tumchya-kesaana-lamb-aani-majbut-banava-ya-sat-margaani

 

प्रत्येक स्त्रीला तिचे केस सुंदर, दाट, आणि लांब पाहिजे असतात. आजूबाजूला अशी स्त्री असली की तुम्हालाही वाटते की, आपले केस असेच व्हायला हवे आणि खूप दिवसांपर्यत असेच दाट केस रहायला पाहिजे. पण सध्याच्या कामाच्या ओझ्यात आणि मानसिक ताण- तणावात केस गळायला लागले आहेत आणि पांढरे व्हायला लागलेत. म्हणून तुमचे केस सुंदर व दाट काळसर होण्यासाठी खाली दिलेले उपाय करू शकता. खूप साधे उपाय आहेत.

१) ओले केस

अंघोळ झाल्यावर तुमचे ओले केस हे खूप नाजूक असतात आणि तुटत असतात. तेव्हा त्यांना लगेच फणी किंवा ब्रश काहीच लावू नका. ओले केस असताना त्या केसांना टॉवेलने बांधून घ्यायचे. आणि जेव्हा तुम्ही शाम्पू लावाल तेव्हा हळुवार शाम्पू लावा खूप खरडून लावू नका. कारण लावलेले तेलाचे घटक त्या केसांतून निघून जातात.

२) उशीचे कव्हर मुलायम

 

कापसाच्या उशीला कव्हर मुलायम लावायचे कारण खरखरीत राहिले तर घर्षण होऊन खूप केस तुटतील. जेव्हा तुम्ही पलंगावर जाणार तेव्हा वेणी घालून किंवा केस बांधून जात जा. घर्षण कमी होईल आणि केस कमकुवत किंवा तुटणार नाही.

३) स्टायलिश साधने केसांवर वापरू नका

केसांसाठी जी स्टायलिश साधने वापरली जातात ती वापरणे बंद करावे. उदा.  Straighteners, curlers यासारखी साधने तुमच्या केसातले मॉइश्चर शोषून घेत असतात. काही जण स्वतःच्या केसाबाबत विचित्र प्रयोग करत असतात तेव्हा असे काहीच करू नका. केसांवर  नैसर्गिक उपचार करा. कोरफड लावणे इ.

४) रात्री केसांची मालिश

दररोज नियमित तेल लावल्यामुळे केस सशक्त होतात आणि केसांची मुळेही मजबूत होतात. रात्री शाम्पू घेऊन केस धुवून घ्यायचे. आणि एक किंवा २ तासांनी खोबऱ्याच्या तेलाने, आमला तेल, बदाम तेल जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते तेल लावून हळुवार मालिश करून घ्या. वाटल्यास तुम्ही तेलाला गरम करूनही मालिश करू शकता आणि नंतर डोक्याला टॉवेल गुंडाळून घ्यायचा. मालिश तुमच्या सोयीने करू शकता. 

५) केसांना कंडिशनर करत रहा  

जर तुमचे केस कोरडे आणि कुरळे असतील तर अंघोळ करण्यावेळी कंडिशन करण्याचे विसरू नका. तुम्हाला जमलेच तर  कंडिशन पद्धतीमध्ये केळी, अवोकॉड(Avocoda )    नावाचे फळ, आणि दही वापरा. आठवड्यातून एकदा केले तरी चालेल.

६) थंड पाण्याने केस धुवा किंवा थंड पाण्याच्या शॉवर घ्या 

तुम्हाला शक्य झालेच तर थंड पाण्याने अंघोळ करा. आणि जर थंड पाण्याने अंघोळ करणे जमत नसेल तर अगोदर गरम पाण्याने अंघोळ करून नंतर थंड पाणी डोक्यावर टाकून घ्या. कारण थंड पाण्याने केस खळखळून धुतले जातात आणि त्यामुळे केस स्वच्छ होतात. व ताजेतवाने होतात. केसांमध्ये स्वच्छ हवा जाऊन त्यांचे पोषण होते. 

७) कंगवा व्यवस्थित फिरवा

जेव्हाही तुम्ही केसांवर कंगवा किंवा ब्रश फिरवणार त्यावेळी व्यवस्थित फिरवा. खूप ताणून फिरवून केसांची मुळे उपटून काढू नका. हळूहळू कंगवा फिरवा आणि टाळूला हलका स्पर्श होऊ द्या. टाळूला हलक्या स्पर्शाने काही घाण निघून जाते. आणि जी फणी किंवा कंगवा वापरणार तो खूप कडक असायला नको. हे सर्व उपाय दररोज करत रहा. लवकरच तुम्हाला फरक लक्षात येईल पण नियमितपणा असू द्या. 

Leave a Reply

%d bloggers like this: