c-section-prasuti-madhe-bal-baher-kase-yete-

सी सेक्शन किंवा सिझेरियन ही एक विशिष्ट शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये स्त्रीरोगतज्ञ मातेच्या पोट व गर्भाशय कट करून शस्त्रक्रियेद्वारे बाळाला बाहेर काढतात आणि बाळाचा जन्म होतो. पुढे हि शस्त्रक्रिया कश्या प्रकारे करतात आणि या पाहणार आहोत.  या शास्त्रकियेची माहिती वाचून घाबरून जाण्याची गरज नाही. प्रसूती नंतर डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचना जर योग्य पद्धतीने पाळल्यास प्रसूतीनंतर होणार त्रास बऱ्याच प्रमाणत कमी होऊ शकतो.

सी-सेक्शन शस्त्रक्रियेच्या आधी काय घडते?

या सर्जरीसाठी तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार केले जाईल. जसे की :

१. तुम्हाला दवाखान्यातला स्वच्छ, असंक्रमित असा गाऊन घालायला दिला जातो.

२. तुम्हाला तुमच्या अंगावरील सर्व दागिने, नेल पेंट, कॉन्टॅक्ट लेन्स, चष्मा या गोष्टी बाजूला काढून ठेवायला सांगितल्या जातील.यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान शरीराच्या रंगाबदलावर लक्ष ठेवण्यास सोपे जाईल.

३.रक्तातील लोहाचे प्रमाण जाणून घेण्यासाठी तुमच्या रक्ताचा नमुना घेतला जाईल. जर हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल, तुम्हाला ‘अनेमिया’ असले तर तुम्हाला शस्त्रक्रियेच्या वेळी रक्त चढवावे लागेल. दवाखान्यात या सर्वाची सोय आधीच करून ठेवली जाते.

सर्जरी ची सुरवात.

१. तुम्हाला ऑपरेशन थेटरमध्ये सर्जरीच्या मेज वर पाटीवर झोपायला सांगितले जाईल.

२. तुमच्या हाताच्या नसेमध्ये एक ड्रीप इंजेकशनद्वारे सोडली जाईल. यामुळे तुम्हाला एक तरल पदार्थ मिळत राहील आणि शस्त्रक्रियेदरम्यान किंवा नंतर तुम्हाला औषधी देण्याची गरज पडली तर ती या मार्गाद्वारे दिली जाऊ शकतात.   

३. यानंतर तुम्हाला बेशुद्ध होण्याचे औषध म्हणजेच ’एनेस्थेटिक’ दिले जाईल. प्रसुतीसाठी दिल्या जाणाऱ्या एनेस्थेशियाला ‘एपीड्यूरमियल एनेस्थेशिया’ असे म्हणतात. हा माकड हाडाजवळ दिला जातो. यामुळे तुम्हाला तुमचा कमरेखालचा भाग सुन्न झाल्यासारखे वाटेल.

सामान्य एनेस्थेशिया पेक्षा हा लोकल एनेस्थेशिया तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी योग्य असतो. सामान्य एनेस्थेशियात तुम्हाला गाढ झोप येते.

४. एक पातळ ट्यूब (कैथेटर) तुमच्या मुत्रमार्गाद्वारे मुत्राशायात घातली जाईल. याद्वारे तुमचा मूत्राशय पूर्णपणे रिकामा केला जाईल.

५.पोटाच्या ज्या भागावर कट लावला जाणार आहे त्याजागेवारचे केस काढले जातील. मग एका अॅन्टीबायोटीकद्वारे ती जागा स्वच्छ केली जाईल. यानंतर ह जागा एका स्वच्छ आणि असंक्रमित कापडाद्वारे झाकून त्या कापडावर जिथे चिरा लावायचा आहे तिथे कापून घेतले जाईल. म्हणजे शस्त्रक्रियेदरम्यान जिथे चिरा आहे तेवढीच जागा उघडी राहील.   

६. तुम्हाला एक साधन मनगटावर घालायला दिले जाईल जे तुमची नाडी मोजेल.

डॉक्टर प्रसुतीआधी आणि दरम्यान देखील तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवत राहतील.

७. तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवर हातांनी किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सतत लक्ष ठेवले जाते. जर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हे लक्ष ठेवले जात असेल तर तुमच्या छातीवर एलेक्ट्रोड्स लावले जातील.

८. नसांच्या देखरेखीसाठी हातांच्या बोटांवर ‘पल्स मोनीटर’ लावले जाऊ शकते.

तुम्हाला खालील गोष्टी दिल्या जातील.

१. संक्रमण दूर ठेवण्यासाठी अॅन्टीबायोटीक्सचे इंजेक्शन .

२. उलटी रोखण्यासाठी मळमळ होऊ नये म्हणून औषध.

३. सिझेरियनच्या दरम्यान आणि नंतर प्रभावशाली वेदनाशामक औषध.

४. खूप काळासाठी रहाणाऱ्या वेदनेसाठी औषध.

५. जर बाळाला गरज भासली तर आपत्कालीन स्थितीसाठी अॉक्सिजन मास्क.

सिझेरियनच्या दरम्यान काय घडते.

तुमच्या शरीराचा कमरेखालचा भाग सुन्न झाला की डॉक्टर तुमच्या प्युबिक बोन म्हणजेच उटीपोटाच्या हाडाच्या थोडे वर २ बोटांच्या लांबी एवढी आडवी चीर पाडतात.

पोटाच्या त्वचेखालील मांसपेशींना मोकळे केले जाते म्हणजे गर्भाशयापर्यंत पोहोचले जाऊ शकते. या मांस पेशींना चिरण्याऐवजी वेगळे केले जाते. गर्भाशयाच्या खालच्या बाजूस बघण्यासाठी मूत्राशयाला खालच्या बाजूस सरकवले जाते. 

यानंतर  खालच्या बाजून छोटा चिरा लावला जातो. कात्री किंवा बोटांंच्याच सहाय्याने डॉक्टर या चिर्यास फाकवून मोठे करतात. मोठा चिरा लावण्याच्या तुलनेत असे केल्याने रक्तस्त्राव कमी होतो.

आजकाल गर्भाशयाच्या केवळ खालच्या भागास चिरा लावून उघडले जाते. याचमुळे या शस्त्रक्रियेला अनेकदा लोवर सेग्मेंट सिझेरियन (LSSS) सेक्शन म्हटले जाते.

गर्भाशयाच्या पिशवीला उघडले जाते आणि तुम्हाला अचानक वेगाने एक द्रव पदार्थ वाहत असल्याचा आवाज येईल. यानंतर बाळाला बाहेर काढले जाते. तुम्हाला असे जाणवेल की डॉक्टर किंवा नर्स तुमच्या पोटावर दाब देत आहेत जेणेकरून बाळाला बाहेर काढण्यास मदत होईल. जर तुमचे बाळ ब्रीच स्थितीमध्ये असेल म्हणजे जर त्याचे पाय खाली असतील तर त्याचे पाय आधी बाहेर काढले जातील. यास बाळ पायाळू असणे असे म्हणतात.    

शिशूला बाहेर काढण्यासाठी केवळ काही मिनिटे लागतात. बाळाचा जन्म झाल्यावर नर्स बाळाच्या नभीवरील नाळेला चिमटा लावून नाळ काढून टाकेल.

या प्रक्रियेनंतर डॉक्टर चिरेवर टाके घालतील. मांसपेशी व त्वचेच्या प्रत्येक उघड्या बाजूला टाक्याच्या सहाय्याने बंद केले जाईल. गर्भाशयाला कदाचित दुहेरी टाके घातले जातील.

सगळे काम झाल्यावर तुम्हाला तुमच्या खोलीत पाठवले जाईल. बाळाची संपूर्ण तपासणी करून तुमच्याजवळ पाठवले जाईल. यावेळी तुम्ही तुमच्या पतीसोबत बाळाला निवांत भेटू शकता.

सी-सेक्शन ही एक मोठी शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेसाठी काहीप्रमाणात असहजता आणि वेदना येत राहतात. प्रसूती आधी दिल्या गेलेल्या औषधांमुळे तुमचा कमरेखालचा भाग सुन्न असतो त्यामुळे वेदना होत नाहीत. परंतु प्रसुतीनंतर जखमा दुखु लागतात  यासाठी डॉक्टर तुम्हाला वेदनाशामक औषधी देतात.

वरील प्रक्रिया वाचून घाबरून जाण्याचे कारण नाही ही  शस्त्रक्रिया जरी मोठी असली तरी प्रसूती नंतर घेतलेली काळजी तुमचे शरीर पूर्ववत होण्यास मदत होते.

Leave a Reply

%d bloggers like this: