ha-masa-striche-garbharpan-olkhun-gheto

 

तुम्ही गरोदर आहात का ? याचे उत्तर जर डॉल्फिनने दिले तर ! याबाबतीत नवीन संशोधन आलेय की, डॉल्फिन हा मातेचे गर्भारपण ओळखून घेतो. त्या गरोदर मातेच्या बाळासोबत बोलतही असतो. ही गोष्ट सायंटिफिक सुद्धा आहे. डॉल्फिनजवळ मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शाररिक क्षमता असते. त्याला माणसांसारख्या सुख- दुःखाच्याही गोष्टी करता येत असतात. तो इमोशनल असतो. खालील लेखात डॉल्फिन गरोदर मातेच्या बाळाला कसा गर्भात खेळवतो त्यासंबंधी माहिती दिली आहे. 

 

१) डॉल्फिन ने केलेला आवाज बाळ ऐकण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे बाळाची ऐकण्याची शक्ती वाढते. कारण त्याला बाळही प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्या गर्भात हालचाल व्हायला लागते.

२) आपल्याकडे ही गोष्ट नाही. पण पाश्चिमात्य देशात बऱ्याच स्त्रिया डॉल्फिन बरोबर पाण्यात पोहत असतात. आणि डॉल्फिन असा मासा आहे की, तो गरोदर स्त्रीला लगेच ओळखून घेतो आणि स्वतःच तो त्या पोहणाऱ्या मातेच्या जवळ येऊन पोटातल्या बाळाबरोबर संवाद करायला लागतो. आवाज काढतो आणि त्या आवाजामुळे बाळही खेळायला लागते. याला काही जण डॉल्फिन थेरपी म्हणतात. आणि खूप गरोदर माता घेतात. या थेरपीत बाळाचे काही इंद्रिये खुलून जातात आणि बाळ गर्भातच खुप शिकायला लागतो. या थेरपी घेण्याने बाळाचा मेंदू विकसित होतो. ज्या बाळाच्या हालचाली मंद झालेल्या असतात त्या बाळांसाठी सुद्धा ही थेरपी करतात.  

३) ह्या गोष्टी डॉल्फिन कशामुळे करू शकतो असा प्रश्न तुम्हाला पडेल. डॉल्फिन स्त्री गर्भवती आहे की नाही तेही कसे ओळखतो ? कारण डॉल्फिन मध्ये अल्ट्रासाउंडने स्कॅन करण्याची शक्ती असते. म्हणजे त्याच्याकडे काही आवाजाच्या वेव्ह असतात त्याच्याने डॉल्फिन ओळखतो, समजून घेतो आणि बोलतो सुद्धा.

याविषयी अजून संशोधन चालू आहे पण त्याअगोदर काही देशात गरोदर मातांसाठी डॉल्फिन थेरपी सुरु केली आहे. तुम्हालाही ही थेरपी करायची असेल तर परदेशात जावे लागेल. अजूनही भारतात यासंबंधी काहीच संशोधन नाही. 

Leave a Reply

%d bloggers like this: