garbhnirodhk-golyanche-dushparinam

 

 गर्भनिरोधक गोळ्यांमुळे नको असलेली गर्भधारणा रोखता येत असली तरी या गोळ्यांमुळे शरीरात संप्रेरकीय बदल घडून येतात आणि बहुतांश स्त्रियांना या गोळयांचा विविध दुष्परिणामांना सामोरे जावे लागते, प्रत्येक स्त्रीची प्रकृती वेगळी असते त्यामुळे कोणत्या गर्भनिरोध गोळ्याचे दुष्परिणाम त्याच्यावर होऊ शकतात आणि कोणत्या कमी प्रमाणत दुष्परिणाम करतात हे सांगणे अवघड असते. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे  होणारे काही दुष्परिणाम पुढे पाहाणार  आहोत.

१. डोकेदुखी, मळमळणे, अर्धशीशी

या गोळीच्या सेवनाने मळमळणे अर्धे डोके दुखणे. पूर्ण डोके दुखणे असे त्रास होऊ शकतात. वेगवेगळ्या गर्भनिरोधक गोळ्यांचे  वेगवेगळे परिणाम असू शकतात.

२. मासिकपाळी व्यतिरिक्त रक्तस्त्राव

या गर्भनिरोधक गोळ्यांच्या ३ महिने नियमित सेवनानंतर  गोळीच्या सेवनामुळे एकदा मासिकपाळी येऊन गेल्यावर दुसऱ्यांदा येणाऱ्या मासिकपाळच्या आधीच म्हणजे दोन मासिकपाळीच्या मधेच कधीतरी योनीमार्गातून रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. शरीरात होणाऱ्या संप्रेकीय बदलामुळे हे घडून येते.  

३. स्तन हळवे होणे.

यागोळ्यांच्या सेवनामुळे स्तन हळवे आणि नाजूक होतात. पण जर तुम्हांला  सुजल्यासारखे किंवा गाठी सारखं  काही जाणवलं तर ही बाब डॉक्ट्रांच्या निदर्शनास आणून द्या.

४. वजन वाढणे

वजन वाढणे आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा  तसा  काही संबंध येत नाही. या गोळ्यांमुळे फॅट असलेल्या पेशींचे प्रमाण वाढत नाही परंतु त्यांचा आकार वाढतो. तसेच या गोळ्यांच्या  सेवनामुळे काही महिलांच्या छातीमध्ये आणि नितंबाच्या भागात पाणी झाल्याचे देखील आढळून आले आहे.

५. मूड स्विंग

या गोळ्याचा सेवनामुळे बऱ्याच महिलाचे मूड सविंगचे प्रमाण वाढते. काही महिलांना औदासिन्य येते तर काही भावनिकरीत्या खूप हळव्या होतात. या गोळ्यांच्या  सेवनामुळे  नैराश्य येण्याची शक्यता असते.

६. योनीस्त्राव

काही महिलांना या गर्भनिरोधक गोळ्याच्या सेवनामुळे पांढऱ्या रंगाचा योनीस्त्राव  होण्याची शक्यता असते.कधी कधी हा स्त्राव इन्फेक्शनचा लक्षण देखील असते.

७. मासिकपाळी चुकणे

गर्भनिरोधक गोळ्याच्या सेवनामुळे कधीकधी मासिकपाळी चुकण्याची शक्यता असते किंवा दोन मासिकपाळी मधले अंतर वाढते. किंवा मासिकपाळीच्या वेळी कमी रक्तस्त्राव होतो.

८. नजरेवर दुष्परिणाम

गर्भनिरोधक गोळ्यांच्या  सेवनामुळे बुबुळाला सूज येऊन त्याच परिणाम तुमची नजर कमजोर होण्यावर होऊ शकतो.

९. कामजीवनावर परिणाम होतो

गर्भनिरोधक गोळ्यांच्या  सेवनामुळे कामजीवनावर देखील परिणाम होऊ शकतो. कामविषयक इच्छा कमी होऊ शकते  

१०. मुरम आणि केस गळणे

गर्भनिरोधक गोळ्याच्या सेवनाने त्वचेसंदर्भात तक्रारी वाढू शकतात मुरमे येणे त्वचेवर वांग येणे  या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. तसेच या गोळ्यांच्या सेवनामुळे बऱ्याच महिलांमध्ये केस गळतीचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले.  

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे नको असलेली गर्भधारणा  टाळता येत असली तरी त्याचे बरेच दुष्परिणाम आहेत. परंतु जर अपरिहार्यपणे जर या गोळ्या घेण्याची वेळ आलीच तर त्या गोळ्या घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या व तुमच्या प्रकृती नुसार कोणत्या प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्या तुम्हांला  लागू पडू शकतात व कोणत्या गोळ्यामुळे तुमच्या शरीरावर कमी प्रमाणात दुष्परिणाम होतील अश्या गोळ्याविषयी जाणून घ्या. तसेच वरील लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.  

Leave a Reply

%d bloggers like this: