garodar-asatana-tumchya-nkalat-honare-sharirk-badal

 

गरोदर असणे हा एक अदभूत अनुभव आहे, नाही का? केवळ एका नव्या जीवाला या जगात आणण्यासाठी तुमच्यात कितीतरी बदल घडतात. देवाकडे या सृजनतेपेक्षा दुसरे काही सुंदर असेल असे आपल्याला वाटत नाही. ही एक जादू आहे आणि स्त्री ही देवाची एक सक्षम आणि मजबूत.उत्तम कलाकृती आहे.

असे असले तरी ‘शक्ती मिळाली की त्यासोबत जबाबदारी पण येते’ आणि जबाबदारी म्हणजे येतात बदल. हे खरे आहे कि गरोदर असतांना एक स्त्री असंख्य बदलांमधून जाते. यामध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांचा देखील समावेश असतो. पण इथे प्रश्न असं आहे की तुम्हाला जर कळले असेल की तुम्ही आई होणार आहात किंवा तुम्ही आधीच तुमच्या गरोदरपणाच्या दुसऱ्या त्रैमासिकात असाल तर तुमचे बाळ या जगात येण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या बाबतीत घडणाऱ्या बदलांची माहिती आहे का?

इथे आम्ही अशा १० बदलांची माहिती दिली आहे. यापैकी काही तुम्हाला माहिती नसतील आणि काहींबद्दल तुम्ही ऐकून असाल. हा लेख पूर्ण वाचा जेणेकरून तुम्ही या बदलांसाठी तयार राहू शकाल.

१. मॉन्टगोमेरी टयूबरकल्स (स्तनाग्रांभोवती पुटकुळे येणे).

हा बदल पहिल्या किंवा दुसऱ्या त्रैमासिकात पहिल्यांदा दिसून येतो . मॉन्टगोमेरी या ग्रंथी स्तनांपाशी असतात आणि त्या स्तनपानाच्या वेळी दुध येण्यासाठी मदत करतात. या ग्रंतींमुळे स्तनांवर अशा पुटकुळ्या उद्भवतात. याचे मुख्य कारण तुमची स्तनाग्रे स्वच्छ रहावीत आणि त्यावरील ओलावा टिकून राहावा व स्तनपानावेळी त्यांवर कोणतेही संक्रमण होऊ नये हे असते. तुमचा स्तनपानाचा कालावधी संपला की हे पुटकुळे निघून आपोआप जातील. पण यासंबंधी तुम्ही जागरूक राहा की या पुटकुळ्या नाजूक असतात. त्यांना फोडण्याचा किंवा काढण्याचा प्रयत्न अजिबात करू नका , यामुळे संक्रमण होण्याची शक्यता असते. असे झाल्यास तुम्हाला प्रसुतीनंतर बाळाला दुध पाजतांना अडचणी येतील. जर चुकून एखादी पुटकुळी फुटल्यास तुमच्या स्त्रीरोगतज्ञाकडे जाऊन योग्य उपचार वेळीच घ्या.

 २. नसा सुजणे.          

तुम्हाला तुमच्या शरीरातील काही नसा सुजलेल्या दिसतील. या नसा सुजून त्वचेवर दिसायला लागतात. हे जास्त करून तुमच्या पायांवर दिसू लागते, याचे कारण अचानक वाढलेले वजन जे तुमच्या शरीराला सांभाळावे लागते हे आहे. जिथून नसा बाहेर आलेल्या दिसतात ती जागा भीतीदायक वाटू शकते. नीळा-जांभळा रंग यावेळी त्या जागेस येतो. परंतु यात जास्त घाबरण्यासारखे किंवा दुखण्यासारखे काही नसते. शक्यतो तुम्ही आराम करा आणि पायांवर जास्त वजन पडणार नाही असे बघा म्हणजे ही परिस्थिती अजून बिघडणार नाही.

३. कामवासनेतील बदल.

गरोदरपणामुळे तुमच्या कामवासनेत बदल घडतो. तुमची प्रणयइच्छा कमी होऊ शकते. शरीरातील संप्रेरकांच्या बदलांमुळे असे होते. हा संप्रेरकीय बदल तुमच्यापैकी काहींसाठी तुमच्या विवाहजीवनाचा सर्वात कामुक काळ देखील ठरू शकतो. हे बदल व्यक्तिगत असतात.

४. वारंवार लघवी येणे.

तुमच्या शरीरात झालेली रक्तवाढ आणि रक्ताभिसरण तुम्ही गरोदर राहिल्यावर तुमच्या किडनीवर दाब आणतात आणि यामुळेच तुम्हाला सारखे सारखे लघवीला जावे लागते. याचे अजून एक कारण म्हणजे गर्भाशयाचा आकार वाढत असतो ज्यामुळे देखील किडनीवर दाब येतो व वारंवार लघवी लागते. असे असले तरीही दुसऱ्या त्रैमासिकानंतर हे कमी होते. पण काहीजणींना संपूर्ण गरोदरपणाच्या काळात हा त्रास होतो. या बदलासाठी तुम्ही तयार राहिलेले बरे.

५. त्वचेवर वांग येणे.

यासाठी तुम्ही ‘मिलानोसीस्ट’ विषयी जाणून घेणे गरजेचे आहे. ही एक प्रकारची पेशी आहे जी शरीरात ‘मिलेनीन’ तयार होण्यासाठी कारणीभूत असते. गरोदरपणात प्रोस्टेजन या संप्रेरकाच्या वाढीमुळे या पेशीच्या कार्याची गती वाढते. उन्हात गेल्यामुळे तर या पेशीचे कार्य अजूनच जास्त गतीने घडते ज्यामुळे त्वचा लवकर काळी पडते.
पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमची प्रसूती झाल्यावर तुम्हाला तुमचा जुना आणि मूळ रंग परत मिळेल. प्रसुतीनंतर चेहऱ्यावर उजाळा देखील येईल.

६. स्तनांमधील बदल.

स्तनाग्रांवरील पुटकुळ्या येतील त्याप्रमाणेच तो भाग तुम्हाला गरोदर राहताच काळा पडल्याचेही जाणवेल.
याच बदलांचा भाग म्हणून तुमचे स्तन नंतरच्या काळात गोल आणि आकाराने चमकदार केस.
मोठे होतील.

७. चमकदार, दाट केस.

सामान्यपणे स्त्रियांचे दररोज सरासरी ७०-१०० केस दिवसाला गळतात. पण गरोदर झाल्यावर शरीरातील एस्ट्रोजन या संप्रेरकाची पातळी वाढते. या वाढलेल्या पातळीमुळे तुमचे केस गळणे जवळपास नाहीसे होऊन जाते. हेच तुमच्या अचानक दाट आणि चमकदार झालेल्या केसांचे रहस्य आहे. असे केस गरोदरपणाच्या संपूर्ण काळात राहतात ज्याने तुमच्या सौंदर्य देखील वाढते.

८. चवीत विलक्षण बदल.

या बदलास ‘डीसग्यूसीया’ असे म्हटले जाते. जर तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या पहिल्या त्रैमासिकात असाल तर तुम्हाला नक्कीच एक प्रकारची खारट आणि धातूसारखी चव जिभेवर सारखी लागत असेल. हे गरोदरपणाचे एक सामान्य लक्षण आहे. कदाचित यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते खास करून जेवतांना. पण काळजी करू नका हे काही आठवड्यांसाठीच असणार आहे. नंतर हे निघून जाईल.

९. बद्धकोष्ठ.

गरोदरपणात बद्धकोष्ठ ही एक अशी गोष्ट आहे ज्यापासून तुम्ही दूर पळू शकत नाही. याची करणे संप्रेरकीय बदलांपासून ते आहाराविषयक सवयींपर्यंत आहेत. एस्ट्रोजन ची वाढलेली पातळी आणि तुमच्या बाळासाठी तुम्ही घेत असलेल्या लोहाच्या गोळ्यांमुळे हा बदल घडतो.
सोबतच तुम्हाला होणाऱ्या कोरड्या उलट्यांमुळे तुमच्या आहारात जे बदल होतात त्यामुळे देखी बद्धकोष्ठ उद्भवतो. काही दिवसातच हा त्रास नाहीसा होईल. तंतुमय (फाइबरयुक्त) पदार्थांचा अन्नात समावेश केल्यास हा प्रश्न सुटू शकतो.  

१०. पोटावर पांढऱ्या बारीक रेषा. स्ट्रेस मार्क्स 

या बदलास ‘लिनिया निग्रा’ असे म्हटले जाते. हे पोटाची त्वचा ताणली गेल्यामुळे येणारे व्रण असतात. या बारीक पांढऱ्या रेषा असतात ज्या पोटाच्या वरच्या भागापासून ते उटीपोटापर्यंत येतात. आणि हळू हळू काळ्या पडत जातात. स्तनाग्रांचे काळे पडणे, पोटावर व्रण येणे यासार्वांमागे शारीरिक बदल कारणीभूत असतात. पण याच्या मुळाशी संप्रेरकांचे बदल मुख्यत्वे करून दिसतात.
हेसुद्धा प्रसुतीनंतर नाहीसे होईल.

यासर्व बदलांसाठी तुम्ही संयम आणि थोडासा धीर बाळगायला हवा. हे सर्व बदल केवळ प्रसूतीपर्यंतच  टिकणार आहेत आणि तुम्ही सफलतेने यांना सामोरे जाणार आहात. तुम्हाला तुमच्या सहनशीलतेची आणि तुमच्यातल्या शक्तीची कल्पना नसली तरी आमचा तुमच्यावर विश्वास नक्कीच आहे!  

काळजी घ्या.    

 

Leave a Reply

%d bloggers like this: