या सूचनांचे पालन करणे गरजेचे असते कारण जर  ठेवावी असं  सांगितलेले असते. कारण जर हि औषधे सांगितलेल्या पद्धतीने ठेवले नाही तर त्या औषधाची  प्रकीर्या होऊन काही त्या औषधेचे घटक बदलण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या औषधे  एकतर निष्क्रिय  किंवा त्या औषधाच्या सेवनाने दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. 

त्यामुळे लहान मुलांना औषधे देताना काळजी बाळगणे गरजेचे असते कारण लहान मुलांची पप्रतिकार शक्ती ही  प्रौढ व्यक्ती पेक्षा कमी असते.  त्यामुळे कोणतेही औषध डॉक्ट्रांच्या सल्ल्याशिवाय देऊ नये.  आणि औषध देताना वरील गोष्टी लक्षात असू द्याव्या.

Leave a Reply

%d bloggers like this: