tumchya-carriersathi-tumche-pati-ya-goshti-karnyacha-prayatn-kartat

 

स्त्रीला आपले करियर घर आणि मुल संभाळणे या सगळ्या गोष्टी करणे म्हणजे एक दिव्यच असते. परंतु आजकाल बहुंतांश पती आपल्या पत्नीला तिने तिच्या क्षेत्रात यशस्वी व्हावं यासाठी तसेच तुम्हांला या सगळ्या गोष्टीत करत असताना काही गोष्टीत मदत करून  तुमचा भार  हलका करायचा प्रयत्न करतात. ते कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी आणि तुमच्या करियरच्या प्रगतीसाठी करतात ते आपण पुढे पाहणार आहोत.

१.स्वयंपाक करणे

ज्यावेळी तुम्हांला प्रचंड कामाचा ताण असेल त्यावेळी ते स्वयंपाक करतात. स्वयंपाक घरातील इतर कामे कोणताही भेदभाव मनात न बाळगता सगळी कामे करतात.

२. तुमच्या कामाला देखील महत्व देतात

तुमचं करियर तुमचं काम तुमच्यासाठी किती महत्वाचे आहे हे त्यांना माहित असतं आणि स्वतःच्या काम इतकाच तुमच्या कामाला महत्व देतात.

३. तुमची समस्या समजून घेण्याचा प्रयन्त करतात

तुमच्या ऑफिस मधल्या, कामामधल्या समस्या समजून घेण्याचा प्रयन्त करतात आणि जमल्यास त्यावर उपाय सांगतात. 

४. तुमच्या तक्रारी आणि बडबड ऐकून घेतात. 

ते तुमच्या कामाबाबतची इतर बडबड, ऑफिसमधले किस्से,तक्रारी काही तक्रार न करत ऐकून घेतात  

५. मुलांची काळजी घेतात.

ज्यावेळी तुम्हांला काही महत्वाचे काम करायचे असते टीव्हीला तसेच तुम्ही कामानिमित्त कुठं बाहेरगावी गेल्यास ते मुलांकडे व्यवस्थित लक्ष देतात आणि मुलांची काळजी घेतात.

६. कामात मदत

ज्यावेळी तुम्ही एखादी महत्वाचे काम असेल उशीर होत असेल त्यावेळी  ऑफिस पर्यंत सोडवायला येतील.  किंवा एखादे महतवाचे प्रझेंटेशन असेल तर ते योग्य कसे होईल यासाठी मदत करतात.  

७. सदैव तुमची साथ देतात

दिवसाच्या शेवटी ज्यावेळी तुम्ही दमून भागून घरी पोहचता त्यावेळी ते तुमची वाट बघतअसतात. आल्यावर तुम्हांला हवं नको ते बघतात. आणि थकल्यावर डोकं ठेवायला त्यांचा हक्काचा खांदा सदैव तुमच्यासाठी तयार असतो.

Leave a Reply

%d bloggers like this: