kahi-salale-tumhala-aai-zalyavar-dile-jatat

तुम्ही ज्यावेळी तुमचं छोटंसं गोंडस असं बाळ घरी घेऊन येता त्यावेळीचा अनुभव काही वेगळाच असतो. सगळेच जण तुमचं आणि तुमच्या बाळाचे कोडकौतुक करायला सज्ज असतात. तसेच बरेच सल्ले देखील तुमच्यासाठी तयार असतात. तसेच अश्या काही गोष्टी असतात ज्यामध्ये फारच कमी प्रमाणात तथ्य असते या गोष्टी कोणत्या ते आपण पाहणार आहोत

१.   बाळ झोपल्यावर काय आरामच आहे. 

बाळ काय सुरवातीचे दिवसभर  झोपेतच असतं  त्याला झोपवलं की  काय तुम्हांला  आरामच आराम आहे. पण हे खरं नाहीये सुरवातीचे दिवस बालाजी काळजी घेणे बाळाच्या स्तनपानाच्या झोपेच्या वेळा समजून घेण्यात जाते. त्यानंतर वेळ उरला तर स्वतःचे आवरणे. अंघोळ करणे. इतर राहिलेली कामे करणे  यामध्ये आईचा वेळ जात असतो. त्यामुळे बाळ झोपले कि तुम्हांला  आराम या गोष्टीत काही तथ्य नसते.

२. योग्य पद्धतीने स्तनपान दिल्यास स्तन दुखावत नाही

योग्य पद्धतीने स्तनपान दिल्यास स्तन दुखावत नाही ही एक अफवा आहे असे म्हणाले तरी चुकीचे ठरणार नाही. आणि आणि मुख्य म्हणजे या गोष्टीला काही बालरोगतज्ज्ञचा पाठिंबा आहे. हे खरे आहे असे मानले तरी हे किती पचनी पडू शकते? इवलुसे ओठ थोड्या-थोड्या वेळाने दुधासाठी स्तन चोखत असतात. त्यामुळे काही प्रमाणात तरी स्तन हे दुखावले जातात. दुखावण्याचे प्रमाण जरी कमी आधी असले तर त्रास होतोच. त्यामुळे त्याबाबतीत मनाची तयारी ठेवावी.

३. संपूर्ण आयुष्य बदलते

मुल झाल्यावर तुमचे पूर्ण आयुष्य बदलून जाते. असे सांगून बरेच लोक तुमच्या मनात नकारात्मक विचार भरवत असतात. या गोष्टीत काही प्रमाणात तथ्य असले तरी याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही पूर्वीचे आयुष्य पुन्हा कधी जगू शकत नाही. काही दिवसानंतर तुमचे शरीर पूर्ववत होते आणि तुम्ही पूर्वीसारखा आयुष्य जगू शकता. सुरवातीचे काही दिवस तुम्हांला असते वाटेल की खरंच आपलं पूर्ण आयुष्य बदलेले आहे पण थोडे दिवसासाठीच या गोष्टी असतात. त्यामुळे असे नकारत्मक विचार मनातून काढून टाका.

४. हे दिवस पटकन निघून जातात त्यामुळे प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या

ही गोष्ट सांगायला खूप छान असते आणि खरी पण तितकीच असते परंतु प्रत्यक्षात येणे कठीण असते. बाळाच्या जन्मानंतर प्रसूतीनंतर अंग दुखणे आणि प्रसूतीनंतरचे त्रास यामुळे हे दिवस खूप हळू-हळू जात आहेत असे वाटते. आणि एक-एक दिवस ढकलणे कठीण होते.

५. सुरवातीचे काही दिवस सुखकर असतात

हो ही  गोष्ट काही प्रमाणात खरी असू शकते कारण या काळात बाळ जास्त वेळ झोपण्यात जातो. परंतु प्रसूतीनंतरच्या वेदना आणि बाळाला स्तनपान देणे त्यामुळे स्तन दुखावणे तसेच प्रसूती नंतर येणारे औदासिन्य यामुळे हे दिवस तितकेच  वेदनामय असु  शकतात.

६. बाळ आल्यावर तुम्ही तुमच्या वेदना विसरून जाल

हे सगळ्या होणाऱ्या मातांना सांगितले जाणारे वाक्य आहे. आणि हे जरी भावनिक दृष्ट्या खरे असेल ही पण  वास्तवात परिस्थिती वेगळी असू शकते. प्रसूती झाल्यावर या सगळ्या गोष्टी विचार करण्याची मनस्थिती त्या स्त्रीची नसू शकते.

वरती सांगितलेल्या गोष्टी भावनिकदृष्ट्या थोड्या कटू वाटण्याची शक्यता आहे. प्रत्येकी स्त्रीचा अनुभव वेगळा असू शकतो. पण बऱ्याचवेळा वास्तव हे कल्पनेपेक्षा वेगळे असते आणि या काळात अनाहूत सल्ले कधी-कधी त्रासदायक ठरू शकतात.

Leave a Reply

%d bloggers like this: