stanpan-denarya-matansathi-kahi-tips

मुल होणं हा वर्णन न करता येण्यासारखा अनुभव असतो. नऊ महिने एखादा जीव पोटात वाढवायचा आणि ९ महिन्या नंतर एखाद्या चमत्कारसारखं एक छोटासा बाळा आपल्या हातात येतं.त्यातून जर तुमचं पाहिलं बाळा असले तर तुम्हांला सगळ्याच गोष्टी नवीन असतात बाळाला कसं पकडावं पासून ते त्याला स्तनपान कसे द्यावे या पर्यंत. आम्ही तुम्हाला पुढे काही  स्तनपान  संदर्भात काही टिप्स देणार आहोत

१. बाहेर असताना स्तनपान कसे करावे

 

प्रसूतीनंतरचे काही दिवस आराम झाल्यावर काही दिवसाने काही काम निमित्त किंवा फिरायला बाहेर पडावे लागते त्यावेळी बाळाला बरोबर घेऊन गेलात आणि बाळाला  भूक लागली तर  बाळाला उपाशी ठेवायची गरज नाही. हल्ली बाळाला पटकन पाजता येतील अश्या कपडे बाजारात मिळतात त्याचा वापर करवा कायम एक ओढणी किंवा शाल बरोबर बाळगावी जेणेकरून तुम्ही बाहेर असताना बाळाला स्तनपान देण्याची वेळ आल्यास  तुम्हांला  अवघडल्यासारखे होणार नाही.

२.बाळाला बाहेर घेऊन जाताना कसे कपडे घालावे.

ज्यावेळी तुम्ही तान्ह्या बाळाला  घेऊन बाहेर जाला त्यावेळी स्तनपानासाठी असणाऱ्या ब्रा आणि इतर स्तनपानासाठी असणारे कपडे घालावे आणि ते शक्य नसल्यास ज्या कपड्यामध्ये तुम्हांला बाळाला पाजताना त्याला सांभाळताना अवघडल्यासारखे होणार नाही अश्या प्रकारचे कपडे घालावे. त्यामुळे तुम्हाला बाहेर पडल्यावर त्रास होणार नाही व बाळाची देखील आबाळ  होईनात नाही.

३. स्तनपान सुकर कसे होईल  

 

सुरवातीचे काही दिवस घरात आणि बाहेर देखील बाळाला स्तनपान देणे अवघड जाईल परंतु त्यामुळे  बाळाच्या तब्बेतीबाबत काळजी वाटण्याचे कारण नाही. सरावाने ते नीट जमायला लागेल. हळू हळू सवय झाल्यावर तुम्हांला बाळाला कसे हाताळायचे कोणत्या पोझिशन मध्ये योग्यप्रमाणत स्तनपान देता येते याचा अंदाज येईल त्यामुळे बाळाला वेळोवेळी स्तनपान देत राहणे गरजेचे आहे. तसेच वेळोवेळी स्तनपान दिल्यामुळे दुधाचे प्रमाण देखील वाढेल.

४. स्तनाग्रांची काळजी

ज्यावेळी तुम्ही बाळाला पाजत नसाल त्यावेळी स्तनाग्रांना तूप किंवा लोणी लावून  या यासारखे पदार्थ लावूनस्तनाग्रांची काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्हला स्तनपान देताना त्रास होणार नाही. तसेच स्तनाग्रांबाबत उद्भवणारे आजार उद्भवणार नाहीत.पण हे करताना एवढे लक्षात असू द्या एखादे क्रीम किंवा लोशन लावले तर बाळाला दूध पाजण्या आधी ते स्तनाग्रे स्वच्छ करून घ्या अन्यथा ते क्रीम लोशन बाळाच्या पोटात जाण्याची शक्यता असते. 

५. आहार आणि पाण्याचे प्रमाण

ज्यावेळी तुम्ही बाळाला अंगावर पाजत असता त्यावेळी तुमचा आहार सकस ठेवणे गरजेचे असते. कारण तुमच्याद्वारे स्तनपानतून बाळाला आवश्यक जीवनसत्वे मिळत असतात. बाळाच्या सुदृढ  तब्बेतीसाठी  हे आवश्यक असते. तसेच या काळात तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी देखील योग्य राखणे गरजेचे असते.

६. स्वतःची तुलना कोणाशी करू नका

स्वतःची तुलना दुसऱ्या मातांशी करू नका. प्रत्येक स्त्रीचे अंगावरील दुधाचे प्रमाण कमी जास्त असते त्यामुळे याबाबतीत तुलना करू नका. तसेच प्रत्येकाला स्तनपान देताना  होणारे त्रास देखील वेगवेगळे असू शकतात, त्यामुळे याबाबतीत एकमेकांचे अनुभव सांगा परंतु एकमेकांची तुलना करू नका.

आमचा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद ! आमच्या वाचकांसाठी आम्ही एक सवलत ऑफर देत आहोत त्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

%d bloggers like this: