busy-aai-ya-prakare-swatasathi-vel deu shakte

बाळ झाल्यानंतर आईला स्वत:साठी असा वेगळा वेळ मिळतच नाही. थोडक्यात स्वत:साठी ‘नो टाईम’! स्त्रिया घरातल्या इतरांसाठी दिवसभर राबत असतात, कामे करत असतात. नवऱ्याचा डबा भरणे, घर आवरणे ते बाळाचे डायपर बदलणे, त्याला जेऊ घालणे स्वतःचे ऑफिसची कामं  इथपर्यंत. बाळाची काळजी, त्याचे संगोपन, देखभाल ही सगळीच कामे तुम्हाला करावी लागतात.   

आई सर्वांची कामे करत असते. तुमचा दिवसातला सगळ्यात जास्त वेळ हा इतरांची कामे करण्यात निघून जातो. बाळाच्या सर्व गोष्टींना तर तुमच्याकडून इतके महत्व दिले जाते की स्वत:साठी काही करण्यास तुम्हाला वेळेचे भानच राहत नाही.

तुमचा अंघोळीचा वेळ हा काही तुमचा तुम्ही एकटे असता म्हणून ‘स्वत:चा वेळ’ ठरत नाही. एक आई म्हणून तुम्हाला तुमच्या स्वत:च्या वेगळ्या वेळेचं महत्व असायला हवे कारण ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठीसुद्धा अतिशय उपयोगी आहे. यामुळे तुमची मानसिक चिडचिड, ताण कमी होतो आणि तुमच्या बाळाच्या गरजा तुम्ही अधिक योग्य रीतीने समजून घेऊ शकता. कल्पना करा की तुम्ही

आयुष्यभर एकाच जागी अडकून बसले आहात. तुमच्याकडून शक्य आहे का ते? नक्कीच नाही.!तुम्हाला काही वेळ वेगळं काढण्याची गरज आहे. हा वेळ स्वत:मध्ये गुंतवा. एक बदल म्हणून तुमच्या मानसिक आरोग्यासाठी हे उपयुक्त आहे. खाली दिलेल्या ५ प्रकारे तुम्ही स्वत:साठी वेळ काढू शकता.

१. जे मनापासून करायला आवडते त्यात वेळ गुंतवा.

तुमच्यासारखी एक जबाबदार आई नेहमीच बाळाच्या उत्तम संगोपनासाठी आणि एक उत्तम आई बनण्यासाठी काय करता येईल याचा विचार करत असते. पण हे विसरून चालणार नाही की एक स्वतंत्र  व्यक्ती म्हणून तुमच्याही काही आवडी-निवडी, छंद आणि सवयी आहेत. मग तुम्ही स्वत:साठी वेळ काढून या गोष्टी का नाही करत ज्या तुम्हाला बऱ्याच काळापासून करायच्या आहेत. आणि जरी तुम्हाला काहीच न करता बसून रहावेसे वाटले तरीही चालेल, आळशीपणा सुद्धा तुमच्यासाठी माफ आहे!

२. तुमचा जोडीदार तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी आतुर आहे.

गरोदर असतांना तुमचा जोडीदार हा तुमचा महत्वाचा आधार होता आणि तुमची बरीचशी मदत  त्याने या काळात केली आणि आता यासाठीच त्याला Thank You म्हणण्याची वेळ आली आहे. तुमच्या प्रिय नवऱ्यासाठी छानसा आणि त्याच्या आवडीचा स्वयंपाक करा किंवा दोघं एका सुंदर कॅन्डल लाईट डिनर ला जा. त्याला इतक्या दिवसांपासून मिळत नसणारे तुमचे लक्ष आणि वेळ दया.    

३. तुमचा फोन दूर ठेवा.

आजकाल स्मार्टफोन अतिशय गरजेचे साधन झाले आहेत, यात काही शंकाच नाही. पण दिवसभर फोनवर विविध कामात व्यस्त असणे तुमच्या डोळ्यांवर ताण आणू शकते. तसेच तुमच्या बाळाला देखील यामुळे तुमचे पुरेसे लक्ष मिळत नसल्यासारखे वाटेल. यातून तुमचे लक्ष मिळवण्यासाठी बाळ फोनशी स्पर्धा करेल आणि त्यालाही फोनची लहान वयातच सवय लागेल जे काही घातक ठरू शकते. त्यामुळे योग्य हेच ठरेल कि तुम्ही स्वत:साठी देण्याच्या वेळात फोन पासून दूर रहा.

४. तुमच्या मुलांवर खूप रागावणे बंद करा.

लहान मुले अर्थातच काही खट्याळ गोष्टी करतात. यातून त्यांना तुमचे लक्ष वेधून घ्यायचे असते. आईचा राग कसा ओढून घ्यायचा हे तर त्यांना चांगलेच माहित असते. त्यामुळे जोपर्यंत त्यांना तुमचे पुरेसे लक्ष मिळत आहे तोपर्यंत त्यांना तुमच्या रागावण्याबद्दल आणि तुमची बोलणी बसल्यास काही वाटत नाही. त्यामुळे शांत राहा आणि रागावू नका. ही शांतता एन्जोय करा.

५. तुमच्या मैत्रिणींना बोलवा.

तुमच्या सगळ्या ‘मॉमी’ असणाऱ्या मैत्रिणींना एकत्र करून तुमची ‘गँग’  घेऊन मस्तपैकी आईस्क्रीम खायला जा. सगळ्यांनी गप्पागोष्टी करा. तुमची वेळोवेळी तुमच्या कुटुंबासाठी कणा म्हणून उभ्या राहिलात आणि सोबतच सगळ्यांची काळजी घेत असता. त्यामुळे तुम्ही सर्वजणी इतक्या अमेझिंग आई आहात त्याचं सेलेब्रेशन झालच पाहिजे ! नाही का ?

हे वाचत असणाऱ्या सगळ्याजणींना हे जमणार आहे कारण  ‘तुम्ही अमेझिंग आहात !’
 

Leave a Reply

%d bloggers like this: