nirodhacha-vapar-kartana-kahi-goshti-lakshat-ghya

निरोध म्हणजे काय 

कॉन्डोम हा एक साधा पण गरजेचं असा एक शोध आहे. यामुळे अनेक जणांच्या आयुष्यात बदल घडून आला आहे. जगात साधारणतः दरवर्षी १५ बिलियन काँडोमचा वापर होतो. यामुळे काही यौनसंक्रमण होण्याचा धोका कमी होतो. तसेच गर्भनिरोध म्हणून देखील याचा वापर होतो. फक्त याचा वापर योग्य पद्धतीने केला गेला पाहिजे. कॉन्डोमचा उपयोग गर्भनिरोध म्हणून कसा उपायो होतो आणि त्याविषयी माहिती पाहणार आहोत.  

    कॉन्डोमच्या वापरानंतर गरोदोर होण्याची शक्यता ?

कॉन्डोम च्या वापर संभोगाच्या वेळी केल्याने गरोदर राहण्यची शक्यता अगदी कमी असते. काही अभ्यासद्वारे हि शक्यता अगदी २ ते ३ टक्के सांगण्यात आली आहे. आणि  हे २ ते ३ टक्के शक्यता देखील काँडोमचा वापर योग्य पद्धतीने केला नाही तरच होण्याची शक्यता आहे

कॉन्डोम फाटल्यामुळे गरोदर होण्याची शक्यता असते का?

जर कॉन्डोम फाटले तरी गरोदर राहणे  हे स्त्रीच्या मासिकपाळीच्या चक्रावर आधारलेले असते . साधारणतः पाळीच्या ११ते १५ या दिवसात गरोदर राहण्याची जास्त शक्यता असतात .

काँडोमचा वापर

कॉन्डोमचा  कसा करावा हे खार तर त्याचा पाकिटावर विस्तृतपणे लिहलेले असते. पण साधारण कोणती काळजी घ्यावी हे पुढे सांगितले आहे.

कॉन्डोम बाहेर काढताना त्याला नख लागणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा ते फाटण्याची शक्यता असते

-वापरण्या अगोदर त्याच्या आतली हवा बाहेर काढा.

कॉन्डोम घातल्यानंतर योग्य पद्धतीने घेतल्याची खात्री करून घ्या.

वापरा नंतर टिश्यूपेपर मध्ये गुंढाळून फेकावे

गरोदरपणातील काँडोमचा वापर

गरोदर असताना काँडोमचा वापर करताना काळजीपूर्वक वापर करण्याची गरज असते. याच्या वापराने यौन संक्रमणा होत नाही. मुल आजारापासून वाचते.

कॉन्डोमच्या वापराचे गरोदरपणातील दुष्परिणाम

काँडोमचा वापर गरोदरपणात सुरक्षित असला तरी त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. कॉन्डोम बनवताना वापरलले काही केमिकलयुक्त घटकांमुळे गर्भवती परिणाम होण्याची शक्यता असते त्यामुळे कोणत्या प्रकारचे काँडोमचा वापर करायचा हे तपासून घेणे गरजेचे असते, यातील काही घटकांमुळे गर्भवती विपरीत परिणाम तर होतातच परंतु कमी प्रतीच्या कॉन्डोमच्या वापराने स्त्रियांना योनीमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

या गोष्टी जाणून घेणे गरजेच्या आहेत. यात लाज वाटण्यासारखे काही नाही. शेअर करा आणि इतरांना जागरूक करा.

Leave a Reply

%d bloggers like this: